भारताविरुद्धच्या टी-20 मालिकेआधीच न्यूझीलंडला मोठा धक्का

वेलिंग्टन (न्यूझीलंड) : वन डे मालिका संपल्यानंतर आता भारत आणि न्यूझीलंड हे दोन्ही संघ टी-20 मालिकेसाठी सज्ज झाले आहेत. मात्र त्याआधीच न्यूझीलंडला मोठा धक्का बसला आहे. न्यूझीलंडचा स्टार ओपनर मार्टिन गप्टिल संघातून बाहेर झाला आहे. गप्टिलच्या पाठीला दुखापत झाल्याने गप्टिलला विश्रांती देण्यात आली आहे. न्यूझीलंडच्या टीममध्ये मार्टिल गप्टीलच्या जागी ऑलराऊंडर जिमी निशाम याला संधी देण्यात […]

भारताविरुद्धच्या टी-20 मालिकेआधीच न्यूझीलंडला मोठा धक्का
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:29 PM

वेलिंग्टन (न्यूझीलंड) : वन डे मालिका संपल्यानंतर आता भारत आणि न्यूझीलंड हे दोन्ही संघ टी-20 मालिकेसाठी सज्ज झाले आहेत. मात्र त्याआधीच न्यूझीलंडला मोठा धक्का बसला आहे. न्यूझीलंडचा स्टार ओपनर मार्टिन गप्टिल संघातून बाहेर झाला आहे. गप्टिलच्या पाठीला दुखापत झाल्याने गप्टिलला विश्रांती देण्यात आली आहे.

न्यूझीलंडच्या टीममध्ये मार्टिल गप्टीलच्या जागी ऑलराऊंडर जिमी निशाम याला संधी देण्यात आली आहे. पाच वन डे सामन्यांच्या मालिकेतील अंतिम दोन सामने जिमी निशाम खेळला होता.

न्यूझीलंड क्रिकेट संघाचे प्रशिक्षक गॅरी स्टीड यांनी यासंदर्भात बोलताना म्हटले, “टी-20 मालिकेत मार्टिन गप्टील खेळू शकणार नाही. कारण तो अद्याप पूर्णपणे बरा झाला नाही. गप्टिल संघाचा महत्त्वाचा भाग आहे. मात्र, त्याला विश्रांती देऊन पूर्ण बरा होण्याची वाट पाहावी लागेल.”

भारताविरुद्धच्या पाच वन डे सामन्यातील शेवटच्या सामन्याआधी गप्टिलला दुखापत झाली होती. आता गप्टिलला विश्रांती देण्यात आली आहे. कारण बांगलादेश दौऱ्यासाठी त्याला टीममध्ये परतायचं आहे. मार्टिन गप्टीलने भारताविरुद्ध फार काही चांगली कामगिरी केली नाही. पाच सामन्यान गप्टिलने केवळ 47 धावांची नोंद केली.

भारत विरुद्ध न्यूझीलंडमधील वन डे मालिका संपल्यानंतर, आता टी-20 मालिकेला सुरुवात होणार आहे. वेलिंग्टनमध्ये 6 फेब्रुवारी रोजी पहिला टी-20 सामना होईल, तर अंतिम सामना 10 फेब्रुवारी रोजी होईल.

दरम्यान, न्यूझीलंडच्या संघात आणखी एका युवा खेळाडूचा समावेश करण्यात आला आहे. डेरिल मिशेल असे त्याचे नाव आहे. डेरिल मिशेल हा न्यूझीलंडचे माजी प्रशिक्षक जॉन मिशेल यांचा मुलगा आहे.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.