AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vinesh Phogat disqualified: ऑलिम्पिकमध्ये एक ग्रॅम जास्त वजन चालत नाही? काय आहे नियमावली

Vinesh Phogat disqualified helth update:ऑलिम्पिकमध्ये कुस्तीच्या प्रत्येक गटासाठी वजन मोजण्याची प्रक्रिया दोन दिवस चालते. म्हणजेच जो कुस्तीपटू स्पर्धेत लढण्यासाठी पोहचतो, त्याचे वजन स्पर्धेच्या एक दिवस आधी आणि स्पर्धेच्या दिवशी मोजले जाते. यासाठी ३० मिनिटांचा वेळ कुस्तीपटूंना मिळतो.

Vinesh Phogat disqualified: ऑलिम्पिकमध्ये एक ग्रॅम जास्त वजन चालत नाही? काय आहे नियमावली
विनेश फोगाट हिला रुग्णालयात दाखल केले आहे.
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Aug 07, 2024 | 3:03 PM
Share

Vinesh Phogat disqualified from Paris Olympic 2024: पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेतून भारतासाठी धक्कादायक बातमी आली आहे. भारताची महिला कुस्तीपटू विनेश फोगाट हिची सुवर्णपदकाची संधी हुकली. शंभर ग्रॅम वजन जास्त आल्यामुळे तिला अपात्र ठरवण्यात आले. त्यानंतर तिला कोणतेच पदक मिळणार नाही. तसेच आता अपील करता येणार नाही. ऑलिम्पिक नियमानुसार एकदा अपात्र झालेली खेळाडू पुन्हा खेळू शकत नाही.

काय आहे वजन मोजण्याची प्रक्रिया

ऑलिम्पिकमध्ये कुस्तीच्या प्रत्येक गटासाठी वजन मोजण्याची प्रक्रिया दोन दिवस चालते. म्हणजेच जो कुस्तीपटू स्पर्धेत लढण्यासाठी पोहचतो, त्याचे वजन स्पर्धेच्या एक दिवस आधी आणि स्पर्धेच्या दिवशी मोजले जाते. यासाठी ३० मिनिटांचा वेळ कुस्तीपटूंना मिळतो. या ३० मिनिटांत हव्या तितक्या वेळा तो वजन मोजू शकतो. पहिल्या दिवशी विनेशने वजन मोजले तेव्हा ते ५० किलोच्या आत आले. दुसऱ्या दिवशी पुन्हा स्पर्धेत सहभागी झालेल्या खेळाडूंचे वजन मोजले जाते. त्यावेळी सुद्धा कितीही वेळा ते वजन मोजू शकतात. दुसऱ्या दिवशी विनेशचे वजन ५० किलो शंभर ग्रॅम आले. ऑलिम्पिकच्या नियमानुसार एक ग्रॅम वजन जास्त आले तर अपात्र ठरवले जाते आणि पदकही परत घेतले जाते.

काय काय आहेत नियम

  • वजन मोजताना कुस्तीपटू फक्त रिंगलेट म्हणजे स्पर्धेसाठी खेळता तो ड्रेस वापरु शकतात. तसेच यावेळी त्यांना कोणता आजार तर नाही ना? याची तपासणी केली जाते.
  • यूनायटेड वर्ल्ड रेसलिंगचे अधिकारीच वजन मोजण्याची प्रक्रिया करतात. या सर्व प्रक्रियेची व्हिडिओ रेकॉर्डिंग केली जाते. या अधिकाऱ्याच्या मंजुरीनंतरच कोणताही खेळाडू रिंगमध्ये उतरु शकतो.
  • दहा ते वीस ग्रॅम वजन अर्ध्या तासात कमी करता येते. परंतु शंभर ग्रॅम वजन इतक्या कमी वेळेत कमी करता येत नाही.

विनेश फोगाट दुसऱ्या गटात खेळू शकेल का

ऑलिम्पिकमध्ये वजन जास्त आलेले खेळाडू गट बदलू शकतात. परंतु विनेश प्रकरणात असे शक्य नाही. कारण ऑलिम्पिकमध्ये कोणत्या खेळाडू कोणत्या गटातून खेळणार आहे, हे आधीच निश्चित होते. म्हणजे जास्त वजनामुळे अपात्र झालेली विनेश ५० किलो ऐवजी ५३ किलोच्या गटात खेळू शकणार नाही. १९९६ मध्ये भारताचा कुस्तीपटू पप्पू यादव अपात्र ठरला होतो. ट्रॅयल मॅच जिंकल्यानंतर वजन मोजल्यावर तो अपात्र ठरला होता. त्यानंतर त्याला पुढील सामने खेळता आले नाही.

Follow Us
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा...
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा; कापूरबावडी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडतंय?
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी!CM फडणवीसांच्या बैठकीत..
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी! CM फडणवीसांच्या बैठकीतील ‘हे’ 5 महत्त्वाचे निर्णय
सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
Sachin Waze | सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश...
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश करण्याचा प्रयत्न: पुढे जे घडलं ते...
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे निर्देश काय?
मातोश्री'वर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर...
मातोश्री बंगल्यावर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर राऊत आणि नार्वेकर... नेमकं काय घडतंय?
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा...
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा आता...
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या,
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, जोपर्यंत...
आम्ही लढणार, जिंकणार आणि लोकशाही वाचवणार इंडिया आघाडीचा निर्धार
India Alliance PC : आम्ही लढणार, जिंकणार आणि लोकशाही वाचवणार इंडिया आघाडीचा निर्धार