AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अश्लील पार्टीत झाली होती अटक, आता फिफा वर्ल्डकप अंतिम सामन्यात सांभाळणार धुरा

Slavko Vincic, FIFA World Cup Final: फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात अर्जेंटीना आणि स्पेन यांच्यात लढत होणार आहे. या सामन्यात स्लोवेनियाचा रेफऱी स्लाव्को विंसिक याची मुख्य रेफरी म्हणून नियुक्ती केली आहे. सहा वर्षांपूर्वी एका अश्लील पार्टीत मारलेल्या छाप्यात त्याला पोलिसांनी अटक केली होती.

अश्लील पार्टीत झाली होती अटक, आता फिफा वर्ल्डकप अंतिम सामन्यात सांभाळणार धुरा
मोठा निर्णय! अश्लील पार्टीत झाली होती अटक, आता फिफा वर्ल्डकप अंतिम सामन्यात सांभाळणार धुराImage Credit source: Getty Images
| Updated on: Jul 17, 2026 | 4:24 PM
Share

Slavko Vincic, FIFA World Cup Final: फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धेचं जेतेपद कोण मिळवणार? याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. जेतेपदासाठी स्पेन आणि अर्जेंटीना हे दोन संघ शर्यतीत आहे. 20 जुलै रोजी अंतिम फेरीचा सामना होणार असून जेतेपदाचा मानकरी ठरेल. असं असताना या सामन्यापूर्वी फिफाने एक मोठा निर्णय घेतला आहे. मेटलाइफ स्टेडियममध्ये स्पेन आणि अर्जेंटीना यांच्यात होणाऱ्या सामन्यासाठी स्लोवेनियाचा रेफरी स्लाव्को विंसिक याची मुख्य रेफरी म्हणून नियुक्ती केली आहे. पण त्याची निवड झाल्यानंतर सहा वर्षांपूर्वीचं एक प्रकरण समोर आलं आहे. एका अश्लील पार्टीत मारलेल्या छाप्यात त्याला अटक केली होती. त्यामुळे क्रीडाविश्वात त्या प्रकरणाची जोरदार चर्चा रंगली आहे. एकीकडे चर्चा रंगली असताना फिफा वर्ल्डकप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात त्याच्याकडे मुख्य रेफरीची जबाबदारी असणार आहे.

काय झालं होतं 2020 मध्ये?

रेफरी स्लाव्को विंसिकशी निगडीत प्रकरण वर्ष 2020 मधील आहे. तेव्हा बोस्निया आणि हर्जेगोविनाच्या बिजेलविना शहरात पोलिसांनी गुप्त कारवाई दरम्यान स्लाव्को विंसिकला एका कथित पार्टीतून ताब्यात घेतलं होतं. या पार्टीचं आयोजन वेश्याव्यवसायाच्या टोळीची म्होरक्या तिजाना मॅक्सिमोविचने केलं होतं. त्यानंतर तिजानाने आपला गुन्हा देखील कबूल केला. या छापेमारीत 26 पुरूष आणि 9 महिलांना पकडलं होतं. या छापेमारीत कोकीनचं पाकिटं, 10 पिस्तुल, 3 सुरक्षात्मक जॅकेट आणि 10 हजाराहून अधिक युरो रोख हस्तगत केले होते. स्लाव्को विंसिकवर या रॅकेटमध्ये सहभागी असल्याचा कोणताही थेट आरोप नव्हता. त्यामुळे त्याची एक साक्षीदार म्हणून चौकशी केली आणि सोडून दिलं. या प्रकारानंतर स्लाव्को विंसिकने मीडियाला स्पष्ट सांगितलं होतं की, या टोळीला मी ओळखत नाही आणि माझा काहीच संबंध नाही.

फिफा अंतिम सामन्याची या दिग्गजांकडे धुरा

फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात स्लाव्को विंसिकसोबत हमवतन तोमाज क्लॅनक्निक आणि अँड्राज कोवाचिक सहाय्यक रेफरी म्हणून भूमिका बजावतील. तर जॉर्डनचा अधम मखदमेह चौथा रेफरी असणार आहे. विसिंक हा अनुभवी रेफरी आहे. त्याने 2024 रियल मॅड्रिड आणि बोरूसिया डॉर्टमुंडमध्ये खेळल्या गेलेल्या चॅम्पियन्स लीग अंतिम सामन्यात रेफरीची भूमिका बजावली होती. वर्ल्डकप 2022 मध्ये अर्जेंटिनाच्या एका सामन्यात रेफरी म्हणून जबाबदारी पार पाडली होती. या सामन्यात सउदी अरबने अर्जेंटीनाला पराभवाची धूळ चारली होती. दुसरीकडे, वर्ल्डकप पर्वात इक्वाडोर मॅक्सिको, ब्राझील मोरोक्को आणि जॉर्डन अल्जीरिया सामन्यात रेफरी म्हणून काम केलं आहे.

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली