गौतम गंभीर याच्या कमाईबद्दल जाणून तुम्हाला वाटेल आश्चर्य! टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून सुत्रे हातात घेतल्यापासून…
भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीर सतत चर्चेत असणारे नाव आहे. मैदानाच्या बाहेर बसून खेळाडूंना मार्गदर्शन करताना कायमच गौतम गंभीर दिसतो. गौतम गंभीरच्या कमाईबद्दल जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल.

भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीर सतत चर्चेत असणारे नाव आहे. मैदानाच्या बाहेर बसून गौतम गंभीर लाईव्ह सामन्यादरम्यान सूत्रे हलवताना दिसताे. विशेष म्हणजे गौतम गंभीर हा करोडोंच्या संपत्तीचा मालक आहे. गौतम गंभीरची संपत्ती तब्बल 265 कोटी आहे. हेच नाही तर बीसीसीआय त्याला वर्षाला 14 कोटी पगार देते. यासोबत अनेक मोठ्या सुविधा बीसीसीआयकडून गौतम गंभीरला दिल्या जातात. फक्त हेच नाही तर गौतम गंभीर हा वर्षाला जाहिराती आणि व्यवसायातून कोट्यावधीची कमाई करतो. गौतम गंभीरचे स्वत:चे काही व्यवसाय देखील आहेत. अत्यंत महागड्या गाड्यांचे कलेक्शन गौतम गंभीरकडे आहे.
गौतम गंभीरची संपत्ती फक्त देशातच नाही तर विदेशात देखील आहे. गंभीरची शैली नेहमीच मैदानावर आणि मैदानाबाहेर वेगळी राहिली आहे. भारतातील सर्वात यशस्वी प्रशिक्षकांपैकी एक नाही तर जगातील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या क्रिकेट प्रशिक्षकांपैकी गंभीर एक बनलाय. गौतम गंभीरच्या प्रशिक्षक पदाच्या कार्यकाळात अनेक सामने भारताला जिंकण्यात यश मिळाले.
रिबॉक, एमआरएफ, पिनॅकल स्पेशालिटी व्हेइकल्स रॅडक्लिफ लॅब्ससह अनेक नामांकित कंपन्यांचा ब्रँड अॅम्बेसेडर आज गौतम गंभीर आहे, त्यामधून तो मोठी कमाई करतो. गौतम गंभीर याच्याकडे ऑडी Q5, BMW 530D, महिंद्रा बोलेरो स्टिंगर, टोयोटा कोरोला, मारुती SX4 यासारख्या आलिशान गाड्या आहेत. हेच नाही तर दिल्लीतील राजेंद्र नगर परिसरात त्याचे आलिशान घर असून त्याच घरात तो आपल्या संपूर्ण कुटुंबासोबत राहतो. गौतम गंभीरच्या या आलिशान घराची किंमत 30 कोटींच्या आसपास असल्याचे सांगितले जाते.
गौतम गंभीरला दोन मुली आहेत. काही दिवसांपूर्वी गौतम गंभीर याची पत्नी मुलींसह सामना पाहण्यासाठी पोहोचली होती. यावेळी सामना संपल्यानंतर ती मुलींसह मैदानावर आली, यावेळी गौतम गंभीर आणि तिच्यामधील संवादाचा व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसला. व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये गौतम गंभीर हा चिडलेला व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसत होता. त्या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओनंतर विविध चर्चांना उधाण आल्याचे बघायला मिळाले.
