AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Corona | ‘या’ स्टार क्रिकेटपटूला कोरोनाची लागण, मोठ्या स्पर्धेला मुकणार?

या खेळाडूने कोरोनाची लागण झाल्याची माहिती ट्विटद्वारे दिली आहे.

Corona | 'या' स्टार क्रिकेटपटूला कोरोनाची लागण, मोठ्या स्पर्धेला मुकणार?
| Updated on: Nov 28, 2020 | 7:47 PM
Share

काठमांडू : देशासह जगभरात कोरोनाने (Corona) थैमान घातलं आहे. इतर क्षेत्रांसह क्रीडाक्षेत्रातील अनेक खेळाडूंना कोरोनाची लागण झाली. दरम्यान आता आणखी एका क्रिकेटपटूला कोरोनाची बाधा झाली आहे. नेपाळ क्रिकेट संघाचा युवा फिरकीपटू आणि आयपीएलमध्ये (IPL 2020) दिल्ली कॅपिट्ल्सकडून (Delhi Capitals) खेळणाऱ्या संदीप लामीछानेला (Sandeep Lamichhane)कोरोनाची लागण झाली आहे. संदीपने स्वत: ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे. संदीपने सध्या स्वत:ला काठमांडूतील घरात क्वारंटाईन केलं आहे. nepal cricket team player sandip lamichhane tested corona positive

ट्विटमध्ये काय म्हटलंय?

“माझा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आलाय, हे सांगण माझी जबाबदारी आहे. मला थकवा जाणवत होता. यानंतर मी कोरोना चाचणी केली. या कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला. बुधवारपासून मला अशक्तपणा जाणवत होता. पण आता मी ठणठणीत आहे. मी यातून वेळेत बरा झालो, तर मी लवकरच मैदानात परतेन”, असा आशावाद त्याने व्यक्त केला.

कर्णधारासह इतर खेळाडूही पॉझिटिव्ह

संदीपच्या आधी नेपाळ संघाच्या 3 खेळाडू आणि सपोर्ट स्टाफला कोरोना झाल्याची वृत्त इसपीएन क्रिकइंफोने दिलं आहे. नेपाळचा संघ काठमांडूतील त्रिभुवन विद्यापीठ स्टेडियममध्ये सरावाला सुरुवात करणार होती. मात्र त्याआधी संघातील खेळाडू पॉझिटिव्ह आल्याने सराव होणार नाही, अशीच चिन्ह दिसत आहे.

बीग बॅश लीगमध्ये खेळण्याबाबत अनिश्चितता

संदीपला कोरोनामुळे बीग बॅश लीगमध्ये (Big Bash League) सहभागी होण्यासाठी अडचण होऊ शकते. या स्पर्धेला 10 डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे. संदीपला होबार्ट हरिकेन्स संघाने (Hobart Hurricanes) आपल्या ताफ्यात समाविष्ठ केलं आहे.

संदीप लामिछानेची क्रिकेट कारकिर्द

संदीपने नेपाळकडून आतापर्यंत 10 एकदिवसीय आणि 17 टी 20 सामने खेळले आहेत. संदीपने एकदिवसीय सामन्यात 23 तर टी 20 मध्ये 27 विकेट्स घेतल्या आहेत. तसेच संदीप आयपीएलमध्ये दिल्लीचे प्रतिनिधित्व करतो. संदीपने आयपीएलमध्ये एकूण 9 सामन्यात 13 विकेट्स घेतल्या आहेत. 36 धावा देऊन 3 विकेट्स ही त्याची आयपीएलमध्ये सर्वोत्तम कामगिरी आहे.

पाकिस्तानचे 7 खेळाडू पॉझिटिव्ह

पाकिस्तानचा संघ सध्या न्यूझीलंड दौऱ्यावर आहे. पाकिस्तान क्रिकेट संघाचेही 7 खेळाडू पॉझिटिव्ह सापडले आहेत. या 7 खेळाडूंना ख्राईस्टचर्चमध्ये क्वारंटाईन करण्यात आलं आहे. पाकिस्तान या दौऱ्यात टी 20 आणि कसोटी मालिका खेळणार आहे.

संबंधित बातम्या :

BBL 2020 | 2 पॉवर प्ले, बोनस पॉइंट्स, T20 मधील तीन नव्या नियमांनी रंगत

Pakistan Tour New Zeland | पाकिस्तानला ‘सातवा’ झटका, आणखी एका खेळाडूला कोरोनाची लागण

nepal cricket team player sandip lamichhane tested corona positive

मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप
मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप.
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान.
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?.
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट.
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?.
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?.
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!.
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान.
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्..
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्...
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात.