PKL 2021-22 LIVE Score and Updates, Jaipur Pink Panthers vs Haryana Steelers: रोमांचक सामन्यात पिंक पँथर्सचा हरयाणावर विजय

| Updated on: Dec 26, 2021 | 6:07 AM

PKL 2021-22 LIVE Score and Updates : प्रो कबड्डी लीगचा (Pro Kabaddi League) आज चौथा दिवस आहे. यूपी योद्धा विरुद्ध पटना पायरेटस (Patna Pirates vs U.P. Yoddha) ने आजच्या दिवसांच्या लढतींना सुरुवात होणार आहे.

PKL 2021-22 LIVE Score and Updates, Jaipur Pink Panthers vs Haryana Steelers: रोमांचक सामन्यात पिंक पँथर्सचा हरयाणावर विजय

बेंगळुरु: आज झालेल्या दिवसातील तिसऱ्या सामन्यात जयपूर पिंक पँथर्सने स्पर्धेतील पहिल्या विजयाची नोंद केली. हरयाणा स्टीलर्सवर त्यांनी अवघ्या दोन गुणांच्या फरकाने विजय मिळवला. रंगतदार झालेल्या या सामन्यात पिंक पँथर्सने 40-38 अशी मात केली. प्रामुख्याने रेड म्हणजे चढाईचा खेळ या सामन्यात पाहायला मिळाला. पिंक पँथर्स आणि स्टीलर्सने रेडमध्ये प्रत्येकी 27-27 पॉईंट मिळवले. टँकलमध्येही दोन्ही संघ 9-9 असे बरोबरीत होते. पँथर्सकडून अर्जून देसवालने चमकदार खेळ केला. त्याने 18 पॉईंटसची कमाई केली. पँथर्सचा पहिल्या सामन्यात गुजरात जायंटसकडून पराभव झाला होता.

पुण्याने एका पॉईंटने मिळवला विजय शेवटच्या सेकंदापर्यंत थरारक ठरलेल्या सामन्यात पुणेरी पलटनने बाहुबली तेलगु टायटन्सवर एका गुणाच्या फरकाने 34-33 असा विजय मिळवला. तेलगु टायटन्सकडून सिद्धार्थ देसाईने एकाकी झुंज दिली. त्याने रेडमध्ये 15 असे एकूण 18 पॉईंटस मिळवले.

अंकित बेनिवालच्या एका रेडचा अपवाद वगळता तेलगु टायटन्सकडून सिद्धार्थ देसाईनेच रेडसमध्ये पॉईंटस मिळवून दिले. पुणेरी पलटनने टॅकल म्हणजे पकडीत तेलगु टायटन्सपेक्षा सरस कामगिरी केली. पुणेरी पलटनने रेडमध्ये 13 तर टायटन्सनी आठ पॉईंटस मिळवले. त्याशिवाय पुण्याकडून मोहित गोएत यशस्वी रेडर ठरला. त्याने सात पॉईंटस मिळवले.

प्रदीप नरवाली यूपी जिंकली शेवटच्या क्षणापर्यंत रोमांचक ठरलेल्या सामन्यात प्रदीप नरवालच्या (Pradeep narwal) यूपी योद्धाने पटना पायरेटसवर (Patna pirates) अवघ्या एका गुणाच्या फरकाने विजय मिळवला. 36-35 असा यूपीने हा सामना जिंकला. यूपी योद्धाच्या रेडरची पटना पायरेटसने पकड केली पण बोनस पॉईंट घेऊन त्यांनी विजय मिळवला. प्रदीप नरवालने नऊ यशस्वी रेड करत 12 पॉईंटस मिळवले. पण पटना पायरेटसने आठ वेळा प्रदीप नरवालला टॅकल केले. म्हणजे पकड केली.

पटनाच्या मोनू गोयतकडून भरपूर अपेक्षा होत्या. पण त्याने फक्त पाच पॉईंटस मिळवले. आजच्या सामन्यात रेड इतक्याच पकडी महत्त्वाच्या ठरल्या. पटनाने रेडमध्ये 17 आणि टॅकलमध्ये 17 गुण मिळवले तर यूपी योद्धाने रेडमध्ये 20 आणि टॅकलमध्ये 13 पॉईंटस मिळवले. दुसऱ्या हाफमध्ये यूपीने टॅकलमध्ये सुधारणा केली.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 25 Dec 2021 11:10 PM (IST)

    जयपूर पिंक पँथर्सने स्पर्धेतील पहिल्या विजयाची नोंद केली.

    हरयाणा स्टीलर्सवर त्यांनी अवघ्या दोन गुणांच्या फरकाने विजय मिळवला. रंगतदार झालेल्या या सामन्यात पिंक पँथर्सने 40-38 अशी मात केली.

  • 25 Dec 2021 09:40 PM (IST)

    आजचा तिसरा सामना जयपूर पिंक पँथर्स विरुद्ध हरयाणा स्टीलर्स

    जयपूर पिंक पँथर्स आणि हरयाणा स्टीलर्समध्ये तिसरा सामना होणार आहे. जयपूरला गुजरातने सलामीच्या सामन्यात 34-27 असे पराभूत केले होते. हरयाणा स्टीलर्सला अटी-तटीच्या सामन्यात पटनाने 42-39 असे पराभूत केले होते.

  • 25 Dec 2021 09:40 PM (IST)

    कोल्हापूरच्या सिद्धार्थची अपयशी झुंज, पुण्याचा पहिला विजय

    यूपी योद्धा विरुद्ध पटना पायरेटस सामन्याप्रमाणे या लढतीतही पुणेरी पलटनने तेलगु टायटन्सवर एका पॉईंटच्या फरकाने विजय मिळवला.

  • 25 Dec 2021 09:32 PM (IST)

    अटीतटीचा सामना

    पुणेरी पलटन आणि तेलगु टायटन्समध्ये अटीतटीचा सामना. दोन्ही संघ 30-30 बरोबरीत

  • 25 Dec 2021 09:17 PM (IST)

    पुण्याचं जोरदार कमबॅक

    पुण्याने जोरदार कमबॅक केलं असून ते 25-21 ने पुढे आहेत.

  • 25 Dec 2021 09:05 PM (IST)

    पहिल्या हाफमध्ये तेलगु टायटन्सकडे लीड

    शेवटच्या तीन चार मिनिटात तेलगु टायटन्सने आपला खेळ उंचावला व पुणेरी पलटनवर सहा पॉईंटसचा लीड घेतला. तेलगु टायटन्स 20-14 ने पुढे आहे.

  • 25 Dec 2021 08:52 PM (IST)

    पुणेरी पलटनकडून सुपर टॅकल

    पुणेरी पलटनने सिद्धार्थ देसाईला सुपर टॅकल करत दोन पॉईंटस मिळवलेत. पुणे 11-9 ने पुढे आहे.

  • 25 Dec 2021 08:50 PM (IST)

    एक-एक पॉईंटसाठी संघर्ष

    पुणेरी पलटन आणि तेलगु टायटन्समध्ये रोमांचक सामना सुरु आहे. दोन्ही टीम्स एक-एक पॉईंटसाठी संघर्ष करत आहेत.

  • 25 Dec 2021 08:31 PM (IST)

    दुसरा सामना पुणे विरुद्ध तेलगु टायटन्स

    पुणेरी पलटन आणि तेलगु टायटन्समध्ये दुसरा सामना होत आहे. पहिला विजय मिळवण्याचा पुण्याचा प्रयत्न असेल. त्यांच्यासमोर बाहुबली सिद्धार्थ देसाईचे आव्हान आहे. सिद्धार्थ टायटन्सचा मुख्य रेडर आहे.

  • 25 Dec 2021 08:31 PM (IST)

    यूपी योद्धाने एक पॉईटने जिंकला सामना

    रोमांचक सामन्यात एका पॉईटने यूपी योद्धाने पटना पायरेटसवर 36-35 असा विजय मिळवला. यूपी योद्धाच्या रेडरची पटना पायरेटसने पकड केली पण बोनस पॉईंट घेऊन त्यांनी विजय मिळवला.

  • 25 Dec 2021 08:17 PM (IST)

    यूपी आणि पटनामध्ये चार पॉईंटसचे अंतर

    यूपी योद्धा पटना पायरेटसपेक्षा चार पॉईटसनी पुढे आहे. यूपीकडे 32-28 अशी आघाडी आहे.

  • 25 Dec 2021 08:08 PM (IST)

    पटना पायरेटस ऑलआऊट

    पटना पायरेटस ऑलआऊट. यूपी योद्धा 29-26 ने पुढे.

  • 25 Dec 2021 08:06 PM (IST)

    यूपी योद्धाने भरुन काढली पिछाडी

    यूपी योद्धाने पिछाडी भरुन काढत पटना पायरेटस बरोबर 24-24 बरोबरी केली आहे.

  • 25 Dec 2021 07:54 PM (IST)

    पहिल्या हाफमध्ये पटनाचा दमदार खेळ

    पहिल्या हाफचा खेळ संपला असून पटना पायरेटसने यूपी योद्धावर तीन गुणांची आघाडी घेतली आहे. पटना पायरेटस 20-17 ने पुढे आहेत.

  • 25 Dec 2021 07:47 PM (IST)

    सलग दोन सुपर टॅकल

    पटना पायरेटसने सलग दोन सुपर टॅकल करत चार पॉईंटस मिळवले. ते आता यूपीपेक्षा एका पॉईंटने पुढे आहेत.

  • 25 Dec 2021 07:41 PM (IST)

    श्रीकांत जाधवची सुपर रेड

    श्रीकांत जाधवची सुपर रेड. पटना पायरेटसच्या तिघांना केलं बाद. यूपी योद्धाकडे चार पॉईंटसची आघाडी.

  • 25 Dec 2021 07:36 PM (IST)

    प्रदीप नरवालची दमदार सुरुवात

    प्रदीप नरवालने दमदार सुरुवात केली आहे. रेडमध्ये चार पॉईंट मिळवत सहा गुण मिळवले आहेत.

  • 25 Dec 2021 07:33 PM (IST)

    यूपीकडे आघाडी

    यूपी योद्धा विरुद्ध पटना पायरेटस सामन्याला सुरुवात झाली आहे. यूपी योद्धा 3-1 ने पुढे आहे.

  • 25 Dec 2021 07:18 PM (IST)

    सहकाऱ्यांकडून अपेक्षित साथ मिळाली नाही

    मागच्या सामन्यात प्रदीप नरवालने यूपी योद्धासाठी जबरदस्त कामगिरी केली होती. पण सहकारी खेळाडूंकडून अपेक्षित साथ न मिळाल्यामुळे यूपीचा बेंगाल वॉरिअर्सने 38-33 असा पराभव केला होता.

  • 25 Dec 2021 07:10 PM (IST)

    प्रदीप नरवालकडे लक्ष

    प्रो कबड्डी लीगमध्ये आज यूपी योद्धाचा सामना तीन वेळच्या विजेत्या पटना पायरेटस बरोबर होणार आहे. पटनाला विजेते बनवण्यात महत्त्वाची भूमिका असलेला प्रदीप नरवाल आता यूपीकडून खेळत आहे.

Published On - Dec 25,2021 7:07 PM

Follow us
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.