AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

FIFA 2026 स्पर्धेत ख्रिस्तियानो रोनाल्डोचा संघ थोडक्यात वाचला, एका अंगठ्याच्या अंतराने कोलंबियाचा विजय हिरावला

फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धेतील के गटात पोर्तुगाल आणि कोलंबिया यांच्यात अतितटीचा सामना झाला. हा सामना पाहताना दोन्ही संघांच्या चाहत्यांची धाकधूक वाढली होती. या सामन्याच्या शेवटच्या मिनिटाला कोलंबियाने गोल मारला. पण ऑफसाइट असल्याने रद्द करण्यात आला.

FIFA 2026 स्पर्धेत ख्रिस्तियानो रोनाल्डोचा संघ थोडक्यात वाचला, एका अंगठ्याच्या अंतराने कोलंबियाचा विजय हिरावला
FIFA 2026 स्पर्धेत ख्रिस्तियानो रोनाल्डोचा संघ थोडक्यात वाचला, एका अंगठ्याच्या अंतराने कोलंबियाचा पराभवImage Credit source: Getty Images
| Updated on: Jun 28, 2026 | 5:30 PM
Share

FIFA World Cup 2026, Portugal vs Colombia: फिफा वर्ल्डकप स्पर्धेतील राउंड ऑफ 32 फेरीचे सर्व संघ ठरले आहेत. पण या फेरीत पोहोचण्याआधी पोर्तुगाल आणि कोलंबिया यांच्यात झालेला सामना धाकधूक वाढवणारा ठरला. या सामन्यात पोर्तुगाल संघ पराभवाच्या सावटाखालून परतला. मियामीच्या हार्ड रॉक स्टेडियममध्ये खेळलेल्या या सामन्यात कोलंबियाने पोर्तुगालवर जवळपास ऐतिहासिक विजय मिळवला होता. गोल मारल्यानंतर शेवटच्या क्षणी मैदानात उपस्थित असलेले कोलंबियन चाहत्यांनी जल्लोष केला. पण हा जल्लोष फार काळ टिकला नाही. व्हिडीओ असिस्टंट रेफरीच्या एका निर्णयाने या सामन्याचं चित्र बदललं. त्यामुळे हा सामना गोलरहित झाला आणि 0-0 ने बरोबरीत सुटला.

सांचेजचा हेडर आणि कोलंबियाचा जल्लोष

या सामन्याच्या शेवटच्या टप्प्यात कोलंबियाने फुटबॉल पेनल्टी भागात पोहोचवण्यात यश मिळवलं. त्यानंतर क्रॉस आला आणि स्टार डिफेंडर डेविडसन सांचेजने हेडर मारत बॉल पोर्तुगालच्या गोलमध्ये घुसवला. या गोलनंतर सांचेज आणि संपूर् संघ जल्लोष करू लागला. कारण त्यांना वाटलं की पोर्तुगालसारख्या दिग्गज संघाला पराभूत केलं. ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या संघाला पराभूत केल्याचा आनंद होता. पण लाइनमॅनचा फ्लॅग व्हिडीओ असिस्टंट रेफरीने (VAR) तपासला आणि चित्र बदललं.

मैदानात काय झालं?

कोलंबियन संघ एकिकडे जल्लोष करत असताना ऑन फिल्ड रेफरीने व्हिडीओ असिस्टंट रेफरीच्या सिग्नलनंतर सामना रोखला. पोर्तुगालच्या खेळाडूंनी ऑफसाइडसाठी अपील केली होती. त्यानंतर मैदानावर उपस्थित असलेल्या मोठ्या रिप्ले आणि डिजिटल लाइन्सच्या माध्यमातून गोलची बारकाईने तपासणी करण्यात आली. त्यानंतर कोलंबियाच्या आनंदात विरजण पडलं. VAR च्या फोटोत सांचेज पाय अंगठ्याच्या इतक्या फरकाने ऑफसाइड पोजिशनमध्ये होता. फुटबॉल नियमानुसार, जर खेळाडूच्या शरीराचा गोल करू शकणारा कोणताही भाग चेंडू आणि प्रतिस्पर्धी संघाच्या शेवटच्या बचावपटूच्या पुढे असेल, तर तो ऑफसाईड मानला जातो. या प्रकरणात सांचेजने बॉलला स्पर्श करून गोल केला होता. त्यामुळे हा गोल रद्द केला गेला. ऑफसाइडचं अंतर फक्त अंगठ्या एवढं होतं.

कोलंबिया संघ या गटात टॉपला

फिफा वर्ल्डकप के गटातील पोर्तुगाल आणि कोलंबिया यांच्यातील सामना रद्द झाला. पण या गटात कोलंबिया संघ 7 गुणांसह टॉपला राहिला. तर पोर्तुगाल संघ या गटात 5 गुणांसह दुसऱ्या स्थानावर राहिला. या गटातून डीआर कांगोनेही राउंड ऑफ 32 मध्ये जागा पक्की केली आहे. राउंड ऑफ 32 मध्ये पोर्तुगालचा सामना क्रोएशियाशी होणआर आहे. तर कोलंबियाचा सामना घानाशी होईल.

Follow Us
दोन दिवस पोलिसांनी रोखलं, तरी इंडिया आघाडी पुन्हा मैदानात; राहुल गांधी
Rahul Gandhi : दोन दिवस पोलिसांनी रोखलं, तरी इंडिया आघाडी पुन्हा मैदानात; राहुल गांधींसह, खरगेंची राजघाटकडे कूच
MPSC आंदोलनाचा आठवा दिवस अन् पोलिसांचा मोठा इशारा; आंदोलनस्थळ रिकामं..
MPSC Protest : MPSC आंदोलनाचा आठवा दिवस अन् पोलिसांचा मोठा इशारा; आंदोलनस्थळ रिकामं करण्याच्या दिल्या सूचना, मात्र रुपाली पाटील म्हणाल्या...
सत्ताधाऱ्यांना सद्बुद्धी मिळावी म्हणून राजघाटावर जाणार; खरगे आक्रमक...
Mallikarjun kharge : सत्ताधाऱ्यांना सद्बुद्धी मिळावी म्हणून राजघाटावर जाणार; खरगे आक्रमक, मत चोरीवरून केंद्र सरकारवर गंभीर आरोप
नानांसोबत दोन फिल्म केल्या, तिसरी करायची होती पण…; ममता कुलकर्णी....
Mamata Kulkarni on Nana Patekar : नानांसोबत दोन फिल्म केल्या, तिसरी करायची होती पण…; ममता कुलकर्णी यांनी नाना पाटेकरांच्या आठवणींना दिला उजाळा
दिल्लीत इंडिया आघाडीचं आंदोलन; राहुल गांधी आंदोलनस्थळी दाखल
Delhi India Alliance Morcha : दिल्लीत इंडिया आघाडीचं आंदोलन; राहुल गांधी आंदोलनस्थळी दाखल
नाना पाटेकरांचा हृदयविकाराच्या झटक्यानं मात्र निधन मध्यरात्री काय...
नाना पाटेकरांचे हृदयविकाराच्या झटक्यानं मात्र निधन मध्यरात्री काय घडलं होतं? डॉक्टरांनी सर्व सांगितलं
विचार जुळतात, तसं जॅकेटही फिट्ट झालं; नानांच्या आठवणीने गडकरी भावुक...
Nitin Gadkari On Nana Patekar : विचार जसे जुळतात, तसं जॅकेटही फिट्ट झालं; नाना पाटेकरांच्या आठवणीने नितीन गडकरी भावुक, म्हणाले...
नाना पाटेकर यांच्या ‘नानाची वाडी’त होणार अंत्यसंस्कार; अंतिम...
नाना पाटेकर यांच्या ‘नानाची वाडी’त होणार अंत्यसंस्कार; अंतिम यात्रेची तयारी सुरू
शरद पवार जीएमसी रुग्णालयात पोहोचले; काय म्हणाले?
Nana Patekar Passes Away: शरद पवार जीएमसी रुग्णालयात पोहोचले; काय म्हणाले?
10 खासदारांचं शिष्टमंडळ उद्या राष्ट्रपतींच्या भेटीला - सूत्र
Delhi India Alliance : इंडिया आघाडीचा मोठा प्लॅन; 10 खासदारांचं शिष्टमंडळ उद्या राष्ट्रपतींच्या भेटीला - सूत्र