SAFF Championship 2023 : टीम इंडियाची विजयी सलामी, पाकिस्तानवर 4-0 ने एकतर्फी विजय

सौदी अरेबिया फुटबॉल फेडरेशन चॅम्पियनशिप 2023 स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात भारताने विजयी सलामी दिली आहे. भारताने पाकिस्तानचा 4-0 ने धुव्वा उडवला. या सामन्यात धक्काबुक्कीही झाली पण भारताने आपला दबदबा कायम ठेवला.

SAFF Championship 2023 : टीम इंडियाची विजयी सलामी, पाकिस्तानवर  4-0 ने एकतर्फी विजय
SAFF Championship 2023 : टीम इंडियाची विजयी सलामी, पाकिस्तानवर 4-0 ने एकतर्फी विजय
Image Credit source: Twitter
| Updated on: Jun 21, 2023 | 9:32 PM

मुंबई : भारत विरुद्ध पाकिस्तान फुटबॉल सामन्यात सुनील छेत्रीच्या नेतृत्वाखालील संघाने 4-0 दणदणीत विजय मिळवला. भारतीय संघाने पहिल्या डावापासूनच आपलं वर्चस्व दाखवून दिलं होतं. भारतीय रणनितीपुढे पाकिस्तानचा संघ पुरता हतबल दिसून आला. बरोबरी साधताना इतकी दमछाक झाली की एकही गोल करता आला नाही. शेवटच्या मिनिटापर्यंत पाकिस्तानचे खेळाडू गोल करण्यासाठी झुंजले. मात्र त्यांना काही यश आलं नाही. या विजयामुळे भारताच्या पदरात 3 गुण पडले आहेत. तसेच 4-0 पराभूत केल्या गोलची संख्याही वाढली आहे.

पहिलं सत्र

पहिल्या सत्रात भारताने दहाव्या मिनिटापासून आक्रमकता दाखवली. भारताची स्टार फुटबॉलपटू आणि स्ट्राईकर सुनील छेत्रीने 10 व्या मिनिटाला गोल मारला. त्यानंतर दुसरा गोल पाच मिनिटांनी म्हणजेच 15 व्या मिनिटाला मारला यामुळे पाकिस्तानवर दबाव वाढला तो वाढलाच. त्यानतर 45 व्या मिनिटाला भारताच्या प्रशिक्षकाने फुटबॉलला हात लावल्याने वाद झाला आणि दोन्ही संघाचे खेळाडू भिडले. भारतीय कर्णधार सुनील छेत्री याने पुढाकार घेत हा वाद शमवला.

दुसरं सत्र

दुसऱ्या सत्रात भारतीय खेळाडूंनी आपली आक्रमकता कायम ठेवली. 74 व्या मिनिटाला तिसरा गोल मारला. छेत्रीचा हा तिसरा गोल होता. 81 मिनिटाला सब्स्टिट्युट उदांताने गोल मारत भारताला 4-0 ने आघाडी मिळवून दिली. पाकिस्तानला गोल करण्याच्या एक दोन संधी मिळाल्या खऱ्या पण त्याचं रुपांतर करता आलं नाही. पाकिस्तानचा पहिल्या सामन्यातच भारताने दारुण पराभव केला.

दोन्ही संघाचे खेळाडू

भारतीय संघ : अमरिंदर सिंह, सुनील छेत्री, शुभाषिश बोस, अन्वर अली, संदेश जिंगान, अनिरुध्द थापा, अब्दुल समद, जिक्सन सिंग, लल्लीन्जुला छांगटे, प्रितम कोटल, आशिक कुरुनियन

पाकिस्तानचा संघ : साकिब हानिफ, इसाह सुलिमन, मुहम्मद उमर हयात, मुहम्मद सुफयान, अब्दुल्ला इकबाल, ममून मूस्सा खान, ओटिस जान, मोहम्मद खान, रहिस नबी, हस्सन नवीद बशीर, हरुन आरशिद हमिद, अली उझैर महमूद

SAFF फुटबॉल स्पर्धेत एकूण आठ संघ असून त्याचे दोन गट पाडण्यात आले आहेत. अ गटात भारत, कुवैत, नेपाळ आणि पाकिस्तान हे संघ आहेत. तर ब गटात बांगलादेश, भुटान, लेबनन आणि मालदीव हे संघ आहेत. अ गटात कुवैत विरुद्ध नेपाळ आणि भारत विरुद्ध पाकिस्तान हे सामने पार पडले. कुवैतने नेपाळचा 3-1 ने, तर भारताने पाकिस्तानचा 4-0 ने पराभव केला. भारताच पुढचा सामना नेपाळसोबत 24 जून रोजी संध्याकाळी 7.30 वाजता आहे.