Video : ॲशेस कसोटीनंतर विंबलडन स्पर्धेत सामना सुरु असताना तसंच काहीसं घडलं, काय झालं ते वाचा
जस्ट स्टॉप ऑईल संघटनेच्या आंदोलकांनी विंबलडन स्पर्धेतही खोडा घातला. यामुळे काही काळ सामना थांबवावा लागला. मात्र सुरक्षारक्षकाने आंदोलकांना ताब्यात घेतल्यानंतर सामन्याला पुन्हा सुरुवात झाली.

मुंबई : इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया ॲशेस मालिकेनंतर विंबलडन स्पर्धेवर जस्ट स्टॉप ऑईल पर्यावरणवादी आंदोलनाचा प्रभाव दिसून आला. बुधावारी या आंदोलनामुळे सामना काही कालावधीसाठी थांबवावा लागला. कारणि आंदोलनकर्ता पुरुष एकरी स्पर्धा सुरु असलेल्या कोर्ट 18 वर गेला आणि कोर्टवर ऑरेंज रंगांची पावडर फेकली. यानंतर एकच खळबळ उडाली. सुरक्षारक्षकाने धाव घेत आंदोलनकर्त्याला बाहेर खेचून नेलं. यानंतर ग्राउंड स्टाफने पाउडर स्वच्छ केली आणि सामन्याला पुन्हा सुरुवात झाली.
विंबलडन कोर्टवर नेमकं काय झालं?
ग्रिगोर दिमित्रोव्ह आणि शो शिमाबुकुरो यांच्यात सुरु असलेल्या सामन्यात आंदोलक कोर्टवर आला. टेनिस कोर्टवर पोहोचण्याआधी केशरी रंगाची कॉन्फेटी आणि एक जिगसॉ गवतावर फेकली. एका निवेदनात जस्ट स्टॉप ऑइल आंदोलक म्हणाले की, “आम्ही करू शकत नाही. ते तुकडे उचलण्यासाठी पुढच्या पिढीवर सोडा.” दुसरीकडे, विंबलडन आयोजकांनी सांगितलं की, “कोर्ट 18 वरील घटनेनंतर दोन जणांना अटक करण्यात आली आहे.”
Just Stop Oil use a jigsaw and confetti to halt play on Court 18 at #Wimbledon @BBCSport pic.twitter.com/cdgbD9ZiMe
— Sanny Rudravajhala ??? (@SannyR1985) July 5, 2023
ॲशेस मालिकेतील दुसरा कसोटी सामना लॉर्ड्सवर खेळला गेला. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाच्या या सामन्याच्या पहिल्या दिवशी आंदोलनकर्ते मैदानात घुसले होते. त्यामुळे सामना थांबवावा लागला होता. जस्ट स्टॉप ऑइल आंदोलनकर्त्यांनी ब्रिटनमधील अनेक स्पर्धा आणि कार्यक्रमांमध्ये खोडा घातला आहे.
युनाइटेड किंगडममध्ये पर्यावरवादी कार्यकर्त्यांच्या एका समुहाला जस्ट स्टॉप ऑईल असं संबोधलं जातं. या संघटनेची स्थापना 2022 मध्ये झाली होती. ब्रिटीश सरकारने नवे ऑइल परवाने जारी करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाविरोधात आंदोलकांनी रान पेटवलं आहे. या संस्थेच्या माध्यमातून आंदोलक तेल, गॅस आणि कोळसा प्रोजेक्ट थांबवण्यासाठी प्रयत्नशील आहेत.
