विश्वचषकातील पराभवानंतरही विराट कोहलीच कर्णधार असल्याने सुनिल गावस्कर नाराज

माजी कर्णधार सुनिल गावस्कर यांनी विश्वचषकातील सेमीफायनल सामन्यात भारताच्या पराभवानंतरही विराट कोहलीच्या कर्णधार असण्यावर आक्षेप घेतला आहे. कोहलीला पुन्हा कर्णधारपद सोपवण्यापूर्वी अधिकृत बैठक होणे गरजेचं होतं, असं मत त्यांनी मांडलं.

विश्वचषकातील पराभवानंतरही विराट कोहलीच कर्णधार असल्याने सुनिल गावस्कर नाराज

मुंबई : भारतातील सर्वोत्कृष्ट फलंदाजांपैकी एक आणि माजी कर्णधार सुनिल गावस्कर यांनी विश्वचषकातील सेमीफायनल सामन्यात भारताच्या पराभवानंतरही विराट कोहलीच्या कर्णधार असण्यावर आक्षेप घेतला आहे. कोहलीला पुन्हा कर्णधारपद सोपवण्यापूर्वी अधिकृत बैठक होणे गरजेचं होतं, असं मत त्यांनी मांडलं. ‘प्रशासक समितीने वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी कर्णधार विना बैठकीशिवाय निवडला असेल, तर विराट कोहली हा त्याच्या कर्तुत्वाने कर्णधार झालाय, की प्रशासक समितीमुळे हा प्रश्न उपस्थित होतो’, असं सुनिल गावस्कर यांनी एका इंग्रजी वृत्तपत्रातील लेखात म्हटलं आहे.

‘माझ्या माहितीनुसार, कोहलीची नियुक्ती विश्वचषकापर्यंतच होती. यानंतर प्रशासक समितीला याबाबत चर्चा करण्यासाठी बैठक बोलवायला हवी होती. मला माहित आहे, ही बैठक पाच मिनिटंच चालली असती. पण ती बैठक होणं गरजेचं होतं’, असं मतं गावस्कर यांनी त्यांच्या लेखात मांडलं.

एमएसके प्रसादच्या अध्यक्षतेखाली अखिल भारतीय प्रशासक समितीने वेस्ट इंडिज दौऱ्यातील तिन्ही प्रकारांसाठी विराट कोहलीला कर्णधार नियुक्त केलं आहे. फ्लोरिडामध्ये होणाऱ्या टी-20 मालिकेपासून या दौऱ्याची सुरुवात होणार आहे.

विश्वचषकात भारताच्या प्रदर्शानावर आवाढा बैठक घेण्यात येणार नसल्याचं प्रशासक समितीने आधीच स्पष्ट केलं होतं. गावस्करांनी या सर्व मुद्यावर प्रश्न उपस्थित केला. कोहलीला त्याच्या मनाप्रमाणे, त्याला हवा तो संघ निवडण्याचा अधिकार का? असं गावस्करांनी म्हटलं.

‘प्रशासक समितीतील लोक हे कठपुतळी आहेत. पुनर्नियुक्तिनंतर कोहलीला संघाबाबत त्याचे विचार मांडण्यासाठी बैठक बोलावण्यात आली होती. या प्रक्रियेला मागे टाकत केदार जाधव, दिनेश कार्तिक यांच्या खराब प्रदर्शनामुळे त्यांना संघातून बाहेर करण्यात आल्याचं सांगितलं गेलं. मात्र, विश्वचषकापूर्वी विराटने याच खेळाडुंवर विश्वास दाखवला होता. याचा परिणाम असा झाला की, संघ अंतिम फेरीपर्यंतही पोहोचू शकला नाही’, असंही गावस्कर म्हणाले.

संबंधित बातम्या :

इंग्लंडकडून अपमानाचा बदला, आयर्लंडला फक्त 38 धावात गुंडाळलं

पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज मोहम्मद आमीरची तडकाफडकी निवृत्ती

अखेरच्या सामन्यात 3 विकेट्स घेऊन यॉर्कर किंगचा क्रिकेटला अलविदा

विराट कोहलीच्या एका इंस्टाग्राम पोस्टची कमाई मॅचच्या 22 पट जास्त

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *