ENG vs NZ: बोल्टच्या ‘या’ पावलानं न्यूझीलंडचं विश्वचषकाचं स्वप्न भंगलं

आयसीसी विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात ट्रेंट बोल्टच्या एका पावलानं न्यूझीलंडचं विश्वचषकावर नाव कोरण्याचं आणि जगज्जेतं होण्याचं स्वप्न भंगलं. सामन्यातील 49व्या षटकातील चौथा चेंडू न्यूझीलंडसाठी घातक ठरला.

ENG vs NZ: बोल्टच्या ‘या’ पावलानं न्यूझीलंडचं विश्वचषकाचं स्वप्न भंगलं

लंडन: आयसीसी विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात ट्रेंट बोल्टच्या एका पावलानं न्यूझीलंडचं विश्वचषकावर नाव कोरण्याचं आणि जगज्जेतं होण्याचं स्वप्न भंगलं. सामन्यातील 49व्या षटकातील चौथा चेंडू न्यूझीलंडसाठी घातक ठरला. या चेंडूवर ट्रेंट बोल्टने बेन स्टोक्सचा शानदार झेल घेतला. न्यूझीलंडचा गोलंदाज जिमी नीशम याच्यासह न्यूझीलंडचा संघ जल्लोष करणार तेवढ्यात अम्पायरने तो षटकार असल्याचे घोषित केले.

बोल्टने आटोकाट प्रयत्न करुन यशस्वीपणे झेल पकडला, मात्र काही क्षणात त्याचा तोल जाऊन त्याच्या पायाचा सीमारेषेला स्पर्श झाला. याच ठिकाणी न्यूझीलंडचे विश्वचषकाचे स्वप्न भंगले. कारण या चेंडूवर विकेट तर गेली नाहीच, सोबत इंग्लंडला 6 धावाही मिळाल्या आणि इंग्लंड विजयाच्या जवळ जाऊन पोहचली.

हा झेल सुटल्यानंतर स्टोक्सने 15 धावांची निर्णयाक खेळी केली. हा सामना बरोबरीत राखण्यात स्टोक्सची भूमिका मोठी होती. जर स्टोक्सचा झेल घेण्यात बोल्ट यशस्वी झाला असता, तर या सामन्यासह विश्वचषकावरील इंग्लंडच्या दावेदारीवरील सर्व आशा जवळजवळ मावळल्या असत्या. मात्र, या सामन्यात  नशीब इंग्लंडच्या बाजून असल्याचे पाहायला मिळाले.

न्यूझीलंडने विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. त्यांनी 8 विकेटच्या बदल्यात 241 धावा केल्या. 242 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायला मैदानात उतलेल्या इंग्लंडला देखील 50 षटकांमध्ये 241 धावांचाच पल्ला गाठता आला आणि सामना बरोबरीत राहिला. त्यामुळे दोन्ही संघांना सुपर ओव्हर खेळावी लागली. सुपर ओव्हरमध्ये प्रथम फलंदाजी करायला उतरलेल्या इंग्लंडने 15 धावा ठोकल्या.

सुपर ओव्हरमधील 15 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायला मैदानात उतरलेल्या न्यूझीलंडच्या संघाने देखील 15 धावा केल्या. सुपर ओव्हरमध्ये देखील सारख्याचा धावा झाल्या. त्यामुळे आयसीसीच्या नियमांनुसार सर्वाधिक चौकार केलेल्या संघाला विजेता म्हणून घोषित करण्यात आले. या विजयासह इंग्लंडने इतिहास रचत पहिल्यांदाच विश्वचषकावर आपले नाव कोरले.


Published On - 8:18 am, Mon, 15 July 19

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI