News9 Corporate Badminton Championship 2025 स्पर्धेला 9 मे पासून सुरुवात, अशी करा नोंदणी
न्यूज9 कॉर्पोरेट बॅडमिंटन चॅम्पियनशिप २०२५ चे आयोजन पुलेला गोपीचंद बॅडमिंटन अकादमी येथे करण्यात आले आहे. या बॅडमिंटन चॅम्पियनशिपसाठी नोंदणी कशी करावी? जाणून घ्या

न्यूज9 आणि टीव्ही9 नेटवर्कने एक माध्यम समूह म्हणून समाजातील समस्यांना वाचा फोडण्यासह समाजभानही जपलं आहे. न्यूज9 कडून याआधी अनेक स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं आहे. यामध्ये कॉर्पोरेट फुटबॉल कप तसेच इंडियन टायगर्स एन्ड टायग्रेसेस फुटबॉल स्पर्धेचा समावेश आहे. या स्पर्धेतून अनेक वंचित खेळाडूंना हक्काचं व्यासपीठ मिळालं. तसेच भविष्यात पुढे जाण्यासाठी संधीही मिळाली. या अशा खेळाडूंमुळे टीव्ही 9 नेटवर्कच्या या स्पर्धांना यश मिळालं. त्यानंतर आता न्यूज9 कडून कॉर्पोरेट बॅडमिंटन चॅम्पियनशीप 2025 स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. या स्पर्धेसाठी नोंदणी कशी करता येईल? हे आपण सविस्तर जाणून घेऊयात.
स्पर्धेबाबत थोडक्यात पण महत्त्वाचं
न्यूज9 कॉर्पोरेट बॅडमिंटन चॅम्पियनशिप 2025 स्पर्धेत पुरुष गटात (Mens Single) एकेरी आणि मिश्र दुहेरी (Mix Double) सामने खेळवण्यात येतील. तसेच ओपन कॅटेगरीत मेन्स सिंगल्स, वूमन्स सिंगल्स आणि मिक्सड डबल असे सामने खेळवण्यात येतील. यासाठी कॉर्पोरेट कंपनीकडून या 2 गटांसाठी नोंदणी करु शकतात. या स्पर्धेचं आयोजन हे 9 ते 11 मे दरम्यान हैदराबादमधील पी गोपीचंद बॅडमिटंन अकॅडेमी येथे करण्यात आलं आहे. स्पर्धेत सहभागी होणाऱ्यांना बॅडमिटंन अकॅडेमी दिग्ग्जांकडून प्रशिक्षण देण्यात येईल.
बक्षिस रक्कम किती?
पुरुष श्रेणीतील पहिल्या 3 विजेत्यांसाठी बक्षिस ठेवण्यात आलं आहगे. त्यानुसार विजेत्याला रोख रक्कम दीड लाख रुपये देण्यात येणार आहेत. दुसऱ्या क्रमांकाच्या विजेत्याला अर्थात उपविजेत्याला 1 लाख रुपये मिळतील. तर तिसरं स्थान पटकावणाऱ्या खेळाडूंना 50 हजार रुपये मिळतील.
ओपन कॅटेगरीतील पहिल्या विजेत्याला 25 हजार, दुसऱ्या विजेत्यात 15 हजार, तर तिसऱ्या स्थानी असणाऱ्यांना 5 हजार रुपये बक्षिस म्हणून देण्यात येतील.
अशी करा नोंदणी
कॉर्पोरेट्स या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी www.news9corporatecup.com आणि corporatecup@tv9.com द्वारे नोंदणी करु शकतात. नोंदणी करण्याची 6 मे ही शेवटची तारीख आहे.
