AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra Football Cup: कोल्हापूरमध्ये साखळी फेरीचे सामने संपन्न, आता विभागवार टप्प्यासाठी चार संघांमध्ये चुरस

कोल्हापूर जिल्ह्यात महाराष्ट्र फुटबॉल स्पर्धेतील साखळी फेरीतील सामने संपन्न झाले. या फेरीतून चार संघ उपांत्य फेरीत पोहोचले आहेत. आता चार संघांमध्ये विभागवार फेरीसाठी चुरस असणार आहे.

Maharashtra Football Cup: कोल्हापूरमध्ये साखळी फेरीचे सामने संपन्न, आता विभागवार टप्प्यासाठी चार संघांमध्ये चुरस
Maharashtra Football Cup: कोल्हापूरमध्ये साखळी फेरीचे सामने संपन्न, आता विभागवार टप्प्यासाठी चार संघांमध्ये चुरस
| Updated on: Feb 18, 2023 | 11:04 PM
Share

कोल्हापूर : महाराष्ट्र सरकार आणि एफसी बायर्न क्लब जर्मनी यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यात फुटबॉल स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. 36 जिल्ह्यांमध्ये फुटबॉल स्पर्धा रंगतदार वळणावर आली आहे. काही जिल्ह्यांमधून विभागवार टप्प्यात संघांनी धडक मारली आहे. तर काही जिल्ह्यांमध्ये साखळी फेरीचे सामने सुरु आहेत. आता कोल्हापूरमध्ये प्राथमिक फेरीतील साखळी फेरीचे सामने संपन्न झाले. साखळी फेरीतून महाराष्ट्र हायस्कूल, संजीवन पब्लीक स्कूल, पोदार इ स्कूल, स .म लोहीया हायस्कूल या चार संघांनी उपांत्य फेरीत धडक मारली आहे. आता चार पैकी एका संघाची विभागवार फेरीसाठी निवड होणार आहे. यासाठी 19 फेब्रुवारी 2023 रोजी सामने पार पडणार आहेत.

  •  छ. शाहू विद्यालय s s c  विरुद्ध  प्रायव्हेट हायस्कूल 0/0 (पेनल्टीस्ट्रोकवर शाहू विद्यालय 4/2 ने विजयी)
  • न्यु मॉडेल इ स्कूल विरुद्ध छ. शाहू विद्यालय सी बी एस सी 0/0 (पेनल्टीस्ट्रोकवर न्यु मॉडेल 1/0 ने विजयी)
  • शांतीनिकेतन विरुद्ध गुरुकुल पब्लीक स्कूल कुंभोज 1/0 (शांतीनिकेतन विजयी, कनिष्क भोजकर 1 गोल)
  • महाराष्ट्र हायस्कूल विरुद्ध बी के पाटील हाय गिरगाव 6/0 (महाराष्ट्रकडून श्रेयस निकम 1, शुभम कांबळे 1, सर्वेश गवळी 2, स्वयम जाधव 1, सोहम पाटील 1 गोल)
  • संजय घोडावत विरुद्ध न्यु हायस्कूल 1/0 (अजान बेग 1/0 गोल केला.)
  • पोदार इ स्कूल विरुद्ध न्यु मॉडेल स्कूल 1/0 (पोदार विजयी, हसन अन्सारी 1 गोल)
  • डी सी नरके विद्यानिकेतन विरुद्ध शांतीनिकेतन 2/1 (गोलनी डी.सी नरके विजयी, शिवतेज जाधव 1, विवेक पाटील 1, शांतीनिकेतनकडून अनय बेंडके 1 गोल)
  • महाराष्ट्र हायस्कूल विरुद्ध  न्यु हायस्कूल 4/0 (महाराष्ट्र विजयी, श्रेयस निकम 2, इशान तिवले 1, आदित्य पाटील 1 गोल)
  • संजीवन पब्लीक स्कूल विरुद्ध महावीर इ स्कूल 0/0 (पेनल्टीस्ट्रोकवर संजीवन 4/2 ने विजयी)
  • पोदार इ स्कूल विरुद्ध डी सी नरके विद्यानितन 2/0 (पोदार विजयी हसन, अन्सारी 1, शंतनु चतर्जी 1 गोल)
  • स . म . लोहीया हाय विरुद्ध छ शाहू विद्यालय 1/0 (स .म . लोहिया विजयी, सार्थक आमते 1 गोल)

उपांत्य फेरीचे सामने (19 फेब्रुवारी 2023)

1) महाराष्ट्र हायस्कूल विरुद्ध संजीवन पब्लीक स्कूल 2) पोदार इ स्कूल विरुद्ध स . म लोहीया हायस्कूल

स्पर्धेचा उद्देश

महाराष्ट्राच्या मातीतून उत्तम फुटबॉलपटू घडवणं हा या स्पर्धेमागचा मुख्य उद्देश आहे. प्रत्येक जिल्ह्यातून एक विजेता संघ निवडला जाणार आहे. विजेत्या टीमची दुसऱ्या जिल्ह्याच्या टीम बरोबर मॅच होईल. हा या स्पर्धेचा दुसरा टप्पा असणार आहे.

वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.