AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अवघ्या 10 धावात 8 विकेट्स, पाकिस्तानची घातक गोलंदाजी, सामन्याचा निकाल काय?

पाकिस्तानने या सामन्यात प्रतिस्पर्धी न्यूझीलंडचा तब्बल 299 धावांनी (pakistan beat new zealand) पराभव केला होता.

अवघ्या 10 धावात 8 विकेट्स, पाकिस्तानची घातक गोलंदाजी, सामन्याचा निकाल काय?
पाकिस्तानने हा सामना तब्बल 299 धावांनी (pakistan beat new zealand) जिंकला होता.
| Updated on: Mar 13, 2021 | 12:37 PM
Share

इस्लामाबाद : क्रिकेटमध्ये (cricket) कधी काय घडेल हे सांगता येत नाही. त्यामुळे क्रिकेटला अनिश्चिततेचा खेळ म्हटलं जातं. कसोटी क्रिकेटमध्ये साधारणपणे सामना अनिर्णित होतो किंवा दोघांपैकी एक संघ जिंकतो. पण कसोटीमध्ये लवकर पैसावसूल मॅच होत नाही. मात्र असाच कसोटी सामना आजपासून 20 वर्षांपूर्वी 8-12 मार्च 2001 रोजी रंगला होता. पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड (pakistan vs new zealand 1st test 2001) यांच्यात हा कसोटी सामना खेळवण्यात आला होता. 12 मार्च सामन्याचा पाचवा दिवस. सामना अनिर्णित होण्याची दाट शक्यता होती. मात्र अवघ्या काही तासांमध्ये सामन्याचं चित्र पालटलं. 2 तासांमध्ये 27 धावांच्या मोबदल्यात 9 विकेट्स गमावल्या. यापैकी 8 विकेट्स हे 10 मिनिटांमध्ये पडल्या. (pakistan beat new zealand in 1st Test by 299 runs in aukland 2001)

नक्की काय झालं?

पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करत 346 धावा केल्या. पाकिस्तानकडून युनूस खानने सर्वाधिक 91 धावा केल्या. त्याशिवाय मोहम्मद युसूफ 51, मोईन खान 47 तर फैजल इक्बालने 42 धावांची खेळी केली. न्यूझीलंडकडून डेरेल टफी आणि ख्रिस मार्टीनने प्रत्येकी 4 विकेट्स घेतल्या. प्रत्युतरात न्यूझीलंडने पहिल्या डावात 252 धावा केल्या. न्यूझीलंडकडून कर्णधार स्टीफन फ्लेमिंगने सर्वाधित 86 रन्सची खेळी केली. तर क्रेग मॅकमिलन 54 धावा केल्या. पाकिस्तानकडून साकेलन मुश्ताकने 4 विकेट्स मिळवल्या. तर मोहम्मद समीने आणि वकार युनूसने प्रत्येकी 3 फलंदाजांना मैदाना बाहेरचा रस्ता दाखवला.

आणि डाव गडगडला

पाकिस्तानने दुसऱ्या डावात 5 विकेट्स गमावून 336 धावा केल्या. पाकिस्तानने आपला दुसरा डाव 336 धावांवर घोषित केला. युनूस खानने नाबाद 149 धावा चोपल्या. तर इमरान फरहातने 63 तर मोहम्मद युसूफने 42 धावा केल्या. त्यामुळे न्यूझीलंडला विजयासाठी 431 धावांचे आव्हान मिळाले.

पाचव्या दिवसाचा खेळ

पाचव्या आणि अंतिम दिवसाच्या खेळाला सुरुवात झाली. न्यूझीलंडचा स्कोअर 105-1 असा होता. न्यूझीलंड चांगल्या स्थितीत होती. मात्र यानंतर जे घडलं त्याची इतिहासात नोंद झाली. न्यूझीलंडने एका मागोमाग एक विकेट्स गमावल्या. न्यूझीलंडचा दुसरा डाव अवघ्या 131 धावांवर आटोपला. न्यूझीलंडने अखेरचे 8 विकेट्स अवघ्या 10 धावांच्या मोबदल्यात गमावल्या. मोहम्मद समी आणि साकेलन मुस्ताकने सर्वाधिक विकेट्स मिळवल्या. समीने 5 तर साकेलनने 4 फलंदाजांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला.

विशेष म्हणजे या सामन्यात सईद अनवर, इंझमाम उल हक, वसीम अकरम आणि शोएब अख्तर हे चौघे वेगवेगळ्या कारणांनी खेळले नव्हते. यामुळे तेव्हा पाकिस्तानकडून नव्या दमाच्या खेळाडूंना खेळण्याची संधी मिळाली होती. मोहम्मद समी हा त्यापैकी एक होता. समीने पदार्पणातील या सामन्यात एकूण 8 विकेट्स घेतल्या. त्याच्या या कामगिरीसाठी त्याला ‘मॅन ऑफ द मॅच’ या पुरस्काराने गौरवण्यात आलं.

संबंधित बातम्या :

Virat Kohli | ‘रनमशीन’ विराट कोहलीवर तब्बल 761 डावानंतर ओढावली नामुष्की

WI vs SL, 2nd Odi | एव्हीन लेवीस आणि शाई होपचा तडाखा, वेस्टइंडिजचा श्रीलंकेवर 5 विकेट्सने शानदार विजय, मालिकाही जिंकली

(pakistan beat new zealand in 1st Test by 299 runs in aukland 2001)

CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.