MI vs KKR | IPL 2020 : रोहितचा धमाका, मुंबईचा विजय

रोहित शर्माच्या (Rohit Sharma MI win) मुंबई इंडियन्सने आयपीएलच्या पाचव्या सामन्यात कोलकाता नाईटरायडर्सचा 49 धावांनी धुव्वा उडवला. (Rohit Sharma MI win)

MI vs KKR | IPL 2020 : रोहितचा धमाका, मुंबईचा विजय


यूएई : रोहित शर्माच्या (Rohit Sharma MI win) मुंबई इंडियन्सने आयपीएलच्या पाचव्या सामन्यात कोलकाता नाईटरायडर्सचा 49 धावांनी धुव्वा उडवला. मुंबई इंडियन्सने कोलकाता नाईट रायडर्ससमोर विजयासाठी 196 धावांचं भलं मोठं आव्हान ठेवलं होतं. मात्र हे आव्हान पूर्ण करण्यात कोलकात्याच्या फलंदाजांना अपयश आलं. (KKR vs MI live score updates ipl 2020 today cricket match) कोलकाताला निर्धारित 20 षटकात 9 बाद 146 धावाच करता आल्या. (Rohit Sharma MI win)

मुंबईकडून कर्णधार रोहित शर्माने सर्वाधिक 80 धावा केल्या. रोहित शर्माने त्याच्या खेळीला 6 षटकार आणि 3 चौकारांचा साज चढवला. सूर्यकुमार यादवने 28 चेंडूत 47 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. सौरभ तिवारीने 13 चेंडूत 21 तर हार्दिक पांड्याने 13 चेंडूत 18 धावा काढल्या.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI