Wrestlers Protest : ‘हे पाहून मला खूप….’, रस्त्यावर आंदोलनाला बससलेल्या कुस्तीपटूंसाठी neeraj chopra ची खास पोस्ट

Wrestlers Protest : बजरंग पुनिया, विनेश फोगाट, साक्षी मलिकसह देशातील अनेक मोठे पेहेलवान जंतर-मंतरवर धरणा आंदोलनाला बसले आहेत. बृजभूषण सिंह यांच्यावर कुस्तीपटूंनी अनेक गंभीर आरोप केले आहेत.

Wrestlers Protest : 'हे पाहून मला खूप....', रस्त्यावर आंदोलनाला बससलेल्या कुस्तीपटूंसाठी neeraj chopra ची खास पोस्ट
Neeraj ChopraImage Credit source: twitter
Follow us
| Updated on: Apr 28, 2023 | 11:30 AM

नवी दिल्ली : देशातील अनेक मोठे कुस्तीपटू जंतर-मंतरवर धरणे आंदोलनाला बसले आहेत. भारतीय कुस्ती संघाचे अध्यक्ष बृजभूषण सिंह यांच्यावर कारवाई करण्याची त्यांनी मागणी केली आहे. बृजभूषण सिंह यांच्यावर कुस्तीपटूंनी अनेक गंभीर आरोप केले आहेत. आता या विषयात ऑलिम्पिक चॅम्पियन नीरज चोप्रा यांने आपले विचार व्यक्त केलेत.

नीरज चोप्राने कुस्तीपटूंच्या समर्थनार्थ पोस्ट केलीय. खेळाडू न्याय मागण्यासाठी रस्त्यावर बसलेत, हे पाहून दु:ख होतय, असं नीरज चोप्राने म्हटलय.

नीरज चोप्राने काय म्हटलय?

“देशाच प्रतिनिधीत्व करण्यासाठी, नाव उंचावण्यासाठी खेळाडू कठोर मेहनत करतात. एक राष्ट्र म्हणून प्रत्येक व्यक्ती देशाच्या सन्मानाच रक्षण करण्यासाठी जबाबदार आहे. जे घडतय, ते घडायला नको होतं” असं नीरज चोप्रा म्हणाला. “हा एक गंभीर विषय असून न्याय मिळवून देण्यासाठी अधिकाऱ्यांनी वेगाने पावलं उचलली पाहिजेत” असं नीरज चोप्रा म्हणाला.

समर्थनार्थ समोर आले कपिल देव

बजरंग पुनिया, विनेश फोगाट, साक्षी मलिक यांच्यासारखे स्टार कुस्तीपटू जंतर-मंतरवर धरणे आंदोलनाला बसले आहेत. तीन महिन्यापूर्वी जानेवारी महिन्यात हे कुस्तीपटू धरणे आंदोलनाला बसले होते. जानेवारी महिन्यात मागणी केली होती. अध्यक्षांविरोधात अजूनही कारवाई झालेली नाही, म्हणून ते पुन्हा आंदोलनाला बसलेत. टीम इंडियाच्या पहिल्या वर्ल्ड कप विजेत्या संघाचे कर्णधार कपिल देव यांनी सुद्धा पेहलवानांच समर्थन केलय. इन्स्टाग्रामवर स्टोरी पोस्ट करताना, ‘यांना कधी न्याय मिळेल का?’ असा प्रश्न विचारलाय. विषय सुप्रीम कोर्टात

बृजभूषण यांच्यावर महिला कुस्तीपटूच शारीरिक आणि मानसिक शोषण केल्याचा आरोप आहे. क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी या प्रकरणाच्या चौकशीसाठी एक कमिटी स्थापन केली होती. यात महिला कुस्तीपटू बबीता फोगाटचा सुद्धा समावेश आहे. आपल्याकडून रिपोर्ट काढून घेतला, असं बबीताच फोगाट यांचं म्हणणं आहे. कुस्तीपटूंचा विषय सुप्रीम कोर्टात पोहोचलाय.

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.