प्रशिक्षक म्हणून पुन्हा रवी शास्त्रींना संधी मिळाली तर आनंदच : विराट कोहली

आयसीसी विश्वचषकाच्या सेमीफायनल सामन्यात भारताचा पराभव झाला. त्यानंतर संघाचे प्रशिक्षक रवी शास्री यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली. तरीही रवी शास्री हेच भारतीय संघाचे प्रशिक्षक म्हणून असावे, अशी कर्णधार विराट कोहलीची इच्छा आहे.

प्रशिक्षक म्हणून पुन्हा रवी शास्त्रींना संधी मिळाली तर आनंदच : विराट कोहली
Follow us
| Updated on: Jul 29, 2019 | 11:13 PM

मुंबई : आयसीसी विश्वचषकाच्या सेमीफायनल सामन्यात भारताचा पराभव झाला. त्यानंतर संघाचे प्रशिक्षक रवी शास्री यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली. तरीही रवी शास्री हेच भारतीय संघाचे प्रशिक्षक म्हणून असावे, अशी कर्णधार विराट कोहलीची इच्छा आहे. संघाच्या प्रशिक्षक पदाचा करार हा विश्वचषकापर्यंतचा होता. मात्र, शास्रींचा कार्यकाळ 45 दिवसांनी वाढवण्यात आला आहे. आता वेस्ट इंडिज दौरा संपेपर्यंत रवी शास्री हे संघाचे प्रशिक्षक राहाणार आहेत. जर रवी शास्री यांना पुन्हा संघाचा प्रशिक्षक होण्याची संधी मिळाली तर मला आनंद होईल, असं विराट म्हणाला.

वेस्ट इंडिज दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी आज (29 जुलै) मुंबईत पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्री आणि कर्णधार विराट कोहलीने पत्रकारांच्या प्रश्नांची उत्तरं दिली.

‘सीएसीने (क्रिकेट सल्लागार समिती) या मुद्यावर अद्याप मला विचारणा केलेली नाही. रवी शास्रींसोबत आम्हा सर्वांचा समन्वय चांगला आहे. त्यामुळे जर ते पुन्हा प्रशिक्षक झाले, तर आम्हाला आनंद होईल’, असं विराट म्हणाला. तसेच, ‘याचा निर्णय सीएसीला घ्यायचा आहे’, असंही विराटने सांगितलं.

भारतीय संघाच्या नव्या मुख्य प्रशिक्षकाच्या नियुक्तीसाठी येत्या 13 किंवा 14 ऑगस्टला मुलाखत घेण्यात येणार आहे. यासाठी अर्ज पाठवण्याची शेवटीची तारीख 30 जुलै आहे. प्रशासक समितीने (CoA) संघाच्या प्रशिक्षकांची निवड करण्यासाठी नवीन ‘क्रिकेट सल्लागार समिती (सीएसी)’ स्थापन केली आहे. या समितीत माजी कर्णधार कपील देव, माजी खेळाडू अंशूमन गायकवाड आणि शांथा रंगास्वामी आहेत. हे समिती भारतीय संघाच्या नव्या प्रशिक्षकाची निवड करेल.

भारतीय संघ येत्या 3 ऑगस्टपासून वेस्ट इंडिज दौऱ्यावर राहील. तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेने या दौऱ्याची सुरुवात होईल. यातील पहिले दोन सामने हे अमेरिकेच्या फ्लोरिडा येथे खेळवले जातील.

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज वेळापत्रक

3 ऑगस्ट : पहिला T20 सामना 4 ऑगस्ट : दुसरा T20 सामना 6 ऑगस्ट : तिसरा T20 सामना 8 ऑगस्ट : पहिला वन डे सामना 11 ऑगस्ट : दुसरा वन डे सामना 14 ऑगस्ट : तिसरा वन डे सामना 22 ते 26 ऑगस्ट : पहिली कसोटी 30 ऑगस्ट : दुसरी कसोटी

संबंधित बातम्या :

विश्वचषकातील पराभवानंतरही विराट कोहलीच कर्णधार असल्याने सुनिल गावस्कर नाराज

…म्हणून रोहित शर्माने अनुष्काला अनफॉलो केलं!

विंडीज दौऱ्यासाठी कोहली उपलब्ध, रोहितकडे कर्णधारपद जाण्याच्या भीतीने निर्णय?

भारतीय संघ इंग्लंडमध्ये अडकला, रोहित शर्मा एकटाच मुंबईत परतला

Non Stop LIVE Update
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा.
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा.
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?.
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण...
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण....
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि...
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि....