Dr Maya Rathod| मातृत्व, संसार संभाळून मुंबईकर डॉ. माया राठोडांची ऑस्ट्रेलियात बॉडी बिल्डिंगमध्ये यशस्वी झेप

डॉ. माया यांची कामगिरी खास यासाठी आहे, कारण लग्न, दोन मुलांचं मातृत्व आणि IVF चा अभ्यास संभाळून त्यांनी हे यश मिळवलय. घर, संसार आणि डॉक्टरकीचा पेशा संभाळून बॉडी बिल्डिंगमध्ये नाव कमावण खूप मोठी गोष्ट आहे.

Dr Maya Rathod| मातृत्व, संसार संभाळून मुंबईकर डॉ. माया राठोडांची ऑस्ट्रेलियात बॉडी बिल्डिंगमध्ये यशस्वी झेप
डॉ. माया राठोड फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम
Follow us
| Updated on: Dec 29, 2021 | 9:27 AM

बॉडी बिल्डिंगकडे (Body building) पुरुषांची मक्तेदारी असलेला खेळ म्हणून पाहिलं जातं. आपल्या गल्लीत किंवा व्यायामशाळेत बॉडी बिल्डिंग स्पर्धा होणार असेल, तर त्यात कुठले पुरुष बॉडीबिल्डर्स सहभागी होणार याची चर्चा होते. पण तेच विभागातील एखादी तरुणी किंवा महिला, स्पर्धक म्हणून सहभागी होणार असेल, तर अनेकांच्या भुवया उंचावतात. कारण बॉडी बिल्डर म्हणून स्टेजवर उभं राहताना एखाद्या तरुणीला किंवा महिलेला अनेक सामाजिक बंधन झुगारावी लागतात. हे इतकं सोप नाहीय. अनेकदा समाजाच्याआधी स्वत:च्या कुटुंबाशी लढावं लागतं. हळूहळू का होईना पण या मानसिकतेत आता बदल होतोय आणि महिला बॉडी बिल्डर्ससुद्धा स्वत:ची ओळख निर्माण करतायत. यात एक नाव म्हणजे (Dr Maya Rathod) डॉ. माया राठोड. (Mumbaikar Dr Maya Rathod a super mom champion bodybuilder in Australia)

प्रत्येक स्त्रीला प्रेरणा देणारं यश

मूळच्या मुंबईकर असलेल्या माया राठोड यांनी थेट सातासमुद्रापार ऑस्ट्रेलियात सिडनी येथे झालेल्या बॉडीबिल्डींग अँड फिटनेस चॅम्पियनशिप स्पर्धेत पदक विजेती कामगिरी केली. नोव्हाइस फिगर गटात पहिलं तर फिंगर कॅटेगरीमध्ये त्यांना तिसरं स्थान मिळालं. या कामगिरीसाठी भारतातील ऑस्ट्रेलियन उच्चायुक्तांनी त्यांचं कौतुक केलं. त्यावरुनच माया यांनी केलेली कामगिरी किती मोठी आहे, हे लक्षात येतं. पेशाने डॉक्टर असलेल्या महिलेने परदेशात जाऊन बॉडी बिल्डिंगमध्ये अशी पदकविजेती कामगिरी करणं इतकं सोपं नाहीय. आज डॉ. माया यांनी मिळवलेलं यश प्रत्येक भारतीयासाठी कौतुकास्पद आहेच, पण त्याचवेळी काहीतरी वेगळं करण्याची इच्छा असलेल्या प्रत्येक स्त्रीला प्रेरणा देणारं आहे.

लग्नानंतर मिळवलं यश आज आपल्या आसपास तुम्हाला अशा अनेक स्त्रिया दिसतील, ज्यांना घर, संसार, कुटुंब या पलीकडे जाऊन काहीतरी वेगळं करायचं आहे. एखादी नवीन गोष्ट शिकण्याची इच्छा असते. पण बऱ्याच स्त्रिया, समाजाची चौकट, कुटुंब, मुलं याचा विचार करुन आपल्या हौसेवर पाणी सोडतात. डॉ. माया राठोड मात्र याला अपवाद आहेत.

डॉ. माया यांची कामगिरी खास यासाठी आहे, कारण लग्न, दोन मुलांचं मातृत्व आणि IVF चा अभ्यास संभाळून त्यांनी हे यश मिळवलय. घर, संसार आणि डॉक्टरकीचा पेशा संभाळून बॉडी बिल्डिंगमध्ये नाव कमावण खूप मोठी गोष्ट आहे.

डॉ. माय राठोड पेशाने महिला प्रसूतीरोगतज्ज्ञ

डॉ. माय राठोड या पेशाने महिला प्रसूतीरोगतज्ज्ञ आहेत. 2020 मध्ये IVF चा पुढचा अभ्यास करण्यासाठी म्हणून त्या पतीसोबत ऑस्ट्रेलियात गेल्या. फिटनेसची आवड असल्यामुळे त्यांनी ऑस्ट्रेलियात जीममध्ये ट्रेनिंग सुरु केलं. तिथे सराव करताना, त्यांना बॉडी बिल्डींग स्पर्धेत सहभागी होण्याचा सल्ला देण्यात आला. बॉडीबिल्डींग अँड फिटनेस चॅम्पियनशिप स्पर्धेत नाव नोंदवण्यासाठी म्हणून त्या गेल्या, त्यावेळी तिथल्या आयोजकांना आश्चर्याचा धक्का बसला, ते माझ्याकडे पाहातच राहिले, कारण मागच्या काही वर्षात भारतीय महिलांचे या स्पर्धेत सहभागी होण्याचे प्रमाण अगदी नगण्य आहे, असे माया यांनी सांगितले. “ऑस्ट्रेलियात बॉडी बिल्डिंग स्पर्धेत सहभागी होण्याचा अनुभव खूपच सुंदर होता. आयोजकांनी ट्रेनिंगपासून इतर सर्व बाबतीत पूर्ण सहकार्य केलं. भारताच्या तुलनेत ऑस्ट्रेलियात महिला बॉडी बिल्डर्समध्ये खूप तीव्र स्पर्धा असते” असे माया म्हणाल्या.

कसं केलं टाइम मॅनेजमेंट

स्पर्धेसाठी सराव करताना टाइम मॅनेजमेंट माया यांच्यासाठी एक अग्निदिव्य होतं. कारण आयव्हीएफचा अभ्यास, घरची काम संभाळून त्यांना हे सर्व करायचं होतं. रात्री फक्त चार तासाची झोप व्हायची. पहाटे चार वाजता उठून पुन्हा व्यायामाला सुरुवात. त्यानंतर अभ्यास. हे सर्व अग्निदिव्य पार करुन माया यांनी यश मिळवलं. हे सर्व करताना बॉडी बिल्डिंगमध्ये करीअर घडवण्याचा त्यांचा उद्देश नाहीय. फक्त आवड म्हणून हे सर्व केलं. डॉक्टरकीच्या पेशावर आपलं पहिलं प्रेम असल्याचं त्या सांगतात. ज्या स्त्रियांच्या नशिबी सहजतेने मातृत्वाचं सुख नाहीय, त्यांना IVF च्या माध्यमातून आईपणाचं सुख देण्यात आपल्याला एक वेगळं समाधान लाभेल, असं माया म्हणाल्या.

डॉ. माया राठोड यांच्या कामगिरीची आंतरराष्ट्रीय स्तराव दखल घेण्यात आली आहे. लवकरच त्यांच्यावर एक डॉक्युमेंट्री येणार आहे. पारंपारिक चौकट मोडल्यामुळे डॉ. माया यांना हे सर्व करणं शक्य झालं. या सर्व प्रवासात आपल्याला पतीने, मुलांनी साथ दिली. ते पाठिशी उभे राहिले नसते, तर आज ओळख निर्माण करता आली नसती, असे माया सांगतात.

संबंधित बातम्या: एकदम कडक उत्तर! जाफरने मायकल वॉन बरोबर जुना हिशोब केला चुकता IND vs SA: दक्षिण आफ्रिकेने एक चूक सुधारली आणि टीम इंडियाचे फलंदाज झाले फेल IND VS SA: ऋषभ पंतची कमाल, धोनीचा विक्रम मोडला

Non Stop LIVE Update
तू ज्या शाळेत शिकतो बेटा, त्याचा मी हेडमास्तर; अजित पवारांचा खोचक टोला
तू ज्या शाळेत शिकतो बेटा, त्याचा मी हेडमास्तर; अजित पवारांचा खोचक टोला.
राजसाहेबांचं भाषण झोंबलंय, पिक्चर अभी... मनसे नेत्याचा राऊतांना इशारा
राजसाहेबांचं भाषण झोंबलंय, पिक्चर अभी... मनसे नेत्याचा राऊतांना इशारा.
पैसे मोजताना मी स्वतः...मातोश्रीवरचा तो किस्सा राणेंनी भरसभेत सांगितला
पैसे मोजताना मी स्वतः...मातोश्रीवरचा तो किस्सा राणेंनी भरसभेत सांगितला.
बाप तो बाप... बारामतीत शरद पवारांच्या सभास्थळी टोले लगावणारे बॅनर
बाप तो बाप... बारामतीत शरद पवारांच्या सभास्थळी टोले लगावणारे बॅनर.
माझ्याकडे असा दारूगोळा आहे, पण मी...; उज्ज्वल निकम यांचं सूचक वक्तव्य
माझ्याकडे असा दारूगोळा आहे, पण मी...; उज्ज्वल निकम यांचं सूचक वक्तव्य.
'हेमंत करकरेंना कसाबने नाहीतर RSS समर्थक पोलीस अधिकाऱ्यानं घातली गोळी'
'हेमंत करकरेंना कसाबने नाहीतर RSS समर्थक पोलीस अधिकाऱ्यानं घातली गोळी'.
मतांसाठी कसाबची बाजू... लाज बाळगा; भाजप नेत्याची वडेट्टीवारांवर टीका
मतांसाठी कसाबची बाजू... लाज बाळगा; भाजप नेत्याची वडेट्टीवारांवर टीका.
2004ला दादा मुख्यमंत्री, पवारांनी प्रस्ताव नाकारला, कुणाचा गौप्यस्फोट?
2004ला दादा मुख्यमंत्री, पवारांनी प्रस्ताव नाकारला, कुणाचा गौप्यस्फोट?.
संताच्या ओव्या, अभंग, मोदी..., सोशल मीडियावरील फडणवीसांचा अनोखा प्रचार
संताच्या ओव्या, अभंग, मोदी..., सोशल मीडियावरील फडणवीसांचा अनोखा प्रचार.
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला.