शानदार जबरदस्त ! गोलंदाजाचा भेदक मारा, पटकावल्या एका ओव्हरमध्ये 5 विकेट्स, वर्ल्ड रेकॉर्डला गवसणी

न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज (new zealand faster bowler) नील वॅग्नरचा (Neil Wagner) आज वाढदिवस आहे. नीलने 6 एप्रिल 2011 रोजी एका ओव्हरमध्ये म्हणजेच 6 चेंडूमध्ये 5 विकेट्स घेण्याची कामगिरी केली होती.

शानदार जबरदस्त !  गोलंदाजाचा भेदक मारा, पटकावल्या एका ओव्हरमध्ये 5 विकेट्स, वर्ल्ड रेकॉर्डला गवसणी
न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज (new zealand faster bowler) नील वॅग्नरचा (Neil Wagner) आज वाढदिवस आहे. नीलने 6 एप्रिल 2011 रोजी एका ओव्हरमध्ये म्हणजेच 6 चेंडूमध्ये 5 विकेट्स घेण्याची कामगिरी केली होती.
sanjay patil

|

Mar 13, 2021 | 1:41 PM

ऑकलंड : आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये (cricket) दररोज अनेक गोलंदाज येतात आणि जातात. प्रत्येक गोलंदाजाला आपल्या कामगिरीने छाप सोडता येतच असं नाही. काही गोलंदाज हे अपयशी ठरतात. तर काही यात यशस्वी होतात. मात्र काही गोलंदाज हे या दोन्ही पेक्षा वेगळे ठरतात. ते आपल्या कामगिरीने क्रिकेट चाहत्यांच्या मनात घर करतात. त्यापैकी एक म्हणजे न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज (Neil Wagner) नील वॅग्नर. नीलने आपल्या गोलंदाजीने आतापर्यंत शानदार कामगिरी केली आहे. नीलचा आज वाढदिवस. नीलच्या वाढदिवसानिमित्ताने आपण त्याच्याबाबत जाणून घेणार आहोत. (new zealand faster bowler neil wagner today 35 birthday)

नीलचा जन्म 13 मार्च 1986 रोजी दक्षिण आफ्रिकेतील प्रिटोरियात झाला. नीलने शाळेत असताना क्रिकेट खेळण्याची सुरुवात केली. दक्षिण आफ्रिका क्रिकेट अकादमीकडून झिंबाब्वे आणि बांगलादेशचा दौरा केला. त्याची दक्षिण आफ्रिका संघात 12 वा खेळाडू म्हणून निवड करण्यात आली. मात्र त्यानंतर नीलने आफ्रिकेला रामराम ठोकत 2008 आपला मोर्चा (New Zealand Cricket Team) न्यूझीलंडच्या दिशेने वळवला. वर्षभरात 2009 मध्ये त्याला संघात संधी मिळाली. 2012 मध्ये वेस्टइंडिज विरुद्धच्या कसोटी मालिकेतून त्याला पदार्पण करण्याची संधी मिळाली. तेव्हापासून ते आतापर्यंत नीलने मागे वळून पाहिलं नाही.

विश्व विक्रमी कामगिरी

नीलने आपल्या कसोटी कारकिर्दीत वर्ल्ड रेकॉर्ड कामगिरी केली आहे. नीलने आपल्या एका ओव्हरमध्ये म्हणजेच 6 चेंडूमध्ये 5 विकेट्स घेण्याची कामगिरी केली. त्याने ही कामगिरी 6 एप्रिल 2011 रोजी केली होती. नीलने आपल्या ओव्हरमधील पहिल्या 4 चेंडूत 4 विकेट्स घेतल्या. त्यानंतर या ओव्हरच्या शेवटच्या म्हणजेच सहाव्या चेंडूवर विकेट घेतली. यासह नीलने एका ओव्हरमध्ये 5 विकेट्स घेण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड केला. नीलने स्‍टीवर्ट रोड्स, जो ऑस्टिन स्‍मेली, जीतन पटेल, तुगागा आणि मार्क गिलेस्‍पीला माघारी पाठवलं. या सामन्यात त्याने 36 धावांच्या मोबदल्यात 6 विकेट्स घेण्याची कामगिरी केली होती.

नीलने 2013 मध्ये इंग्लंड विरुद्धच्या 5 कसोटी सामन्यांच्या मालिकेत 19 विकेट्स घेतल्या. 1 डिसेंबर 2017 ला न्यूझीलंडचा महत्वाचा गोलंदाज टीम साऊथीला दुखापत झाली. च्यामुळे नीलला ट्रेन्ट बोल्टसोबत ओपनिंग बोलिंग पार्टनर म्हणून संधी मिळाली. तेव्हा नीलने 39 धावा देत 7 विकेट्स घेत उल्लेखनीय कामगिरी केली होती.

नीलची कसोटी कारकिर्द

नीलने आतापर्यंत 51 कसोटी सामन्यांमध्ये न्यूझीलंडचं प्रतिनिधित्व केलं आहे. यामध्ये त्याने 219 विकेट्स घेतल्या आहेत. 39 धावा देत 7 विकेट्स ही त्याची सर्वोच्च वैयक्तिक खेळी ठरली. तसेच त्याने 177 फर्स्ट क्लास सामन्यात 742 विकेट्स पटकावल्या आहेत. तर 109 लिस्ट ए मॅचेसमध्ये 166 फलंदाजांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला आहे.

संबंधित बातम्या :

अवघ्या 10 धावात 8 विकेट्स, पाकिस्तानची घातक गोलंदाजी, सामन्याचा निकाल काय?

Virat Kohli | ‘रनमशीन’ विराट कोहलीवर तब्बल 761 डावानंतर ओढावली नामुष्की

(new zealand faster bowler neil wagner today 35 birthday)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें