AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IndvsAus: भारताचा पहिला डाव 7 बाद 443 धावांवर घोषित

मेलबर्न: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या बॉक्सिंग डे कसोटीच्या दुसऱ्या दिवसअखेर ऑस्ट्रेलियाने बिनबाद 8 अशी मजल मारली आहे. सलामीवीर मर्कस हॅरिस 5 आणि अॅरॉन फिंच 3 धावांवर खेळत आहेत. त्याआधी भारताने पहिला डाव 7 बाद 443 धावांवर घोषित केला. यानंतर आजच्या दिवसातील 9 षटकांसाठी ऑस्ट्रेलियन सलामीवीरांना मैदानात उतरावं लागलं. मात्र भारतीय गोलंदाजांना इतक्या कमी काळात विकेट घेण्यात अपयश आलं. दरम्यान […]

IndvsAus: भारताचा पहिला डाव 7 बाद 443 धावांवर घोषित
| Updated on: Jul 05, 2019 | 4:47 PM
Share

मेलबर्नऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या बॉक्सिंग डे कसोटीच्या दुसऱ्या दिवसअखेर ऑस्ट्रेलियाने बिनबाद 8 अशी मजल मारली आहे. सलामीवीर मर्कस हॅरिस 5 आणि अॅरॉन फिंच 3 धावांवर खेळत आहेत. त्याआधी भारताने पहिला डाव 7 बाद 443 धावांवर घोषित केला. यानंतर आजच्या दिवसातील 9 षटकांसाठी ऑस्ट्रेलियन सलामीवीरांना मैदानात उतरावं लागलं. मात्र भारतीय गोलंदाजांना इतक्या कमी काळात विकेट घेण्यात अपयश आलं. दरम्यान भारताकडूनचेतेश्वर पुजारा 106, विराट कोहली 82, मयांक अग्रवाल 76 धावा  आणि रोहित शर्माने नाबाद 63 धावा केल्या. हिटमॅन रोहित शर्माने अर्धशतकानंतर वेगवान फलंदाजीला सुरुवात केली. मात्र दुसऱ्या बाजूने विकेट पडत गेल्या. ऋषभ पंत 39 आणि रवींद्र जाडेजा 4 धावा करुन माघारी परतला. त्यानंतर कर्णधार विराट कोहलीने भारताचा डाव 7 बाद 449 धावांवर घोषित केला. रोहित शर्माने 114 चेंडूत नाबाद 63 धावा केल्या.

भारताने कालच्या 2 बाद 215 धावावरुन खेळाला सुरुवात केली. कर्णधार विराट कोहलीने आपलं अर्धशतक पूर्ण केलं, तर हुकमी एक्का चेतेश्वर पुजाराने कसोटीतील 17 वं शतक पूर्ण करत, माजी कर्णधार सौरव गांगुलीच्या कसोटी शतकांना मागे टाकलं. पुजारापाठोपाठ कर्णधार विराट कोहलीही शतक झळकावेल असं वाटत होतं. मात्र कोहलीला मिचेल स्टार्कने अरॉन फिंचकरवी झेलबाद केलं. कोहलीने 9 चौकारांच्या सहाय्याने 204 चेंडूत 82 धावा ठोकल्या. कोहली बाद झाल्यानंतर लगेचच पुजाराही मागे परतला. पुजाराने 319 चेंडूत 106 धावा केल्या. पॅट कमीन्सने त्याला त्रिफळाचीत केलं. पुजारा-कोहलीने चौथ्या विकेटसाठी 170 धावांची भागीदारी रचली.

कोहली-पुजारा माघारी परतल्यानंतर अजिंक्य रहाणे आणि रोहित शर्माने खेळाची सूत्रं हाती घेतली. रहाणेला नॅथन लायनने 34 धावांवर पायचित केलं. त्यानंतर रोहितच्या साथीला ऋषभ पंत आला. रोहितने संयमी खेळी करत अर्धशतक पूर्ण केलं. तसंच या जोडीने भारताच्या चारशे धावांचा टप्पा पूर्ण केला. आज विराट कोहली (82), चेतेश्वर पुजारा 106 आणि अजिंक्य रहाणे 34 धावा करुन बाद झाले.  त्यानंतर ऋषभ पंत 39 आणि रवींद्र जाडेजा 4 धावा करुन माघारी परतला.

पहिल्या दिवसाचा खेळ

या कसोटीत भारताने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. भारताने मुरली विजय आणि के एल राहुल यांना डच्चू देऊन फ्रेश सलामीवीर मैदानात उतरवले. हनुमा विहारी आणि मयांक अग्रवाल यांनी सकारात्मक सुरुवात केली. हनुमा विहारी अवघ्या 8 धावा करुन माघारी परतला, मात्र या जोडीने 40 धावांची सलामी दिली. हनुमा विहारीने तब्बल 66 चेंडू म्हणजेच 11 षटकं खेळून काढले. त्यामुळे पहिल्या विकेटसाठी कांगारुंना 19 षटकं झुंजावं लागलं. मात्र दुसऱ्या बाजूने मयांक अग्रवालने आत्मविश्वासाने फलंदाजी केली. त्याने 76 धावा केल्या.

संबंधित बातम्या 

IndvsAus: डॅशिंग मयांक, हुकमी एक्का पुजाराने दिवस गाजवला   

मयंक अग्रवालने कोल्हापूरच्या फलंदाजाचा विक्रम ऑस्ट्रेलियात मोडला  

वॉर्नरने मला बॉलशी छेडछाड करायला भाग पाडलं, ऑस्ट्रेलियन खेळाडूचा खुलासा

मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.