…म्हणून ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारताचं पारडं जड : कांबळी

मुंबई : वेस्ट इंडिजसोबतचा सध्या सुरु असलेला मुकाबला संपल्यानंतर टीम इंडिया ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार असून, ऑस्ट्रेलियातील टीम इंडियाच्या कामगिरीची क्रिकेट रसिकांना मोठी उत्सुकता आहे. मात्र, ऑस्ट्रेलिया दौऱ्यात टीम इंडियाचं पारडं जड असेल, असा अंदाज भारताचा माजी क्रिकेटर विनोद कांबळीने वर्तवला आहे. तसेच, ऑस्ट्रेलियाविरोधातील कसोटी मालिका टीम इंडिया सहजपणे खिशात घालेल, असा विश्वासही विनोद कांबळीने व्यक्त […]

...म्हणून ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारताचं पारडं जड : कांबळी
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 5:03 PM

मुंबई : वेस्ट इंडिजसोबतचा सध्या सुरु असलेला मुकाबला संपल्यानंतर टीम इंडिया ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार असून, ऑस्ट्रेलियातील टीम इंडियाच्या कामगिरीची क्रिकेट रसिकांना मोठी उत्सुकता आहे. मात्र, ऑस्ट्रेलिया दौऱ्यात टीम इंडियाचं पारडं जड असेल, असा अंदाज भारताचा माजी क्रिकेटर विनोद कांबळीने वर्तवला आहे. तसेच, ऑस्ट्रेलियाविरोधातील कसोटी मालिका टीम इंडिया सहजपणे खिशात घालेल, असा विश्वासही विनोद कांबळीने व्यक्त केला.

विनोद कांबळीने नेमका काय अंदाज व्यक्त केला?

“स्टीव्ह स्मिथ आणि डेव्हीड वॉर्नर यांच्या अनुपस्थितीत भारत ऑस्ट्रेलियाविरूद्ध कसोटी मालिकेत खेळत आहे. त्याचा फायदा भारताला नक्की होईल. तसेच रन मशिन विराट कोहली चांगलाच फॉर्मात असल्याने भारताला ही कसोटी मालिका जिंकणं अवघड होणार नाही.”, असा अंदाज विनोद कांबळीने व्यक्त केला.

भारताच्या दौऱ्याची सुरुवात तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेने होईल, ज्यानंतर 6 डिसेंबरपासून चार सामन्यांच्या कसोटी मालिकेला सुरुवात होईल.

स्मिथ आणि वॉर्नरवर एक-एक वर्षांची बंदी

मार्च महिन्यात दक्षिण आफ्रिकेत चेंडूशी छेडछाड केल्याप्रकरणी स्मिथ आणि वॉर्नर यांच्यावर प्रत्येकी एक-एक वर्षाची बंदी घालण्यात आली होती. तर कॅमरन बॅनक्राफ्टवर नऊ महिन्यांची बंदी घातली होती. तेव्हापासून ऑस्ट्रेलिया संघाची ताकद काहीशी कमी झाली आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-20 मालिकेसाठी भारतीय संघ

विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), शिखर धवन, केएल राहुल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, दिनेश कार्तिक, रिषभ पंत (यष्टिरक्षक), कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, वॉशिंग्टन सुंदर, कृणाल पांड्या, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, उमेश यादव, खलील अहमद

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी संघ

विराट कोहली (कर्णधार), मुरली विजय, लोकेश राहुल, पृथ्वी शॉ, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, हनुमा विहारी, रोहित शर्मा, रिषभ पंत, पार्थिव पटेल, रवीचंद्रन अश्विन, रवींद्र जाडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, इशांत शर्मा, उमेश यादव, जसप्रीत बुमरा, भुवनेश्वर कुमार

ऑस्ट्रेलिया दौऱ्याचं वेळापत्रक

टी-20 मालिका

पहिला सामना – 21 नोव्हेंबर

दुसरा सामना – 23 नोव्हेंबर

तिसरा सामना – 25 नोव्हेंबर

कसोटी मालिका

पहिला सामना – 6 डिसेंबर

दुसरा सामना – 14 डिसेंबर

तिसरा सामना – 26 डिसेंबर

चौथा सामना – 3 जानेवारी

वन डे मालिका

पहिला सामना – 12 जानेवारी

दुसरा सामना – 15 जानेवारी

तिसरा सामना – 18 जानेवारी

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.