भारतीय संघ इंग्लंडमध्ये अडकला, रोहित शर्मा एकटाच मुंबईत परतला

संपूर्ण भारतीय संघ इंग्लंडमध्ये अडकलेला असताना रोहित शर्मा मात्र मुंबईत परतला आहे. 13 जुलैला रोहित शर्मा टीम इंडियाशिवाय मुंबई विमानतळावर पोहोचला. यावेळी त्याच्यासोबत त्याची पत्नी आणि मुलगी होती.

भारतीय संघ इंग्लंडमध्ये अडकला, रोहित शर्मा एकटाच मुंबईत परतला

मुंबई : आयसीसी विश्वचषक 2019 च्या सेमीफायनलमध्ये न्यूझीलंडने भारताचा 18 धावांनी पराभव केला. टीम इंडिया विश्वचषकातून बाहेर झाल्याने भारतीयांच्या विश्वचषक जिंकण्याच्या सर्व आशा मावळल्या. या पराभवाने टीम इंडियाचा उप-कर्णधार ‘हिट-मॅन’ रोहित शर्मा सर्वात जास्त निराश झाला. सामन्यात पराभव झाल्यानंतर, भारत फायनलपर्यंत पोहोचू शकला नाही याचं दु:ख त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होतं. त्यानंतर आज रोहित शर्मा त्याच्या कुटुंबासह मुंबईत परतला. विशेष म्हणजे रोहित शर्मा हा एकटाच परतला आहे. भारतीय संघ अद्यापही लंडनमध्येच आहे.

 

View this post on Instagram

 

#rohitsharma takes the drivers seat as he heads back home #viralbhayani @viralbhayani

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani) on

भारत-न्यूझींलंड सामन्यानंतर भारतीय चाहते पुरते निराश झाले. लंडनला विश्वचषक पाहायला गेलेले सर्व प्रेक्षक सामन्यानंतर भारतात परतत होते. त्यामुळे सर्व फ्लाईट फूल झाल्या आणि अद्यापही टीम इंडियाला परत मायदेशी येण्यासाठी तिकीट मिळालेलं नाही. त्यामुळे टीम इंडिया अजूनही इंग्लंडमध्येच अडकून आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, BCCI भारतीय खेळाडूंच्या रिटर्न तिकिटांची व्यवस्था अद्याप करु शकली नाही. त्यामुळे रविवारपर्यंत भारतीय संघाला मँचेस्टरमध्येच राहावं लागणार आहे.

संपूर्ण भारतीय संघ इंग्लंडमध्ये अडकलेला असताना रोहित शर्मा मात्र मुंबईत परतला आहे. 13 जुलैला रोहित शर्मा टीम इंडियाशिवाय मुंबई विमानतळावर पोहोचला. यावेळी त्याच्यासोबत त्याची पत्नी आणि मुलगी होती. यावेळीही रोहित शर्मा हा नाराज दिसून आला. मुंबईला परतण्यापूर्वी रोहितने त्याच्या चाहत्यांसाठी एक भावनिक पोस्ट शेअर केली होती. “जेव्हा टीमने चांगलं खेळण्याची गरज होती, तेव्हा आम्ही ते करु शकलो नाही. 30 मिनिटांच्या खराब खेळीमुळे विश्वचषक आपल्यापासून दूर गेला”, असं रोहितने या पोस्टमध्ये लिहिलं होतं.

टीम इंडियाचे इतर खेळाडू 14 जुलैला भारतात परतण्याची शक्यता आहे. यामध्ये काही खेळाडू नवी दिल्ली तर काही खेळाडू मुंबईत उतरतील. तर काहीजण इंग्लंडवरुन फिरण्यासाठी विविध ठिकाणी जाणार आहेत.

रोहित शर्माने विश्वचषक 2019 मध्ये पाच शतकं आणि एक अर्धशतक ठोकलं. या विश्वचषकात त्याने 648 धाव्या केल्या. मात्र, सेमीफायलन रोहित शर्मा केवळ एक धाव काढू शकला. तरीही तो विश्वचषक 2019 मध्ये सर्वात अधिक धावा काढलेला खेळाडू ठरला आहे.

संबंधित बातम्या :

पराभवानंतरही भारतीय संघावर पैशांचा पाऊस, विश्वविजेत्याचं बक्षीस किती?

धोनीला 7 व्या क्रमांकावर का पाठवलं? कोहली आणि शास्त्रींना जाब विचारला जाणार?

पराभवानंतर फलंदाजी प्रशिक्षक संजय बांगर बीसीसीआयच्या निशाण्यावर?

… म्हणून जगातल्या सर्वोत्कृष्ट यष्टीरक्षकानेही धोनीचे आभार मानले

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *