
सध्या सोशल मीडियावर एक ट्रेंड सुरू आहे. त्यात प्रत्येक जण टेबलवर हात मारून रील तयार करत आहे. हा रील जगभरात ट्रेंड होत आहे. पण हा रीलचं उगम स्थान हे नॉर्वे बुद्धीबळ स्पर्धा होती. कारण यात डी गुकेशने मॅग्नेस कार्लसनला पराभूत केलं होतं. डी गुकेशच्या चेकमेटनंतर कार्लसनने टेबलवर हात मारला होता. तसेच पुढे काय झालं हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे. कार्लसन हा जागतिक पातळीवरील नंबर 1 खेळाडू आहे. त्यामुळे त्याला हा पराभव काही पचनी पडला नाही. त्याच्या मनात या पराभवाची सळ कायम होती. त्यानंतकर क्रोएशियात जाग्रेबमध्ये ग्रँड बुद्धिबळ स्पर्धेत हे दोन्ही खेळाडू आमनेसामने आले. या सामन्यापूर्वीच कार्लसनने गरळ ओकली आणि डी गुकेशचा अपमान केला. ‘हा सामना एका ‘कमकुवत खेळाडू’ विरुद्ध खेळत असल्यासारखे घेईल. गेल्या वेळी गुकेश येथे खूप चांगला खेळला होता, परंतु तो या फॉरमॅटमधील सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक आहे हे अद्याप सिद्ध झालेले नाही.’, असं कार्लसन म्हणाला.
मॅग्नस कार्लसनने सांगितलं की, गुकेशने असे काहीही केले नाही ज्यामुळे तो अशा स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी करेल असं वाटावं. मला आशा आहे की तो अधिक चांगली कामगिरी करू शकेल, परंतु मी त्याला एक कमकुवत खेळाडू म्हणून पाहतो. यावर डी गुकेश कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही. पण 64 घरात आपण वरचढ असल्याचं दाखवून दिलं आणि कार्लसनची बोलती बंद केली.
Well done @DGukesh ! This first win over Magnus Carlsen at Norway Chess 2025 is beginning of achieving another milestone. Proud of you, Gukesh!
You’ve shown the world what quiet confidence & fierce focus can achieve! pic.twitter.com/qLcTSynmDi— Kiren Rijiju (@KirenRijiju) June 2, 2025
🇮🇳 Gukesh D defeats 🇳🇴 Magnus Carlsen with the black pieces in a rapid game at the Grand Chess Tour. Share your thoughts in the comments! pic.twitter.com/bjO7melAQ0
— International Chess Federation (@FIDE_chess) July 3, 2025
गुकेश आणि कार्लसन यांच्यातील तीन सामन्यांच्या मालिकेतील हा पहिला सामना होता. 3 जुलै रोजी हा सामना रॅपिड फॉरमॅटमध्ये खेळवण्यात आला होता. पुढील दोन सामने ब्लिट्झ फॉरमॅटमध्ये खेळवले जातील. माजी जागतिक बुद्धिबळ विजेता गॅरी कास्पारोव्ह यांनी या पराभवावर मॅग्नस कार्लसनवर निशाणा साधला आहे. गॅरी कास्पारोव्ह यांनी सांगितलं की, हा एक खूप खास दिवस आहे! आता आपण मॅग्नसच्या वर्चस्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करू शकतो. कारण हा फक्त दुसरा पराभव नाही तर खूप मोठा पराभव आहे!