PKL 2021-22 LIVE Score and Updates, UP Yoddha vs Jaipur Pink Panthers: प्रदीप नरवाल फेल, अभिषेक बच्चनची टीम जिंकली

| Updated on: Dec 28, 2021 | 8:40 AM

PKL 2021-22 LIVE Score and Updates : बेंगळुरु बुल्स विरुद्धचा सामना जिंकून चांगली सुरुवात करणाऱ्या यू मुंबा संघाला दुसऱ्या सामन्यात दबंग दिल्लीकडून पराभव स्वीकारावा लागला होता. यू मुंबाचे रेडर अभिषेक सिंह आणि अजिथ कुमार चमकदार कामगिरी करु शकले नव्हते.

PKL 2021-22 LIVE Score and Updates, UP Yoddha vs Jaipur Pink Panthers:  प्रदीप नरवाल फेल, अभिषेक बच्चनची टीम जिंकली

बेंगळुरु: प्रो कबड्डी लीगमध्ये (Pro kabbadi league) आज झालेल्या दुसऱ्या सामन्यात जयपूर पिंक पँथर्सने यूपी योद्धावर तीन गुणांच्या फरकाने 32-29 असा विजय मिळवला. अर्जून देशवाल आणि दीपक हुड्डाच्या बळावर जयपूरने विजय मिळवला. अर्जूनने 11 तर दीपकने सात पॉईंटस मिळवले. जयपूरने यूपी योद्धाच्या तुलनेत पकडीमध्ये चांगला खेळ केला. त्यांनी टॅकलमध्ये आठ तर योद्धाने चार पॉईंट मिळवले. रेडमध्ये योद्धाने 23 तर पँथर्सने 20 गुण मिळवले.

प्रो कबड्डी लीगमधला स्टार प्लेयर प्रदीप नरवाल आज पुन्हा एकदा फेल गेला. त्याने रेडमध्ये फक्त तीन पॉईंट मिळवले. त्यातुलनेत सुरींदर गिल आणि रोहित तोमरने चांगली कामगिरी केली. यूपीला पुढच्या सामन्यात विजय मिळवायचा असेल, तर प्रदीप नरवालला आपली कामगिरी उंचावावी लागेल. जयपूर पिंक पँथर्स हा अभिषेक बच्चनचा संघ आहे.

यू मुंबा-तेलगु टायटन्स सामना टाय 

प्रो कबड्डी लीगमध्ये (Pro Kabaddi League) आजच्या पहिल्या सामन्यात कुठलाही निकाल लागला नाही. दोन्ही संघाचे 30-30 पॉईंटस झाल्यामुळे यू मुंबा आणि तमिळ थलायवाजचा सामना टाय झाला. यू मुंबाकडून (U mumba) अजित कुमारने (Ajith kumar) जबरदस्त खेळ केला. शेवटपर्यंत त्याने मुंबाला विजय मिळवून देण्याचा प्रयत्न केला. पण शेवटच्या रेडमध्ये तमिळ थलायवाजने त्याची पकड केली. त्यामुळे सामना बरोबरीत सुटला.

अजित कुमारने एकट्याने रेडमध्ये 14 पॉईंट मिळवले. पहिल्या सामन्यात चमक दाखवणारा अभिषेक सिंह आजच्या सामन्याहीत निष्प्रभ ठरला.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 27 Dec 2021 09:43 PM (IST)

    प्रदीप नरवाल फेल

    प्रो कबड्डी लीगमधला स्टार प्लेयर प्रदीप नरवाल आज पुन्हा एकदा फेल गेला. त्याने रेडमध्ये फक्त तीन पॉईंट मिळवले. त्यातुलनेत सुरींदर गिल आणि रोहित तोमरने चांगली कामगिरी केली.

  • 27 Dec 2021 09:34 PM (IST)

    जयपूर विजयी

    जयपूर पिंक पँथर्सने तीन पॉईंटसच्या फरकाने विजय मिळवला आहे. 32-29 असा जयपूरने यूपी योद्धावर विजय मिळवला.

  • 27 Dec 2021 09:32 PM (IST)

    फक्त दोन पॉईंटच अंतर

    सामना संपायला काही मिनिट बाकी असून जयपूर पिंक पँथर्स आणि यूपी योद्धामध्ये फक्त दोन पॉईंटच अंतर, 30-28 ने पँथर्स पुढे

  • 27 Dec 2021 09:01 PM (IST)

    पहिल्या हाफमध्ये जयपूर पिंक पँथर्सकडे आघाडी

    पहिल्या हाफमध्ये जयपूर पिंक पँथर्स 19-12 ने आघाडीवर आहे. सुरींदर गिलच्या रेडमुळे यूपी योद्धाला हे अंतर कमी करता आले. स्टार प्लेयर प्रदीप नरवाल निष्प्रभ ठरला आहे.

  • 27 Dec 2021 08:54 PM (IST)

    पिंक पँथर्सकडे आघाडी

    पिंक पँथर्सचा अर्जून देशवाल जबरदस्त खेळत असून जयपूरचा संघ 12-7 ने आघाडीवर आहे.

  • 27 Dec 2021 08:44 PM (IST)

    यूपी योद्धा विरुद्ध पिंक पँथर्स सामना सुरु

    यूपी योद्धा विरुद्ध पिंक पँथर्स दिवसातील दुसरा सामना सुरु झाला आहे. पँथर्सकडे निसटती एका पॉईंटची आघाडी आहे.

  • 27 Dec 2021 08:30 PM (IST)

    यू मुंबा-तमिळ थलायवाज सामना टाय

    प्रो कबड्डी लीगमधील दिवसातील आजचा पहिला सामना टाय ठरला. यू मुंबा आणि तमिळ थलायवाजमध्ये 30-30 पॉईंटवर सामना टाय झाला.

  • 27 Dec 2021 08:15 PM (IST)

    यू मुंबाच्या अजित कुमारचा दमदार खेळ

    यू मुंबाकडून अजित कुमार दमदार खेळ करत आहे. सुपर टेन पार करत त्याने 13 पॉईंट मिळवलेत. रेडमध्ये 12 गुण वसूल केले.

  • 27 Dec 2021 08:10 PM (IST)

    थलायवाजने तीन पॉईंटने पुढे

    तमिळ थलायवजा तीन गुणांनी पुढे आहे. 23-20 ने आघाडीवर आहेत.

  • 27 Dec 2021 08:02 PM (IST)

    थलायवाजचा दमदार खेळ

    दुसऱ्या हाफला सुरुवात झाल्यानंतर तमिळ थलायवाजाने पुन्हा कामगिरी उंचावत 21-15 अशी आघाडी घेतली आहे.

  • 27 Dec 2021 07:54 PM (IST)

    यू मुंबाच कमबॅक

    पहिला हाफ संपला असून तमिळ थलायवाज 17-14 ने पुढे आहेत. एकवेळ यू मुंबा आणि थलायवाजच्या पॉईंटमध्ये 10 ते 12 पॉईंटचे अंतर होते. पण पहिला हाफ संपायला काही मिनिट बाकी असताना मुंबईने कामगिरी उंचावत गुणांमधील अंतर कमी केले.

  • 27 Dec 2021 07:41 PM (IST)

    थलायवाजची मुंबईवर मोठी आघाडी

    तमिळ थलायवाजने मुंबईवर मोठी आघाडी घेतली आहे. 12-2 ने थलायवाज पुढे आहेत. रेडमध्ये थलायवाजने चार आणि टॅकलमध्ये पाच पॉईंट मिळवले. मुंबईला ऑलआऊट करुन दोन पॉईंटस घेतले.

  • 27 Dec 2021 07:34 PM (IST)

    थलायवाजने घेतली आघाडी

    यू मुंबा आणि तमिळ थलायवाजमध्ये सामना सुरु झाला असून थलायवाज 4-1 ने पुढे आहे.

  • 27 Dec 2021 07:21 PM (IST)

    अभिषेक सिंह कमाल दाखवणार?

    पहिल्या सामन्यात यू मुंबाचा रेडर अभिषेक सिंहने दमदार कामगिरी केली होती. आज अभिषेक रेड मध्ये कशी कामगिरी करतो त्यावर बरेच काही अवलंबून असेल.

  • 27 Dec 2021 07:21 PM (IST)

    दबंग दिल्लीने मुंबईला पराभूत केलं होतं

    नवीन कुमारच्या शानदार खेळाच्या बळावर दबंग दिल्लीने यू मुंबावर मात केली होती. दिल्लीचा स्पर्धेतील सलग दुसरा विजय तर मुंबईचा पहिला पराभव ठरला होता.

Published On - Dec 27,2021 7:16 PM

Follow us
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.