… म्हणून जगातल्या सर्वोत्कृष्ट यष्टीरक्षकानेही धोनीचे आभार मानले

विश्वचषकातील सेमीफायनलमध्ये भारत विरुद्ध न्युझीलंड सामन्यात भारताला पराभव पत्कारावा लागला. पण पराभवानंतरही महेंद्र सिंह धोनीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

... म्हणून जगातल्या सर्वोत्कृष्ट यष्टीरक्षकानेही धोनीचे आभार मानले

मुंबई : विश्वचषकातील सेमीफायनलमध्ये भारत विरुद्ध न्युझीलंड सामन्यात भारताला पराभव पत्कारावा लागला. पण पराभवानंतरही महेंद्र सिंह धोनीचे सर्वत्र कौतुक होत आहे. या सामन्यात रोहित शर्मा, विराट कोहलीसारखे फंलदाज एक धावा करत बाद झाले. पण धोनीने मात्र अर्धशतक पूर्ण केले. त्याच्या चाहत्यांशिवायही अनेक दिग्गजांनी धोनीचे कौतुक केले. यामध्येच जगातील सर्वोत्कृष्ट यष्टीरक्षक एडम गिलक्रिस्टचाही समावेश आहे. गिलक्रिस्टनेही ट्वीट करत धोनीचे कौतुक केले आहे.

एडम गिलक्रिस्टने ट्वीट करत म्हटले, “तुम्ही पुढे जाऊन खेळणार की नाही माहित नाही. पण तुम्ही क्रिकेटला खूप काही दिले. तुमचा शांत स्वभाव आणि आत्मविश्वास खूप कौतुकास्पद आहे”.

न्युझीलंड विरुद्ध 350 व्या सामन्यात धोनीने 50 धावांची शानदार खेळी केली. पण संघाला विजयी करण्यात अपयश आले. धोनीने विश्वचषक सामन्यात रवींद्र जडेजासोबत मिळून सातव्या विकेटसाठी सर्वात मोठी भागीदारी करत रेकॉर्ड केला. पण ही भागीदारी भारताला विजयी करु शकली नाही.

भारताने आपले सहा विकेट 92 धावांवर गमावले होते आणि भारताची पराभवाच्या दिशेने वाटचाल सुरु झाली होती. पण जडेजा आणि धोनीने सातव्या विकेटसाठी 116 धावा जोडत संघाला सामन्यात वाचवून ठेवले. दरम्यान, शेवटच्या षटकात दोन्ही खेळाडू पॅव्हेलियनमध्ये परतले.

विश्वचषकाच सातव्या विकेटसाठी ही सर्वात मोठी आणि पहिली शतकीय भागीदारी आहे. यापूर्वी वेस्टइंडीजच्या रेडली जॅकब्स आणि रामनरेश सरवनने 13 फेब्रुवारी 2003 रोजी न्युझीलंड विरुद्ध 98 धावांची भागीदारी केली होती. जडेजा आणि धोनीने न्युझीलंड विरुद्ध सामन्यात जॅकब्स आणि सरवनचा विक्रम मोडला. जडेजाने 59 चेंडूत 4 चौकार आणि 77 धावा केल्या. धोनीने 72 चेंडूत चार चौकार आणि एक षटकार करत 50 धावा केल्या.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI