AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pro Kabaddi League PKL 2021-22: मुंबईचा अभिषेक निष्प्रभ, नवीनच्या बळावर दिल्लीचा विजय

नवीन कुमारच्या दमदार रेड आजच्या दिवसाच्या खेळाचं वैशिष्टय ठरलं. प्रो कबड्डीच्या इतिहासात सर्वात कमी सामन्यांमध्ये रेडमध्ये 500 पॉईंटचा टप्पा त्याने ओलांडला.

Pro Kabaddi League PKL 2021-22: मुंबईचा अभिषेक निष्प्रभ, नवीनच्या बळावर दिल्लीचा विजय
| Edited By: | Updated on: Dec 24, 2021 | 8:49 PM
Share

बेंगळुरु: नवीन कुमारच्या शानदार खेळाच्या बळावर दबंग दिल्लीने यू मुंबावर (Dabang Delhi vs u mumba) मात केली आहे. दिल्लीचा स्पर्धेतील हा सलग दुसरा विजय तर मुंबईचा पहिला पराभव आहे. काल दबंग दिल्लीने पुणेरी पलटनला हरवलं होतं, तर यू मुंबाने सलामीच्या लढतीत बेंगळुरु बुल्सचा पराभव केला होता. नवीन कुमारच्या दमदार रेड आजच्या दिवसाच्या खेळाचं वैशिष्टय ठरलं. प्रो कबड्डीच्या इतिहासात सर्वात कमी सामन्यांमध्ये रेडमध्ये 500 पॉईंटचा टप्पा त्याने ओलांडला. अवघ्या 47 सामन्यांमध्ये नवीन कुमारने ही कामगिरी करुन दाखवलीय.

नवीन कुमारने आजच्या सामन्यात 17 पॉईंटस मिळवले. दुसऱ्या बाजूला मागच्या सामन्यातील यू मुंबाचा स्टार अभिषेक सिंह निष्प्रभ ठरला. दबंग दिल्लीने अभिषेकला रेडमध्ये वरचढ होण्याची संधीच दिली नाही. त्याने रेडमध्ये अवघे पाच पॉईंटस मिळवले. पहिल्या सामन्यात त्याने 19 गुणांची कमाई केली होती. दुसऱ्या हाफच्या खेळाला सुरुवात झाल्यानंतर यू मुंबाकडे 10 गुणांची आघाडी होती. पण दिल्लीने टॅकल म्हणजे पकड आणि रेडचा उत्कृष्ट मेळ साधत मुंबईला पराभूत केलं. दबंग दिल्लीने रेडमध्ये 18 आणि टॅकलमध्ये 10 पॉईंट मिळवले. तेच यू मुंबाने रेडमध्ये 18 आणि टॅकलमध्ये 6 पॉईंट मिळवले.

पहिला हाफ मुंबई ऑलआऊटच्या उंबरठ्यावर असताना यू मुंबाने नवीन कुमारची पकड करत सुपर टॅकलचे दोन गुण मिळवले व संघाला छोटीशी आघाडी मिळवून दिली. रेड म्हणजे चढाईत पहिल्या हाफमध्ये यू मुंबाने 7 तर दबंग दिल्लीने 6 गुण मिळवले. टॅकल म्हणजे पकडीत यू मुंबाने दिल्लीपेक्षा थोडा चांगला खेळ केला होता. टॅकलमध्ये यू मुंबाकडे पाच तर दिल्लीकडे तीन पॉईंट मिळवले होते.

संबंधित बातम्या: Harbhajan Singh Retirement: हरभजन सिंगची निवृत्तीची घोषणा, 23 वर्षांचा क्रिकेटमधला प्रवास संपला Harbhajan Singh: ‘मी मनातून आधीच…’ निवृत्तीच्यावेळी हे काय म्हणाला हरभजन IND vs SA: उपकर्णधार झाल्यामुळे तुझे केस पांढरे झाले की काय? मयंकच्या प्रश्नावर राहुलचं हटके उत्तर

KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.