AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Paris Olympic 2024 : 30 जुलै रोजी भारतीय खेळाडू कोणत्या खेळात भाग घेणार? जाणून घ्या एका क्लिकवर

पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धा पुढे सरकत चालली आहे. या स्पर्धेचा 30 जुलैला चौथा दिवस आहे. तीन दिवसात भारताच्या पारड्यात एक कांस्य पदक पडलं आहे. मनु भाकरने 10 मीटर एअर पिस्टल स्पर्धेत पदकाची कमाई केली आहे. आता 30 जुलैला भारतीय खेळाडू बॅडमिंटन, तीरंदाजी, नेमबाजी, हॉकी आणि कुस्तीत सहभागी होतील.

Paris Olympic 2024 : 30 जुलै रोजी भारतीय खेळाडू कोणत्या खेळात भाग घेणार? जाणून घ्या एका क्लिकवर
| Updated on: Jul 29, 2024 | 10:49 PM
Share

पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत भारताची कामगिरी अजूनही हवी तशी झालेली नाही. तिसऱ्या दिवसापर्यंत भारताच्या पारड्यात फक्त एक ब्राँड मेडल पडलं आहे. त्यामुळे पुढच्या स्पर्धांमध्ये भारताची कामगिरी कशी याची क्रीडाप्रेमींमध्ये धाकधूक वाढली आहे. मनु भाकर आणि सरबजोत सिंह ही जोडी 10 मीटर एअर पिस्टल स्पर्धेच्या ब्राँझ फेरीत पोहोचली आहे. हा सामना 30 जुलैला होणार आहे. या स्पर्धेतून आणखी एका पदकाची अपेक्षा आहे. जर असं झालं मनु भाकर एका इतिहासाची नोंद करेल. दुसरीकडे, नेमबाजीत राजेश्वरी कुमारी आणि श्रेयसी सिंह महिला ट्रॅप पात्रता फेरीत भाग घेतील. ही स्पर्धा दुपारी 12.30 वाजता सुरु होईल. अंकिता भकत महिलांच्या वैयक्तिक स्पर्धेच्या बाद फेरीत पॉलंडच्या वायलेट मॅसजोरशी सामना करेल. हा सामना संध्याकाळी 5 वाजून 14 मिनिटांनी सुरु होईल. याच स्पर्धेत भजन कौर आणि इंडोनेशियाची सायफा नूराफिफा भिडतील. हा सामना 5 वाजून 27 मिनिटांनी होईल. तीरंदाजीत धीरज बोम्मादेवरा पुरुषांच्या वैयक्तिक स्पर्धेत चेक गणराज्यच्या एडम लीशी भिडणार आहे. हा सामना रात्री 10 वाजून 46 मिनिटांनी होईल.

पुरुष हॉकी संघ ब गटात आयर्लंडशी सामना करेल. हा सामना संध्याकाळी 4 वाजून 45 मिनिटांनी सुरु होईल. बॅडमिंटन स्पर्धेत सात्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी पुरुष दुहेरीतच्या साखळी फेरीत इंडोनेशियाच्या फजर अल्फियन आणि मुहम्मद रियान अर्दियांतो यांच्याशी संध्याकाळी 5.30 वाजता भिडतील. बॅडमिंटन महिला दुहेरीत अश्विनी पोनप्पा आणि तनिषा क्रॅस्टो जोडीचा सामना ऑस्ट्रेलियाच्या सेतियाना मापासा आणि अँजेला यू या जोडीशी होईल. हा सामना संध्याकाळी 6.20 वाजता सुरु होईल.

अमित पंघाल पुरुषांच्या 51 किलो वजनी गटात राउंड ऑफ 16 सामन्यात जाम्बियाच्या पॅट्रिक चिन्येम्बाशी लढेल. हा सामना संध्याकाळी 7 वाजून 16 मिनिटांनी सुरु होईल. तर जॅस्मिन लेम्बोरिया महिलांच्या 57 किलो वजनी गटात राउंड ऑफ 32 मध्ये फिलीपिंगसच्या नेस्टी पेटेसियोशी सामना करेल. हा सामना रात्री 9 वाजून 24 मिनिटांनी असेल. महिलांच्या 54 किलो वजनी गटात प्रीति पवार राउंड ऑफ 16 स्पर्धेत कोलंबियाच्या येनी मार्सेला एरियस कास्टानेडाशी भिडेल. हा सामना रात्री उशिरा 1 वाजून 22 मिनिटांनी सुरु होईल.

पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा.
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी.
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर.
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?.
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.