Mumbai Indians : चलो, चलो निकलो.. MI चा फ्लॉप शो पाहून आकाश अंबानीने…, प्रेक्षकांनाही म्हणाला.. Video व्हायरल

Akash Ambani Left the Stadium : चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध 104 धावांवर गारद झालेल्या मुंबई इंडियन्सला आयपीएलमध्ये लाजीरवाणा पराभव स्वीकारावा लागला. वानखेडेवर मुंबईच्या या अत्यंत खराब खेळीमुळे फक्त प्रेक्षकांचीच निराशा झाली नाही तर संघाचा मालक असलेला आकाश अंबानीदेखील..

Mumbai Indians : चलो, चलो निकलो.. MI चा फ्लॉप शो पाहून आकाश अंबानीने..., प्रेक्षकांनाही म्हणाला.. Video व्हायरल
MI लाजिरवाणा खेळ पाहून आकाश अंबानीने सोडलं मैदान
Image Credit source: social media
| Updated on: Apr 24, 2026 | 3:30 PM

IPL 2026, Mumbai Indians: वानखेडे मैदानावर गुरूवारी जे चित्र दिसलं, मुंबई इंडियन्सचे चाहते, बराचकाळ ते विसरू शकणार नाहीत.चेन्नई सुपर किंग्स (CSK) कडून मुंबई इंडियन्सचा (MI) 103 धावांनी झालेला लाजिरवाणा पराभव हा टीमच्या खेळाडूंच्या आणि चाहत्यांच्याही हृदयात खुपणारा आहे. या पराभवाने मुंबई इंडियन्सचा संघात भूकंप झाला असून प्रचंड खळबळ माजली आहे. चेन्नईने दिलेल्या 208 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईचा संघ अवघ्या 104 धावांवर ऑलआऊट झाला. संघाच्या या खराब कामगिरीमुळे टीमचा मालक असलेला आकाश अंबानी इतका वैतागला की, सामना संपण्यापूर्वीच तो डगआऊटमधून उठून मैदानातून निघून गेला.

आकाश अंबानी मैदानातून जातानाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यामध्ये तो फक्त स्वतःच मैदान सोडत नव्हता तर निराश झालेल्या चाहत्यांनाही त्याने स्टेडियम सोडून जाण्याचा इशाराही केला.

निराश आकाश अंबानीने सोडलं मैदान

कालचा हा पराभव मुंबई इंडियन्ससाठी केवळ एका सामन्याचा निकाल न राहता, प्रतिष्ठेची लढाई बनला आहे. लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबईच्या संघाचा डाव पत्त्यांच्या घराप्रमाणे कोसळत असताना, आकाश अंबानींचा संयम संपला. त्याची नाराजी व्हायरल व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसून आली.

पाच वेळच्या विजेत्या ठरलेल्या संघाच्या या लाजिरवाण्या पराभवामुळे मॅनेजमेंट नाराज असल्याचं चाहत्यांना वाटतंय. कारण मुंबईचा सामना संपण्यापूर्वीच मालकाने (आकाश अंबानी) मैदान सोडल्यान संघाचं भविष्य आणि कर्णधारपदाबद्दल गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.

 

कर्णधारपदात होणार बदल ? हार्दिकचं काय होणार?

रोहित शर्माला हटवून, हार्दिक पांड्याकडे मुंबईच्या संघाची कर्णधारपदाची सूत्रे सोपवण्याचा निर्णय हा मास्टरस्ट्रोक नव्हे तर एक मोठी डोकेदुखी ठरला आहे. हार्दिक पंड्या हा, फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्हीमध्ये चांगली कामगिरी करत नाहीये. या मोसमात सात सामन्यांमध्ये पाच पराभव झाल्यामुळे मुंबईचा संघ पॉईंट्स टेबलमध्ये आठव्या स्थानावर घसरला आहे. जर संघाने पुढील काही सामन्यांमध्ये विजयाची मालिका सुरू केली नाही, तर याच मोसमाच्या मध्यात कर्णधारपदाबाबत काही आश्चर्यकारक निर्णय घेतला जाऊ शकतो अशी अटकळ बांधली जात आहे.

तिलक वर्मा आणि जेमी ओव्हरटन यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक

याच सामन्यादरम्यान तिलक वर्मा आणि सीएसकेचा जेमी ओव्हरटन यांच्यात वाद झाल्याने मैदानावर तणाव वाढला. धावत असताना ओव्हरटनने आपला मार्ग अडवल्याने तिलकने आक्षेप घेतला. दोन्ही खेळाडूंमधील या तीव्र शाब्दिक चकमकीतून तणावाचं वातावरण दिसून आलं.

पराभवानंतर काय म्हणाला हार्दिक ?

या दारुण पराभवानंतर, हार्दिकने खेळपट्टीऐवजी आपल्या संघाच्या फलंदाजीला दोष दिला. त्याने संजू सॅमसनच्या शतकाचे कौतुक केलंय. पॉवरप्लेमध्ये संधीचे सोने करण्यात संघाला आलेले अपयश त्यांना महागात पडल्याचं हार्दिकने कबूल केलं. मात्र, चाहते आणि क्रिकेट तज्ज्ञांच्या मते, हार्दिककडे स्वतःचे स्पष्टीकरण देण्यासाठी आता वेळ कमी उरला आहे. त्याच्याबाबत काय निर्णय घेतला जातो याकडे लक्ष लागल आहे.

Follow Us