AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

All England Championship: किताब गमावला, नाव कमावलं, लक्ष्य सेनची इंग्लंडमध्ये ऐतिहासिक कामगिरी

बॅडमिंटन कोर्टवर आपल्या अप्रतिम खेळाने दिग्गजांना भुरळ पाडणाऱ्या भारताच्या युवा शटलर लक्ष्य सेनचं (Lakshya Sen) मोठं स्वप्न भंगलं आणि तो इतिहास रचण्यात अपयशी ठरला. लक्ष्य सेनने वयाच्या अवघ्या 20 व्या वर्षी प्रतिष्ठेच्या ऑल इंग्लंड चॅम्पियनशिपच्या (All England Championship Final 2022) अंतिम सामन्यापर्यंत धडक दिली.

All England Championship: किताब गमावला, नाव कमावलं, लक्ष्य सेनची इंग्लंडमध्ये ऐतिहासिक कामगिरी
Lakshya SenImage Credit source: AFP
| Updated on: Mar 21, 2022 | 12:39 PM
Share

लंडन : बॅडमिंटन कोर्टवर आपल्या अप्रतिम खेळाने दिग्गजांना भुरळ पाडणाऱ्या भारताच्या युवा शटलर लक्ष्य सेनचं (Lakshya Sen) मोठं स्वप्न भंगलं आणि तो इतिहास रचण्यात अपयशी ठरला. लक्ष्य सेनने वयाच्या अवघ्या 20 व्या वर्षी प्रतिष्ठेच्या ऑल इंग्लंड चॅम्पियनशिपच्या (All England Championship Final 2022) अंतिम सामन्यापर्यंत धडक दिली. जेतेपदाच्या अगदी जवळ पोहोचला, पण विजेतेपदापासून केवळ एक पाऊल मागे राहिला. रविवारी, 20 मार्च रोजी बर्मिंघम एरिना येथे खेळवण्यात आलेल्या ऑल इंग्लंड पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत भारतीय स्टारला जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या डेन्मार्कच्या दिग्गज खेळाडू व्हिक्टर एक्सेलसेनने (Viktor Axelsen Beats Lakshya Sen) लक्ष्य सेनचा 21-10, 21-15 असा पराभव केला. भारतीय स्टारने आपल्या बलाढ्य प्रतिस्पर्ध्याला सहजासहजी जिंकू दिले नाही, त्याने व्हिक्टरला कडवी झुंज दिली. त्यामुळे या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत भारतीय बॅटमिंटनपटूचं विजेतेपद पाहण्याची प्रतीक्षा 21 वर्षांनंतरही पूर्ण होऊ शकली नाही.

21-10, 21-15 या स्कोअरलाइनसह, व्हिक्टर एक्सेलसेनने हे विजेतेपद जिंकले आणि तो दुसऱ्यांदा या स्पर्धेचा चॅम्पियन बनला. लक्ष्यने आपल्यापेक्षा अधिक अनुभवी आणि बलवान प्रतिस्पर्ध्याला सहज जिंकू दिले नाही. हा सामना बराच वेळ चालला. पहिल्या गेममध्ये 62 शॉट्सची रॅली होती, जी एक्सेलसेनने जिंकली, तर दुसऱ्या गेममध्ये लक्ष्य जेव्हा पराभवाच्या जवळ होता, तेव्हा 70 शॉट्सची सर्वात लांब रॅली घेण्यात आली आणि ती लक्ष्यने जिंकली.

एकेका पॉईंटसाठी कडवी झुंज

गेल्या आठवड्यात टोकियो ऑलिम्पिक चॅम्पियन ऍक्सेलसेनला जर्मन ओपनमध्ये पराभूत करुन सर्वांना आश्चर्यचकित करणाऱ्या लक्ष्य सेनकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा होती. कारण त्याने बर्मिंगहॅममध्ये अंतिम फेरीपर्यंतच्या प्रवासादरम्यान अनेक मोठ्या खेळाडूंना पराभूत केल्यामुळे पुन्हा एकदा चांगले परिणाम अपेक्षित होते. लक्ष्यनेही तेच केले, पण अपेक्षेप्रमाणे निकाल लागला नाही, कारण लक्ष्यची सर्वोत्तम कामगिरी असूनही एक्सेलसेनने त्याच्यापेक्षा अधिक पॉईंट्सची कमाई केली होती. मात्र, लक्ष्यने एकही पॉईंट सहजासहजी दिला नाही आणि प्रत्येक गुणासाठी ऍक्सेलसेनला घामा गाळायला लावला.

पहिल्या गेमचा स्कोअर एकतर्फी, पण सामना चुरशीचा

पहिल्या गेमचा निकाल पूर्णपणे एकतर्फी लागला. एक्सलसनने सुरुवातीलाच मोठी आघाडी घेतली होती. पहिल्या गेममध्ये 6-0 ने पिछाडीवर असलेल्या लक्ष्यने सलग दोन गुण मिळवून पुनरागमनाच्या आशा उंचावल्या. त्यानंतर सुरुवातीलाच पुनरागमन करत पुन्हा 5 गुण घेत 11-2 अशी आघाडी घेतली. यादरम्यान 62 शॉट्सची रॅली पाहायला मिळाली.

यादरम्यान, उंच उंची असलेल्या व्हिक्टर एक्सेलसेनने क्रॉस कोर्ट शॉट्स, पॉवरफुल स्मॅश आणि चतुर ड्रॉप शॉट्ससह लक्ष्यची परीक्षा घेतली आणि भारतीय स्टारने आपल्या भक्कम बचावाने प्रत्येक हल्ल्याला प्रत्युत्तर दिले.

यानंतर गेम जिंकेपर्यंत निकराची लढाई पाहायला मिळाली. ज्यामध्ये एक्सेलसेनने 10 गुण जिंकले, तर लक्ष्यने 8 गुण मिळवले आणि स्कोअर 21-10 असा झाला.

पराभव सहजासहजी स्वीकारल नाही

दुसर्‍या गेममध्ये स्पर्धा अधिक चुरशीची झाली. यामध्ये सुरुवातीला ४-४ अशा बरोबरीनंतर एक्सेलसेनने वेग वाढवत ११-५ असा ब्रेक घेतला. ब्रेकनंतरही सामना चुरशीचा झाला आणि दोघांमध्ये प्रत्येकी एका गुणासाठी संघर्षपूर्ण लढत पाहायला मिळाली.

लक्ष्य सेन 10-17 असा पिछाडीवर होता, तेव्हा सामना पूर्णपणे लक्ष्यच्या हातून निसटला आहे असे वाटत असतानाही त्याचा उत्साह कायम होता. या स्कोअरलाइनवर असताना दोन खेळाडूंमधील सामन्यातील सर्वात लांब रॅली पाहिली, ज्यामध्ये 70 शॉट्स झाले आणि शेवटी एक्सेलसेनने एक पॉईंट मिळवत सामन्यात पुनरागमन केलं.

प्रत्येक रॅलीत एक्सेलसेनने जोरदार हल्ला केला, त्याचवेळी लक्ष्यने कोर्टवर अनेकवेळा डायव्हिंग करत आपला बचाव कायम ठेवला. अखेर 53 मिनिटांच्या गेमनंतर व्हिक्टर ऍक्सेलसेनने विजेतेपद पटकावले.

बॅडमिंटनचा वारसा वडील आणि आजोबांकडून

लक्ष्य सेनचा जन्म 16 ऑगस्ट 2001 रोजी अल्मोडा येथे झाला. बॅडमिंटन हा खेळ लक्ष्यला वारशाने मिळाला आहे. अल्मोडा येथे त्याचे आजोबा त्यांच्या बॅडमिंटन खेळामुळे खूप प्रसिद्ध होते. त्याच वेळी, त्याचे वडील डीके सेन हेदेखील प्रसिद्ध बॅटमिंटनपटू होते. डीके सेन हे लक्ष्यचे बॅडमिंटन प्रशिक्षक आहेत. लक्ष्यचा मोठा भाऊ चिराग हादेखील त्याच्या बॅटमिंटन खेळासाठी राष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध आहे. लक्ष्य अवघ्या नऊ वर्षांचा असताना तो पहिल्यांदा वडिलांसोबत त्याच्या भावाची सब-ज्युनियर रँकिंग बॅडमिंटन स्पर्धा पाहण्यासाठी गेला होता. तिथेच त्याने बॅडमिंटनपटू होण्याचा निर्धार केला.

इतर बातम्या

ड्रग्स बाळगल्याप्रकरणी 4 वर्ष मुंबईच्या तुरुंगात खितपत पडलेला टेबल टेनिसपटू निर्दोष, न्यायालयाकडून सुटकेचे आदेश

Chess Game : भारताला ऑलिम्पियाड बुद्धिबळचे यजमानपद, खेळाचं आयोजन चेन्नईत, यंदाची ऑलिम्पियाड भारतासाठी का विशेष?

Kabaddi Player Death: कबड्डीच्या मैदानातच आंतरराष्ट्रीय कबड्डीपटूची गोळ्या घालून हत्या, कोण होते संदीप नंगल अंबिया?

फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.