AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video : डी गुकेशचा विजय झाल्याचं पाहताच कार्लसनला राग अनावर, संतापात जे काही केलं ते कॅमेऱ्यात चित्रित

वर्ल्ड चॅम्पियन डी गुकेशने माजी वर्ल्ड चॅम्पियन मॅग्नस कार्लसनला पराभवाची धूळ चारली. नॉर्वे चेस 2025 च्या सहाव्या फेरीत पहिल्यांदाच क्लासिकल टाइम कंट्रोलमध्ये पराभूत केलं. या पराभवानंतर कार्लसनला राग अनावर झाला. त्याने केलेली कृती कॅमेऱ्यात चित्रित झाली आहे.

Video : डी गुकेशचा विजय झाल्याचं पाहताच कार्लसनला राग अनावर, संतापात जे काही केलं ते कॅमेऱ्यात चित्रित
डी गुकेशचा विजय झाल्याचं पाहताच कार्लसनला राग अनावरImage Credit source: PTI
| Updated on: Jun 02, 2025 | 4:23 PM
Share

वर्ल्ड चॅम्पियन डी गुकेशने पुन्हा एका चॅम्पियनसारखी कामगिरी केली आहे. त्याने माजी वर्ल्ड चॅम्पियन मॅग्नस कार्लसनला पराभूत करत बुद्धीबळाच्या 64 घरांवर राज्य असल्याचं दाखवून दिलं. नॉर्वे चेस 2025 स्पर्धेच्या सहाव्या फेरीत गुकेशने हा ऐतिहासिक विजय मिळवला. त्याने कार्लसनला पहिल्यांदाच क्लासिकल टाइम कंट्रोलमध्ये पराभूत केलं. हा सामना नॉर्वेच्या स्टवान्गर येथे पार पडला. त्यामुळे कार्लसनच्या मनातलं दु:ख लपलं नाही. कारण आपल्या घरातच आणि चाहत्यांसमोर हार पत्कारावी लागली. त्याचा प्रभाव सामना संपल्यावर स्पष्ट दिसून आला. पराभवानंतर कार्लसनच्या मनातला राग उफाळून आला आणि त्याने टेबलवर जोरदार मुक्का मारला आणि मैदान सोडलं. या सामन्यातील पहिल्या फेरीत कार्लसन गुकेशवर भारी पडला होता. पण त्यानंतर डी गुकेशने जोरदार कमबॅक केलं आणि सामना जिंकला.

कार्लसनने या पराभवानंतर सोशल मीडियावर एक विचित्र पोस्ट केली आहे. यात त्याने लिहिलं की, ‘जेव्हा तुम्ही राजाविरुद्ध खेळता तेव्हा चूकता कामा नये.’ हा संदेश त्याच्या वर्चस्वाचे प्रतीक होते. पण गुकेशने सहाव्या फेरीत कार्लसनला बरोबर गुंडाळला.पांढऱ्या मोहऱ्यासह खेळताना 19 वर्षी गुकेशने बॅकफूटवर असूनही संयम सोडला नाही. कार्लसनने या खेळात आपली आघाडी ठेवली होती. पण स्पर्धेच्या इंक्रिमेंट टाईम कंट्रोलमध्ये (वेगाने खेळाला जातो) कार्लसनवर दबाव वाढला. गुकेशने या संधीचं सोनं केलं आणि कार्लसनला चूक करण्यास भाग पाडलं. चूक होताच सामना फिरवला आणि शेवटी विजय मिळवला.

पराभवानंतर कार्लसनला काय झालं तेच कळालं नाही. हातात असलेला सामना गमवल्याने त्याला राग अनावर झाला. मग काय पराभूत मानसिकेतच खूर्चीवरून उठला आणि टेबलवर जोरात मुक्का मारला. त्यानंतर स्पर्धेचं ठिकाण सोडून कारमध्ये जाऊन बसला आणि गेला. प्रसिद्ध बुध्दीबळपटू सुसान पोल्गर या पराभवाचं विश्लेषण करताना सांगितलं की, ही कार्लसनच्या करिअरमधील सर्वात मोठी हार आहे. दुसरीकडे, या विजयानंतर डी गुकेश खूपच खूश होता. कारण कार्लसनने यापूर्वी क्लासिकल खेळ आणि दबावात कामगिरी करण्याच्या क्षमतेवर प्रश्न उपस्थित केले होते.

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा.
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी.
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर.
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?.