AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Wimbledon 2021 : नोव्हाक जोकोव्हीच स्वत:ला म्हणतो स्पायडर मॅन, सोशल मीडियावर Memes चा पाऊस

जगातील अव्वल दर्जाचा टेनिसपटू नोव्हाक जोकोव्हीच (Novak Djokovic) सध्या विम्बल्डन खुल्या टेनिस स्पर्धेत (Wimbledon) खेळत आहे. दरम्यान त्याने त्याचा सामना खेळतानाचा एक फोटो शेअर करत स्वत:ला स्पायडर मॅन म्हटलं आहे.

Wimbledon 2021 : नोव्हाक जोकोव्हीच स्वत:ला म्हणतो स्पायडर मॅन, सोशल मीडियावर Memes चा पाऊस
नोव्हाक जोकोव्हीच
| Edited By: | Updated on: Jul 01, 2021 | 5:45 PM
Share

लंडन : विम्बल्डन खुल्या टेनिस स्पर्धेची काही दिवसांपूर्वी (Wimbledon 2021) इंग्लंडमध्ये सुरुवात झाली आहे.  सर्बियाच्या नोव्हाक जोकोव्हीचने (Novak Djokovic) दक्षिण आफ्रिकेच्या एंडरसनला दुसऱ्या फेरीत पराभूत करत आपली यशस्वी कारकिर्द कायम ठेवली आहे. 19 ग्रँड स्लॅम मिळवलेला नोव्हाक सध्या 20 वे ग्रँड स्लॅम पटकावण्यासाठी विम्बल्डन स्पर्धेत घाम गाळतो आहे. खेळताना अत्यंत फोकसने खेळणारा नोव्हाक मैदानाबाहेर तितकाच दिलखुलास आहे. नोव्हाकने असाच दिलखुलासपणा दाखवत स्वत:चा एक फोटो ट्विट केला आहे आणि नेटकऱ्यांना मीम्स बनवण्याचे आमंत्रण ही दिले आहे.

नोव्हाकने पोस्ट केलेल्या फोटोमध्ये तो एक टेनिसचा सामना खेळताना दिसून येत आहे. ज्यात सामन्यादरम्यान एक अवघड शॉट खेळण्यासाठी स्वत:ला संपूर्णपणे ताणले आहे आणि तोच फोटो नोव्हाकने पोस्ट केला आहे. सोबतच फोटोला ‘स्पायडरन मॅन रिटर्न्स’ असे कॅप्शन देत चाहत्यांना मीम्स बनवा असेही लिहिले आहे. ज्यामुळे त्याने चाहत्यांना मजेशीर मीम्स बनवण्याचं जणू आमंत्रणच दिलं आहे. त्यानंतर नेटकऱ्यांनी देखील मीम्सचा पाऊस पाडला आहे. तर सर्वात आधी पाहूया नोव्हाकने नेमकं काय ट्विट केलं आहे.

ट्विटरवर नेटकऱ्यांकडून अनेक मीम्स व्हायरल

नोव्हाक जोकोव्हीचने स्वत:च मीम्स बनवण्याची मुभा दिल्यानंतर नेटकऱ्यांनी संधीचा संपूर्ण फायदा उचलत अनेक फोटोंद्वारे नोव्हाकच्या फोटो आणि कॅप्शनला धरुन बरेच मीम्स बनवले आहेत. यातील काही खास आणि हटके मीम्स पाहुयात…

नोव्हाकसाठी विम्बल्डन अत्यंत महत्त्वाची

नोव्हाक जोकोव्हीचने (Novak Djokovic) विम्बल्डनमध्ये बुधवारी झालेल्या सामन्यात 15 व्यांदा तिसऱ्या फेरीत प्रवेश केला. जोकोव्हीचने दक्षिण अफ्रिकेच्या के. एंडरसनला (K. Anderson) 6-3, 6-3, 6-3 अशा सरळ सेट्समते मात देत पुढची फेरी गाठली. विम्बल्डनच्या मैदानावर खेळाडूंना मोठ्या प्रमाणात घसरायला होत असतानाही नोव्हाकने संयमी खेळी करत विजय मिळवला. नोव्हाकने नुकतीच ऑस्ट्रेलियन ओपनसह फ्रेंच ओपन स्पर्धाही जिंकली. त्यामुळे आता विम्बल्डन स्पर्धाही जिंकण्यासाठी तो कडी मेहनत घेत आहे.

हे ही वाचा –

Wimbledon 2021 : सलामीच्या सामन्यात जोकोव्हीच विजयी, तर त्सित्सिपासचा पराभव

Photo : टोक्यो ऑलिम्पिक 2021 मधून ‘या’ दिग्गज टेनिसपटूंची माघार, प्रत्येकाची कारण वेगवेगळी

मोठी बातमी : क्ले कोर्टचा अनभिषिक्त सम्राट राफेल नदालची विम्बलडनमधून माघार, ‘हे’ कारण देत घेतली माघार

(Novak Djokovic Shares his Photo Playing in Wimbledon 2021 And Gave caption as Spider Man After this post Memes On Novak spiderman Went Viral on Social Media)

फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.