बंगळुरुच्या विजयापेक्षा ‘या’ तरुणीचीच चर्चा

बंगळुरुच्या विजयापेक्षा 'या' तरुणीचीच चर्चा

बंगळुरु : इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) क्रिकेट विश्वातील सर्वात महत्त्वाची लीग मानली जाते. या लीगमुळे आतापर्यंत अनेक खेळाडूंचे नशीब पालटलंय. खेळाडूंप्रमाणे क्रिकेटचे अनेक चाहतेही यामुळे जगभरात प्रसिद्ध झाले आहे. नुकतंच आयपीएलच्या चेन्नास्वामी स्टेडिअमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद हा सामना खेळवण्यात आला. मात्र या सामन्यात मैदानातील खेळाडूपेंक्षा पॅव्हिलिअनमध्ये बसलेल्या एका मुलीने सर्वांचेच लक्ष वेधून […]

Namrata Patil

|

Jul 05, 2019 | 3:48 PM

बंगळुरु : इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) क्रिकेट विश्वातील सर्वात महत्त्वाची लीग मानली जाते. या लीगमुळे आतापर्यंत अनेक खेळाडूंचे नशीब पालटलंय. खेळाडूंप्रमाणे क्रिकेटचे अनेक चाहतेही यामुळे जगभरात प्रसिद्ध झाले आहे. नुकतंच आयपीएलच्या चेन्नास्वामी स्टेडिअमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद हा सामना खेळवण्यात आला. मात्र या सामन्यात मैदानातील खेळाडूपेंक्षा पॅव्हिलिअनमध्ये बसलेल्या एका मुलीने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले.

मॅचदरम्यान नेमकं काय घडलं?

आयपीएलच्या 11 व्या सीझनमधील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद हा सामना बंगळुरुच्या चेन्नास्वामी स्टेडिअममध्ये खेळवण्यात आला. यात RCB ने 178 धावा रचत सनरायझर्स हैदराबादवर विजय मिळवला. या सामन्यानंतर मैदानात उपस्थित असलेल्या RCB अनेक चाहत्यांनी सेलिब्रेशन केले. यावेळी या मैदानात दीपिका घोष नावाची मुलगी उपस्थित होती. दीपिका ही RCB ची खूप मोठी चाहती आहे. RCB च्या विजयानंतर इतर चाहत्यांप्रमाणे दीपिकाही सेलिब्रेशनमध्ये व्यस्त होती.

लाल रंगाचा क्रॉप टॉप घातलेली दीपिका, तिची स्टाईल, लुक, आत्मविश्वास या सर्व गोष्टीमुळे मैदानातील काही कॅमेरामनने तिचे फोटो काढले. दीपिकाचे हे फोटो मैदानातील स्क्रीनवर झळकले आणि त्यानंतर अवघ्या काही तासात RCB ची ‘सर्वात मोठी चाहती’ म्हणून घोषित करण्यात आले. विशेष म्हणजे यानंतर दिपीकाला ‘नॅशनल क्रश’ म्हणून ओळख मिळाली आहे.

View this post on Instagram

#RCB girl forever ❤️?

A post shared by deepika (@deeghose) on

दीपिकाच्या व्हायरल झालेल्या फोटोनंतर सध्या इन्स्टाग्रामवर #RCBgirl हा हॅशटॅगही ट्रेंड होत होता. तसेच तिने सोशल मीडियावर अपलोड केलेल्या अनेक फोटोवर हजारो कमेंट नेटकऱ्यांनी केल्या. विशेष म्हणजे दीपिकाचा फोटो व्हायरल होण्याआधी तिचे इन्स्टाग्रामवर केवळ 5 हजार फॉलोवर्स होते. मात्र आता तिच्या फॉलोवर्समध्ये कमालीची वाढ झाली असून ते जवळपास 2 लाख इतकी झाली आहे.

कोण आहे दीपिका ?

दीपिका घोष ही बॉलिवूडमधील स्टायलिस्ट आहे. त्याशिवाय ती क्रिकेटची खूप मोठी चाहती आहे. याआधी दिपीका कित्येकदा आयपीएल सामना पाहण्यासाठी आली आहे. एका रात्रीत स्टार बनलेल्या दीपिकाने तिच्या इन्स्टाग्रामच्या प्रोफाईल #theRCBgirl असे लिहिले आहे.  तिच्या इन्स्टाग्रामवर तिने आलिया भट्ट, रणवीर सिंग यांसह इतर बॉलिवूड कलाकारांसोबतचे फोटो अपलोड केलेत.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें