AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ENG vs INS 5th Test : या तीन खेळाडूंना संधी दे, ओव्हल टेस्टआधी इरफान पठाणचा शुबमन गिलला मोलाचा सल्ला

ENG vs INS 5th Test : आजपासून अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी 2025 सीरीजचा पाचवा अंतिम कसोटी सामना सुरु होणार आहे. द ओव्हलवर हा सामना होईल. या सामन्याआधी माजी ऑलराऊंडर इरफान पठाणने भारतीय संघात तीन बदल सुचवले आहेत.

ENG vs INS 5th Test : या तीन खेळाडूंना संधी दे, ओव्हल टेस्टआधी इरफान पठाणचा शुबमन गिलला मोलाचा सल्ला
Team India Image Credit source: bcci
| Updated on: Jul 31, 2025 | 9:55 AM
Share

भारत आणि इंग्लंडमध्ये अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी 2025 सीरीज सुरु आहे. आजपासून या सीरीजचा पाचवा अंतिम कसोटी सामना द ओव्हलमध्ये सुरु होणार आहे. भारत या सीरीजमध्ये 1-2 ने पिछाडीवर आहे. चौथा कसोटी सामना ड्रॉ झाला. टीम इंडियाचा माजी ऑलराऊंडर इरफान पठाणने भारतीय संघात तीन बदल सुचवले आहेत. जेणेकरुन टीमला शेवटचा कसोटी सामना जिंकून सीरिजमध्ये बरोबरी करता येईल.

पहिला बदल

ऋषभ पंतच्या पायाला फ्रॅक्चर झाल्यामुळे तो टीमच्या बाहेर आहे. त्यामुळे इरफान पठाणने ध्रुव जुरेलचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश करण्याचा सल्ला दिला आहे. कारण विकेटकिपिंग आणि फलंदाजी दोघात स्थिरता येईल.

दुसरा बदल

जसप्रीत बुमराहला आतापर्यंत सीरीजमध्ये बराच वर्कलोड झेलाव लागला आहे. इरफान पठानने त्याला आरामाचा सल्ला दिला आहे. त्याने कुलदीप यादवला खेळवण्याचं मत व्यक्त केलय. कुलदीव नवीन ऊर्जेसह विकेट घेण्यासाठी मदत करु शकतो. इरफानने कुलदीपला भारताचं ट्रम्प कार्ड म्हटलं.

तिसरा बदल

अंशुल कम्बोजला चौथ्या कसोटीत डेब्युची संधी मिळाली होती. पण तो खास प्रदर्शन करु शकला नव्हता. पठाणच्या सल्ल्यानुसार अर्शदीप सिंहला डेब्युची संधी द्यावी किंवा प्रसिद्ध कृष्णाला संधी द्या. अर्शदीप मर्यादीत ओव्हर्सच्या क्रिकेट सामन्यांचा अनुभव आहे. विकेट काढण्याची त्याची क्षमता आहे. इरफान पठाण म्हणाला की, तुमच्याकडे 6 गोलंदाज आहेत. वेगवान गोलंदाज थकले आहेत. अशावेळी कुलदीप सारख्या फ्रेश बॉलरमुळे तुम्हाला फायदा होईल.

वॉशिंग्टन सुंदरबद्दल काय म्हटलं?

इरफान पठाणने वॉशिंग्टन सुंदरच भरपूर कौतुक केलं. सुंदरने ज्या पद्धतीने बॅट आणि बॉलने योगदान दिलय, त्याचा फरक टीममध्ये दिसून येतो. चौथ्या कसोटीच्या अखेरच्या दिवशी त्याने पहिलं आंतरराष्ट्रीय शतक झळकावलं. पठाण म्हणाला की, तो 7, 8, 9, नंबरवर खेळतो. तो पाचव्या नंबरवर येऊन शतक मारतो. 5 व्या किंवा 6 व्या नंबरसाठी फिक्स पर्याय बनू शकतो. ही टीमसाठी सकारात्मक बाजू आहे. इंग्लंडने आधीच आपल्या प्लेइंग इलेव्हनची घोषणा केली आहे. यात बेन स्टोक्स आणि जोफ्रा आर्चर यांचा समावेश करण्यात आलेला नाही. त्यामुळे भारताला पाचवा कसोटी सामना जिंकण्याची संधी आहे.

कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा
कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा.
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर.
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान.
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा.
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक.
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:.
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज.
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा.
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.