AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Paris Olympics 2024: कॅप्टन हरमनप्रीत टीम इंडियाच्या विजयाचा हिरो, आयर्लंडवर 2-0 ने मात

India vs Ireland Hockey: हॉकी टीम इंडियाचा कॅप्टन हरमनप्रीत सिंह या विजयाचा हिरो ठरला. हरमनप्रीतने टीम इंडियासाठी दोन्ही गोल केले.

Paris Olympics 2024: कॅप्टन हरमनप्रीत टीम इंडियाच्या विजयाचा हिरो, आयर्लंडवर 2-0 ने मात
hockey team indiaImage Credit source: hockey team india x account
| Updated on: Jul 30, 2024 | 7:24 PM
Share

पॅरिस ऑलिम्पिक 2024 स्पर्धेतून भारतासाठी आणखी एक चांगली बातमी आली आहे. हॉकी टीम इंडियाने पूल बीमधील आपल्या तिसऱ्या सामन्यात आयर्लंडवर एकतर्फी विजय मिळवला आहे. टीम इंडियाने आयर्लंडचा 2-0 अशा फरकाने धुव्वा उडवला आहे. टीम इंडियाचा कॅप्टन हरमनप्रीत सिंह या विजयाचा हिरो ठरला. हरमनप्रीतने दोन्ही गोल केले. टीम इंडियाने या विजयासह उपांत्यपूर्व फेरीच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकलं आहे. टीम इंडियाचा अशाप्रकारे हा या स्पर्धेतील 3 सामन्यातील दुसरा विजय ठरला आहे. टीम इंडियाच्या विजयानंतर हॉकी संघाचं सोशल मीडियावर अभिनंदन केलं जात आहे. तर आयर्लंडला तिसऱ्या पराभवाचा सामना करावा लागल्याने त्यांचा परतीचा प्रवास जवळपास निश्चित झाला आहे.

टीम इंडियाने आयर्लंड विरुद्ध सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत आघाडी कायम राखण्यात यश मिळवलं. टीम इंडियाच्या खेळाडूंसमोर आयर्लंडला खातंही उघडता आलं नाही. तर दुसऱ्या बाजूला टीम इंडियाने 1-1 असं करुन 2 गोल केले आणि सामन्यावर घट्ट पकड मिळवली. भारतासाठी हरमनप्रीत याने कर्णधारपदाला साजेशी कामगिरी केली. हरमनप्रीनेच दोन्ही गोल केले आणि विजय मिळवून देण्यात मोठी भूमिका बजावली. टीम इंडियाला या विजयासह बी ग्रुप रँकिंगमध्ये फायदा झाला आहे. भारताने 7 गुणांसह अव्वल स्थानी झेप घेतली आहे.

टीम इंडियाची कामगिरी

टीम इंडियाने आतापर्यंत खेळलेल्या 3 पैकी 2 सामन्यात विजय मिळवला आहे. तर एक सामना हा बरोबरीत राहिला. भारताने सलामीच्या सामन्यात न्यूझीलंडवर 3-2 ने मात केली. त्यानंतर अर्जेेंटीना विरुद्ध 1-1 ने सामना बरोबरीत सोडवण्यात यश मिळवंल. तर त्यानंतर आता आयर्लंडला हरवलं. भारताचा चौथा सामना हा 1 ऑगस्ट रोजी बेल्जियम विरुद्ध होणार आहे.  तर पाचवा आणि शेवटचा सामना हा ऑस्ट्रेलिया विरुद्ध 2 ऑगस्ट रोजी होणार आहे.

चक दे इंडिया

कॅप्टन हरमनप्रीतची कामगिरी

कॅप्टन हरमनप्रीत याने आतापर्यंतच्या तिन्ही सामन्यात भारतासाठी निर्णायक कामगिरी बजावली. हरमनप्रीतने पहिल्या आणि दुसऱ्या सामन्यात गोल केले. हरमनप्रीतने न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यात 1 गोल केला. तसेच अर्जेंटिना विरुद्ध निर्णायक क्षणी केलेल्या गोलमुळे भारताला सामना बरोबरीत राखण्यात यश आलं. तर आयर्लंड विरुद्ध 2 गोल केले. हरमनप्रीतने अशाप्रकारे 3 सामन्यात 4 गोल करत विजयात निर्णायक भूमिका बजावली आहे.

आयर्लंडची हॅटट्रिक

दरम्यान आयर्लंडचा हा या स्पर्धेतील सलग आणि एकूण तिसरा पराभव ठरला. आयर्लंडने अशाप्रकारे पराभवाची हॅटट्रिक पूर्ण केली. आयर्लंडचं या सलग तिसऱ्या पराभवासह या स्पर्धेतील आव्हान जवळपास संपुष्ठात आलं आहे.

भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.