रॉबिन सिंहसह 2 हजार जणांचे अर्ज, टीम इंडियाचा प्रशिक्षक कोण?

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (BCCI) भारतीय क्रिकेट संघाच्या प्रमुख प्रशिक्षक पदासाठी 2000 पेक्षा जास्त अर्ज आले आहेत. मात्र, या 2000 हजार अर्जांमध्ये विद्यमान प्रशिक्षक रवी शास्री यांना टक्कर देऊ शकतील अशी नावं फार कमी आहेत, असा दावा बंगळुरु मिररच्या रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे.

More than 2000 people send application to BCCI, रॉबिन सिंहसह 2 हजार जणांचे अर्ज, टीम इंडियाचा प्रशिक्षक कोण?

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (BCCI) भारतीय क्रिकेट संघाच्या प्रमुख प्रशिक्षक पदासाठी 2000 पेक्षा जास्त अर्ज आले आहेत. मात्र, या 2000 हजार अर्जांमध्ये विद्यमान प्रशिक्षक रवी शास्री यांना टक्कर देऊ शकतील अशी नावं फार कमी आहेत, असा दावा बंगळुरु मिररच्या रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे.

परदेशी खेळाडूंचेही अर्ज

या रिपोर्टनुसार, ऑस्ट्रेलियाचे माजी अष्टपैलू खेळाडू टॉम मूडी (Tom Moody) यांनीही या पदासाठी अर्ज केला आहे. टॉम मूडी यांच्याकडे प्रशिक्षकाचा अनुभव आहे. त्यांनी भारतीय संघाच्या प्रमुख प्रशिक्षक पदासाठी अर्ज केला आहे. त्याशिवाय, न्यूझीलंडचे माजी आणि सध्या किंग्स इलेव्हन पंजाबचे प्रमुख कोच माईक हेसन यांनीही अर्ज पाठवला आहे. भारतीय संघाचे माजी खेळाडू रॉबिन सिंह आणि लालचंद राजपूत यांनीही संघाच्या प्रशिक्षक पदासाठी अर्ज पाठवला आहे.

BCCI समोर पेच

श्रीलंकेचे माजी कर्णधार माहेला जयवर्धने यांनी टीम इंडियाचे प्रमुख प्रशिक्षक व्हायला आवडेल, असं म्हटलं होतं. मात्र, त्यांनी अद्यापही यासाठी अर्ज पाठवलेला नाही. अनेक आंतरराष्ट्रीय खेळाडूंनी अर्ज पाठवल्याचा दावा मिररने केला आहे. त्यामुळे BCCI ला सर्व नावांचं मूल्यांकन करुन निर्णय घ्यायला वेळ लागू शकतो. शॉर्ट लिस्टेड उमेदवारांच्या मुलाखतीत कुठलाही पक्षपात होणार नाही आणि त्यानंतर नवीन प्रशिक्षकांची निवड केली जाईल, असं क्रिकेट सल्लागार समितीचे (CAC) सह-सदस्य अंशुमान गायकवाड यांनी सांगितलं.

वेस्ट इंडिज दौऱ्यानंतर रवी शास्रींचा कार्यकाळ संपणार

दक्षिण आफ्रिकेचे माजी खेळाडू ज्याँटी रोड्सने क्षेत्ररक्षण प्रशिक्षक पदासाठी अर्ज केला आहे. भारतीय संघाच्या सध्याच्या प्रशिक्षक कर्मचाऱ्यांचा कार्यकाळ वेस्ट इंडिज दौऱ्यापर्यंत वाढवण्यात आला आहे. संघाच्या प्रशिक्षक पदाचा करार हा विश्वचषकापर्यंतचा होता. मात्र, प्रशिक्षक कर्मचाऱ्यांचा कार्यकाळ 45 दिवसांनी वाढवण्यात आला आहे. आता वेस्ट इंडिज दौरा संपेपर्यंत रवी शास्री हे संघाचे प्रशिक्षक राहाणार आहेत. येत्या 3 ऑगस्ट ते 30 ऑगस्टपर्यंत भारतीय संघ वेस्ट इंडिज दौऱ्यावर असेल. यादरम्यान, संघ अमेरिका आणि कॅरिबियनमध्ये तीन 20-20 आंतरराष्ट्रीय, तीन एकदिवसीय आणि दोन कसोटी सामने खेळणार आहे.

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज वेळापत्रक

3 ऑगस्ट : पहिला T20 सामना
4 ऑगस्ट : दुसरा T20 सामना
6 ऑगस्ट : तिसरा T20 सामना
8 ऑगस्ट : पहिला वन डे सामना
11 ऑगस्ट : दुसरा वन डे सामना
14 ऑगस्ट : तिसरा वन डे सामना
22 ते 26 ऑगस्ट : पहिली कसोटी
30 ऑगस्ट : दुसरी कसोटी

संबंधित बातम्या :

रवी शास्त्री नव्हे, भारताच्या प्रशिक्षकपदासाठी ‘हे’ नाव आघाडीवर

पृथ्वी शॉ डोपिंगमध्ये दोषी, बीसीसीआयकडून निलंबनाची कारवाई

प्रशिक्षक म्हणून पुन्हा रवी शास्त्रींना संधी मिळाली तर आनंदच : विराट कोहली

रोहितसोबतच्या वादावर विराट कोहली म्हणतो…

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *