Kabaddi Player Death: कबड्डीच्या मैदानातच आंतरराष्ट्रीय कबड्डीपटूची गोळ्या घालून हत्या, कोण होते संदीप नंगल अंबिया?

पंजाबमधील (Punjab) प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय कबड्डीपटू संदीप नंगल अंबिया याची अज्ज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली.

Kabaddi Player Death: कबड्डीच्या मैदानातच आंतरराष्ट्रीय कबड्डीपटूची गोळ्या घालून हत्या, कोण होते संदीप नंगल अंबिया?
संदीप नंगल अंबिया Image Credit source: twitter
Follow us
| Updated on: Mar 15, 2022 | 2:53 PM

जालंधर: पंजाबमधील (Punjab) प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय कबड्डीपटू संदीप नंगल अंबिया याची अज्ज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली. जालंधरच्या (Jalandhar) मालियां गावात कबड्डी स्पर्धेदरम्यान सोमवारी संध्याकाळी ही धक्कादायक घटना घडली. संदीप नंगल अंबिया (Sandeep Singh Ambiya) यांच्या हत्येने कबड्डी विश्वात एकच खळबळ उडाली आहे. संदीप यांनी एक दशकापेक्षा अधिक काळ कबड्डी स्पर्धा गाजवल्या. कबड्डीमध्ये त्यांनी एकप्रकारे राज्य केलं. संदीप एक प्रतिभावान कबड्डीपटू होता. आपल्या खेळाने त्याने प्रेक्षकांची मन जिंकून घेतली होती. अशा या कबड्डीपटूची दीवसाढवळ्या हत्या करण्यात आली. संदीप फक्त पंजाबपुरताच मर्यादीत नव्हता. त्याने आपल्या चौफेर खेळाने जागतिक कबड्डी स्पर्धांमध्ये नाम कमावलं. ओळख आणि दबदबा निर्माण केला. अशा या गुणी कबड्डीपटूची हत्या झाल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे.

फक्त भारतातच नाही, तर…

संदीपने एक दशकापेक्षा अधिक काळ कबड्डी स्पर्धेत नाव गाजवलं होतं. त्याने पंजाबसह कॅनडा, अमेरिका, ब्रिटनमध्येही आपल्या प्रतिभेचं प्रदर्शन केलं आहे. आपल्या खेळाच्या जोरावर संदीपचं नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचलं होतं. त्याची अॅथलेटिक प्रतिभा आणि कबड्डीतील नैपुण्यामुळे त्याला डायमंड स्पर्धक म्हणूनही ओळखलं जात होतं. मृत्यूपूर्वी संदीप कबड्डी फेडरेशनचं व्यवस्थापन पाहत होता.

हल्लेखोरांमध्ये 12 जणांचा समावेश

अंबिया गावात राहणाऱ्या संदीपवर मालिया गावात कबड्डी कप स्पर्धा सुरु असतानाच अज्ञात हल्लेखोरांनी त्याच्यावर गोळीबार करत हत्या केली. संदीपच्या डोक्यावर आणि छातीवर जवळपास 20 राऊंड फायरिंग करण्यात आल्याची माहिती मिळतेय. घटनास्थळावर उपस्थित लोकांच्या मते संदीपवर हल्ला करणारे एकूण 12 जण होते. या हल्ल्याचा एक धक्कादायक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये हल्लेखोर संदीपवर गोळ्या झाडत असल्याचं पाहायला मिळतंय. गोळीबाराच्या आवाजानं स्टेडियमवरही मोठा गोंधळ पाहायला मिळतोय.

Non Stop LIVE Update
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना.
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट.
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा.
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो.
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?.
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा.
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका.
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका.
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली.
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?.