AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Euro 2020 : इतिहासात पहिल्यांदाच इंग्लंड अंतिम सामन्यात, युरो चषकाची फायनल इटली विरुद्ध इंग्लंड

युरो चषकाच्या सेमी फायनल सामन्यामध्ये कर्णधार हॅरी केनच्या निर्णायक गोलच्या जोरावर इंग्लंडने फायनलमध्ये धडक घेतली आहे. इतिहासात पहिल्यांदाच इंग्लंड युरोच्या अंतिम सामन्यात पोहोचली आहे.

Euro 2020 : इतिहासात पहिल्यांदाच इंग्लंड अंतिम सामन्यात, युरो चषकाची फायनल इटली विरुद्ध इंग्लंड
सामन्यात निर्णायक गोल केल्यानंतर आनंद व्यक्त करताना कर्णधार हॅरी केन
| Edited By: | Updated on: Jul 08, 2021 | 1:05 PM
Share

लंडन : ऐतिहासिक वेम्बली मैदानात युरो चषकाचा (Euro Cup 2020) सेमी फायनलचा सामना इंग्लंड आणि डेन्मार्क (England vs Denmark) या दोन संघामध्ये पार पडला. अत्यंत अटीतटीच्या झालेल्य़ा सामन्यात इंग्लंडचा कर्णधार हॅरी केनने (Harry Kane) नावाला साजेशी खेळी करत अतिरिक्त वेळेत निर्णायक गोल लगावला. ज्याच्या मदतीने इंग्लंडने 2-1 च्या फरकाने सामना खिशात घालत अंतिम सामन्यात धडक घेतली. इतिहासात पहिल्यांदाच युरो चषकाच्या अंतिम सामन्यात इंग्लंडने अशी कामगिरी केली आहे. विशेष म्हणजे 1966 नंतर पहिल्यांदाच अशा मोठ्या स्पर्धेत इंग्लंड अंतिम सामन्यात पोहोचली आहे. अंतिम सामन्यात इंग्लंडसमोर इटलीचे आव्हान असेल. (In Euro Cup England Win over Denmark in Semi Final and enters in Finals With Italy)

डेन्मार्कची झुंज अपयशी

यंदाच्या युरो चषकात आपल्या खेळाने सर्वांनाच आश्चर्यचकीत कऱणाऱ्या डेन्मार्क संघाचा प्रवास जरी संपला असला तरी संपूर्ण स्पर्धेसह सेमी फायनमध्येही त्यांनी कडवी झुंज दिली. सुरुवातीला अप्रतिम खेळ दाखवत डेन्मार्कने 30 व्या मिनिटाला पहिला गोल दागला. डेन्मार्कच्या मिकेल डेम्सगार्डने (Mikkel Damsgaard) शानदार गोल करत संघाला 1-0 ची आघाडी मिळून दिली. त्यानंतर लगेचच 39 व्या मिनिटाला इंग्लंडकडून आक्रमन करण्यात आले. कर्णधार केनने रहीम स्टर्लिंगला (Raheem Sterling) पास दिला पण बॉल थांबवण्यासाठी डेन्मार्कचा कर्णधार साइमन कियर (Simon Kjær) मध्ये आला आणि चूकून बॉल त्याच्यांच गोलमध्ये गेल्याने सामन्यात स्कोर 1-1 झाला.

कर्णधार केनचा गोल आणि इंग्लंड विजयी

पहिल्या हाल्फनंतर 1-1 स्कोर असताना दुसऱ्या संपूर्ण हाल्फमध्ये इंग्लंडला एकही गोल करता आला नाही. दोनही संघानी काही प्रयत्न केले पण यश मिळाले नाही. अखेर 90 मिनिटं झाल्यानंतर अतिरिक्त वेळ देण्यात आला. त्यावेळ 103 व्या मिनिटाला इंग्लंडचा कर्णधार हॅरी केनला डेन्मार्कच्या एका चूकीमुळे पेनल्टी मिळाली. तिचा वापर करत त्याने गोल करण्याचा प्रयत्न केला पण डेन्मार्कच्या गोलकिपरने गोल रोखला खरा पण बॉलला हातात ठेवू न शकल्याने केनने पुन्हा किक करत बॉल गोलपोस्टमध्ये टाकला 2-1 ने संघाला विजय मिळवून दिला.

फायनलमध्ये इंग्लंड-इटली आमने सामने

याआधी सेमीफायनलच्या दुसऱ्या लढतीत इटलीने चुरशीच्या झालेल्या सामन्यात स्पेनला  (Italy vs Spain) मात देत अंतिम सामना गाठला आहे. अत्यंत चुरशीच्या झालेल्या सामन्यात दोन्ही संघानी 1-1 गोल केला. त्यामुळे विजयी कोण हे ठरवण्यासाठी पेनल्टी शूटआऊट घेण्यात आले, ज्यात इटलीने 4-2 च्या फरकाने विजय मिळवत अंतिम सामन्यात प्रवेश केला. त्यामुळे आता इंग्लंड विरुद्ध इटली (England vs Italy) असा युरो चषकाचा अंतिम सामना रंगणार आहे.

हे ही वाचा :

Euro 2020 : 13 वर्षांपूर्वीचा बदला घेत इटलीची स्पेनवर मात, अंतिम सामन्यात इटली दिमाखात दाखल

Euro 2020 : युक्रेनला मात देत इंग्लंड विजयी, चेक रिपब्लिकला नमवत डेन्मार्कही सेमीफायनलमध्ये दाखल

(In Euro Cup England Win over Denmark in Semi Final and enters in Finals With Italy)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.