रोहितसोबतच्या वादावर विराट कोहली म्हणतो…

Nupur Chilkulwar

|

Updated on: Jul 29, 2019 | 7:24 PM

विश्वचषकानंतर विराट आणि रोहितमध्ये काहीतरी खटके उडाल्याचं पाहायला मिळत होतं. यासर्वांवर अखेर विराटने मौन सोडलं आहे. वेस्ट इंडिज दौऱ्यापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत त्याने या मुद्यावर भाष्य केलं.

रोहितसोबतच्या वादावर विराट कोहली म्हणतो...
Follow us

मुंबई : भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि हिटमॅन रोहित शर्मा यांच्यातील अंतर्गत वाद हा विश्वचषकानंतर चव्हाट्यावर आला. विश्वचषकाच्या सेमीफायनल सामन्यात पराभव स्वीकारावा लागल्याने संघाचा उप-कर्णधार रोहित शर्मा नाराज होता. विश्वचषकानंतर विराट आणि रोहितमध्ये काहीतरी खटके उडाल्याचं पाहायला मिळत होतं. यासर्वांवर अखेर विराटने मौन सोडलं आहे. वेस्ट इंडिज दौऱ्यापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत त्याने या मुद्यावर भाष्य केलं. ‘जर असं काहीही असतं तर रोहितने इतक्या उत्कृष्ट खेळाचं प्रदर्शन केलं नसतं’, असं विराट म्हणाला.

वेस्ट इंडिज दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी आज (29 जुलै) पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी भारतीय संघाचे प्रशिक्षक रवी शास्री आणि कर्णधार विराट कोहलीने पत्रकारांच्या प्रश्नांची उत्तरं दिली. विश्वचषक संपल्यापासून कर्णधार आणि उपकर्णधार यांच्या वादाची चर्चा होऊ लागली होती. इतकंच नाही तर रोहित शर्माने विराटसोबतच पत्नी अनुष्काला सोशल मीडियावर अनफॉलो देखील केलं. त्यामुळे या खेळाडूंचा अंतर्गत वाद हा ड्रेसिंगरुमपर्यंत न राहता घरापर्यंत पोहोचला. आज घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत पत्रकारांनी विराटला रोहितसोबतच्या वादावर प्रश्न विचारला.

पत्रकारांच्या प्रश्नावर विराटने हा मुद्दाच फेटाळून लावला. “मी देखील याबाबत ऐकून आहे. चांगल्या खेळासाठी ड्रेसिंगरुममधील वातावरण खूप महत्त्वाचं असतं. जर हे खरं असतं (विराट-रोहितमधील वाद), तर तो इतक्या उत्कृष्ट खेळाचं प्रदर्शन करु शकला नसता”, असं उत्तर विराटने दिलं. त्याच्या या उत्तरावरुन त्याच्या आणि रोहितमध्ये कुठलाही वाद नसल्याचं विराटने स्पष्ट केलं. विश्वचषकातील पराभवानंतर आज पहिल्यांदाच विराट कोहली अधिकृतरित्या माध्यमांसमोर आला.

भारतीय संघ येत्या 3 ऑगस्टपासून वेस्ट इंडिज दौऱ्यावर राहिल. तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेने या दौऱ्याची सुरुवात होईल. यातील पहिले दोन सामने हे अमेरिकेच्या फ्लोरिडा येथे खेळवले जातील.

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज वेळापत्रक

3 ऑगस्ट : पहिला T20 सामना 4 ऑगस्ट : दुसरा T20 सामना 6 ऑगस्ट : तिसरा T20 सामना 8 ऑगस्ट : पहिला वन डे सामना 11 ऑगस्ट : दुसरा वन डे सामना 14 ऑगस्ट : तिसरा वन डे सामना 22 ते 26 ऑगस्ट : पहिली कसोटी 30 ऑगस्ट : दुसरी कसोटी

संबंधित बातम्या :

विश्वचषकातील पराभवानंतरही विराट कोहलीच कर्णधार असल्याने सुनिल गावस्कर नाराज

…म्हणून रोहित शर्माने अनुष्काला अनफॉलो केलं!

विंडीज दौऱ्यासाठी कोहली उपलब्ध, रोहितकडे कर्णधारपद जाण्याच्या भीतीने निर्णय?

भारतीय संघ इंग्लंडमध्ये अडकला, रोहित शर्मा एकटाच मुंबईत परतला

Non Stop LIVE Update

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI