AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

MPL साठी 244 खेळाडूंचा लिलाव संपन्न, आशुतोष शर्मा ठरला महागडा खेळाडू, महानआर्यमन म्हणाले, MPL टॅलेंट शोधण्याचे मोठे व्यासपीठ

आज इंदौरमधील ब्रिलियंट कन्व्हेन्शन सेंटरमध्ये मध्यप्रदेश क्रिकेट लीगच्या तिसऱ्या हंगामासाठी 10 पुरुष संघांसाठी खेळाडूंच्या लिलावाची प्रक्रिया पूर्ण झाली. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

MPL साठी 244 खेळाडूंचा लिलाव संपन्न, आशुतोष शर्मा ठरला महागडा खेळाडू, महानआर्यमन म्हणाले, MPL टॅलेंट शोधण्याचे मोठे व्यासपीठ
MPL T20Image Credit source: TV 9 Marathi
| Updated on: Mar 31, 2026 | 9:16 PM
Share

मध्यप्रदेश क्रिकेट लीगच्या तिसऱ्या हंगामाची सुरुवात झाली आहे. आज इंदौरमधील ब्रिलियंट कन्व्हेन्शन सेंटरमध्ये 10 पुरुष संघांसाठी खेळाडूंच्या लिलावाची प्रक्रिया पूर्ण झाली. एमपीएलमधील ग्रेड ए खेळाडू जसे की वेंकटेश, रजत पाटीदार, अनिकेत वर्मा आणि आशुतोष शर्मा यांना आपल्या संघात घेण्यासाठी संघमालकांमध्ये तीव्र स्पर्धा पाहायला मिळाली.

प्रथमच एमपीएल लिलावात सहभागी झालेल्या आयपीएलमधील दिल्ली डेअरडेव्हिल्सचा स्टार खेळाडू आशुतोष शर्मा याच्यासाठी सर्व संघांमध्ये चुरस होती. मालवा स्टॅलियन्सने 15 लाखांची बोली लावून आशुतोष शर्माला या हंगामातील सर्वात महाग खेळाडू बनवले. त्यानंतर अक्षत रघुवंशी 13 लाख 80 हजार, अनिकेत वर्मा 13 लाख 20 हजार, शिवांग कुमार 13 लाख, मंगेश यादव 12 लाख, माधव तिवारी 10 लाख 60 हजार आणि सारांश जैन 9 लाख 60 हजारांत विकले गेले. अशाप्रकारे शेकडो खेळाडूंवर बोली लावण्यात आली.

यंदा 10 पुरुष संघ खेळणार

मध्यप्रदेश क्रिकेट लीगमध्ये यंदा मालवा, निमाड आणि उज्जैन या 3 नवीन संघांचा समावेश झाला आहे. तसेच 2 नवीन महिला संघांचाही समावेश करण्यात आला आहे.

महानआर्यमन सिंधिया यांनी उद्घाटन केले

एमपीसीएचे अध्यक्ष महानआर्यमन सिंधिया यांनी लिलावाचे उद्घाटन केले. त्यांनी सर्व फ्रँचायझी मालक आणि उपस्थितांना संबोधित करताना म्हटले की, ‘एमपीएल हे मध्यप्रदेशातील क्रिकेट प्रतिभेला ओळख देणारे, व्यासपीठ उपलब्ध करून देणारे आणि पुढे नेणारे उत्कृष्ट माध्यम बनले आहे. एमपीएलमधून अनेक खेळाडू उत्तम कामगिरी करून आयपीएल, डब्ल्यूपीएल आणि भारतीय संघात निवडले जात आहेत. यंदा प्रथमच लिलाव होत असून, सर्व फ्रँचायझी मालक आपापले संघ उभारण्यासाठी मोठी मेहनत घेत आहेत. प्लेयर डेव्हलपमेंट प्रोग्राममुळे अनेक खेळाडूंना फ्रँचायझी संघ मिळून त्यांना उत्तम संधी मिळत आहे.

प्रसिद्ध क्रीडा अँकर चारू शर्मा यांचे सूत्रसंचालन

भारतीय क्रिकेट आणि इतर खेळांशी संबंधित प्रसिद्ध क्रीडा अँकर चारू शर्मा यांनी आज लिलावाचे सूत्रसंचालन केले. त्यांनी अत्यंत व्यावसायिक पद्धतीने संपूर्ण लिलाव पार पाडला.

Follow Us
कुठलं काय, अरे... तो एक प्रश्न अन् एकनाथ शिंदे संतापले, पहा व्हिडीओ...
कुठलं काय, अरे... तो एक प्रश्न अन् एकनाथ शिंदे संतापले, पहा व्हिडीओ....
सोनं, कपडे घेतले अन् मंडपात उभं राहायला नकार, PSI कडून मोठी फसवणूक...
सोनं, कपडे घेतले अन् मंडपात उभं राहायला नकार, PSI कडून मोठी फसवणूक....
ठाणे विधान परिषदेबाबत मोठं घडणार? बहुजन विकास आघाडीचे नेते शिंदेंना...
ठाणे विधान परिषदेबाबत मोठं घडणार? बहुजन विकास आघाडीचे नेते शिंदेंना....
आमदारांचे स्टिकर लावून फिरणाऱ्याची पोलिसांनी काढली हवा! शिरूरमध्ये पोल
आमदारांचे स्टिकर लावून फिरणाऱ्याची पोलिसांनी काढली हवा! शिरूरमध्ये पोल.
कांदा मोर्चात सपकाळांची जीभ घसरली; मोदींवर टीका करताना वादग्रस्त....
कांदा मोर्चात सपकाळांची जीभ घसरली; मोदींवर टीका करताना वादग्रस्त.....
दिल्लीत अमित शाहांची भेट का घेतली, एकनाथ शिंदेंच्या उत्तराने चर्चेला..
दिल्लीत अमित शाहांची भेट का घेतली, एकनाथ शिंदेंच्या उत्तराने चर्चेला...
कांदाप्रश्न सोडव्यासाठी थेट दिल्लीला साकडं, सरकारचं शिष्टमंडळ राजधानीत
कांदाप्रश्न सोडव्यासाठी थेट दिल्लीला साकडं, सरकारचं शिष्टमंडळ राजधानीत.
आता काही खरं नाही! मोटेगावकरचा पाय आणखी खोलात, NEET स्पेशल बॅचबाबत...
आता काही खरं नाही! मोटेगावकरचा पाय आणखी खोलात, NEET स्पेशल बॅचबाबत....
महायुतीतील तिढा आज सुटणार? मुख्यमंत्र्यांनी बोलावली महत्त्वाची बैठक
महायुतीतील तिढा आज सुटणार? मुख्यमंत्र्यांनी बोलावली महत्त्वाची बैठक.
इंधन संकटामुळे ST महामंडळ अलर्ट मोडवर; प्रताप सरनाईकांचा मोठा निर्णय!
इंधन संकटामुळे ST महामंडळ अलर्ट मोडवर; प्रताप सरनाईकांचा मोठा निर्णय!.