Football Talent Hunt : 14 वर्षांखालील फुटबॉलपटूंसाठी tv9 समूहाची विशेष मोहिम

Indian Tigers and Indian Tigresses : भारतातील फुटबॉल खेळाचा चेहरामोहरा बदलण्यासाठी नोएडात टीव्ही9 वृत्तसमूहाकडून 14 वर्षांखालील मुलांना मार्गदर्शनासाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

Football Talent Hunt : 14 वर्षांखालील फुटबॉलपटूंसाठी tv9 समूहाची विशेष मोहिम
Football Talent Hunt,Image Credit source: TV9
Follow us
| Updated on: Apr 10, 2024 | 1:20 PM

भारत, क्रिकेट वेडा देश. भारतीयांसाठी क्रिकेट हा धर्म आहे, तर सचिन तेंडुलकर त्या धर्माचा देव असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. भारतीयांनी क्रिकेट या खेळावर आणि क्रिकेटपटूंवर गेल्या काही दशकांपासून भरभरुन प्रेम केलं आहे. प्रत्येक चाहता क्रिकेट पाहतो आणि खेळतोही. मात्र या क्रिकेट वेड्या देशात क्रिकेट व्यतिरिक्त इतर खेळांना पाहिजे तसा वाव मिळालेला नाही. काही अपवाद सोडला तर अजूनही फुटबॉल या खेळाचा प्रचार आणि प्रसार झालेला नाही. तसेच टीम इंडिया फुटबॉल रँकिंगमध्येही आसपास नाही. भारताची फुटबॉलमध्ये असलेली ही स्थिती बदलण्यासाठी tv9 या देशातील आघाडीच्या वृत्तसमूहाने पुढाकार घेतलाय.

क्रिकेटमुळे फुटबॉलला हवा तसा वाव मिळाला नाही. त्यामुळे फुटबॉल वाढवण्यासाठी आणि प्रतिभावान खेळाडूंना व्यासपीठ उपलब्ध करुन देण्यासाठी युरोपातील फुटबॉल संघ आणि tv9ने पुढाकार घेतला आहे. इंडियन टायगर आणि इंडियन टायग्रेसेस विशेष मोहिम हाती घेण्यात आली आहे.

त्यानुसार फुटबॉल टॅलेंट हंट उद्घाटन सोहळा डीपीएस ग्रेटर नोएडा येथे आयोजित करण्यात आला. सकाळी 10.30 वाजता उद्घाटन सोहळा पार पडला. उद्घाटनानंतर या कार्यक्रमात असंख्य 14 वर्षाखालील फुटबॉल प्रेमी मुलांची उपस्थित होते. या कार्यक्रमात अनेक दिग्गज परदेशी फुटबॉलपटूंनी लहान मुलांना फुटबॉलचे बाळकडू दिले. तसेच मुलांचा उत्साह वाढवला. यावेळेस tv9 नेटवर्कचे चीफ ग्रोथ ऑफिसर रक्तीम दास आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

आर्थिक परिस्थिती अभावी आणि आवश्यक मार्गदर्शन नसल्याने आपला देश असंख्य प्रतिभावान खेळाडूंना मुकला आहे. प्रचंड इच्छाशक्ती असूनही बहुतांश खेळाडूंना नाईलाजाने माघार घ्यावी लागते. टीव्ही9 ग्रुपने हाच मुद्दा धरुन आणि खेळाचा प्रचार-प्रसारासह भारताचं नाव उज्जवल व्हावं, यासाठी ही मोहिम हाती घेतलीय. या मोहिमेचा 14 वर्षांखालील मुला-मुलींना भविष्यात नक्कीच फायदा होईल आणि ते भारताचं नाव उज्जवल करतील, असा विश्वास यावेळेस मान्यवरांनी व्यक्त केला.

Non Stop LIVE Update
मी निष्क्रिय खासदार मग मोदींची...ओमराजे यांचा पंतप्रधानांवर निशाणा काय
मी निष्क्रिय खासदार मग मोदींची...ओमराजे यांचा पंतप्रधानांवर निशाणा काय.
डोंबिवलीत उद्धव ठाकरे गटाला खिंडार, शहरप्रमुखच हाती घेणार धनुष्यबाण
डोंबिवलीत उद्धव ठाकरे गटाला खिंडार, शहरप्रमुखच हाती घेणार धनुष्यबाण.
राज्याचे महानालायक उद्धव ठाकरे, भाजपच्या बड्या नेत्यानं काढली लायकी
राज्याचे महानालायक उद्धव ठाकरे, भाजपच्या बड्या नेत्यानं काढली लायकी.
खैरेंच्या 'त्या' वक्तव्यावरून शिरसाटांचा निशाणा तर दानवेंचा पलटवार काय
खैरेंच्या 'त्या' वक्तव्यावरून शिरसाटांचा निशाणा तर दानवेंचा पलटवार काय.
लोकसभेचं तिकीट मिळताच रवींद्र वायकरांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
लोकसभेचं तिकीट मिळताच रवींद्र वायकरांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले....
सुप्रिया सुळेंचा 'हा' लकी नंबर, प्रत्येक भाषणातून होतोय वारंवार उल्लेख
सुप्रिया सुळेंचा 'हा' लकी नंबर, प्रत्येक भाषणातून होतोय वारंवार उल्लेख.
हे मटण खाणारे ब्राम्हण, देवेंद्र फडणवीसांवर कुणाचा निशाणा?
हे मटण खाणारे ब्राम्हण, देवेंद्र फडणवीसांवर कुणाचा निशाणा?.
भुताटकी, आत्मा, ढोंग आणि बरंच काही..., राऊतांचा मोदींवर हल्लाबोल काय?
भुताटकी, आत्मा, ढोंग आणि बरंच काही..., राऊतांचा मोदींवर हल्लाबोल काय?.
कॉलर उडवताना सकाळ की संध्याकाळ पहावं..., शरद पवारांचा उदयनराजेंना टोला
कॉलर उडवताना सकाळ की संध्याकाळ पहावं..., शरद पवारांचा उदयनराजेंना टोला.
ते टरबूज उन्हाळ्यात तरी कामी येतं, पण हे ..., ठाकरेंची फडणवीसांवर टीका
ते टरबूज उन्हाळ्यात तरी कामी येतं, पण हे ..., ठाकरेंची फडणवीसांवर टीका.