IND vs PAK फायनल मॅचपूर्वीच पाक कर्णधार घाबरला, सुवर्णपदकासाठीच्या लढतीपूर्वी फरहान काय म्हणाला?
IND vs PAK: भारत आणि पाकिस्तान यांच्या आशियाई क्रीडा स्पर्धेतील सामना रंगणार आहे. या सामन्यापूर्वी आता पाकिस्तानचा कर्णधाराने काय विधान केले ते पाहा....

२०२६ च्या आशियाई खेळांमधील पुरुषांचा सर्वात मोठा क्रिकेट सामना भारत आणि पाकिस्तान यांच्यात आज रंगणार आहे. या सामन्याचा भलताच क्रेझ पाहायला मिळतो. आता सुवर्णपदकासाठीच्या या ब्लॉकबस्टर लढतीच्या अगदी आधी, पाकिस्तानचा कर्णधार साहिबजादा फरहानने एक महत्त्वपूर्ण विधान केले आहे.
विजेतेपदाच्या सामन्यापूर्वी बोलताना, पाकिस्तानी कर्णधार साहिबजादा फरहानने विरोधी संघाबद्दल आपले मत व्यक्त केले. तो म्हणाला, “मला वाटते की कोण जिंकतो याने काही फरक पडत नाही. तुम्हाला माहीत आहे, हे क्रिकेट आहे आणि क्रिकेटमध्ये काहीही होऊ शकते. श्रीलंकेचा संघ चांगला आहे आणि भारताचाही संघ चांगला आहे. पुढचा संघ कोणता आहे हे पाहण्यासाठी आम्ही अंतिम सामन्याची वाट पाहू आणि त्यानुसार योजना आखू.” फरहानचे हे विधान तेव्हा आले जेव्हा श्रीलंका आणि भारत उपांत्य फेरीत एकमेकांविरुद्ध खेळणार होते तेव्हा आले होतो.
साहिबजादा फरहान पुढे म्हणाले, “भारत असो वा श्रीलंका, इंशाअल्लाह, आम्ही चांगले, दमदार क्रिकेट खेळू पण क्रिकेटमध्ये तर काहीही होऊ शकते.” पाकिस्तानी कर्णधाराच्या या वक्तव्यावरून हे स्पष्ट होते की, त्यांच्या संघाला भारताच्या प्रबळ आव्हानाची पूर्ण जाणीव आहे आणि त्यांना मैदानावर कोणत्याही दबावाशिवाय आपली रणनीती अंमलात आणायची आहे. फरहानचे हे विधान जरी सेमीफायनल सामन्यानंतर आले
आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय संघ आतापर्यंत उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने उपांत्य फेरीच्या सामन्यात श्रीलंकेचा १२४ धावांच्या मोठ्या फरकाने पराभव करून आपला इरादा स्पष्ट केला. जसप्रीत बुमराह, अक्षर पटेल आणि अभिषेक शर्मा यांच्या भेदक गोलंदाजीसमोर श्रीलंकेचा संघ केवळ ४५ धावांवर गारद झाला. दुसरीकडे, पाकिस्तानने बांगलादेशला पराभूत करून अंतिम फेरीत प्रवेश केला.
आशियाई क्रीडा स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच भारतीय आणि पाकिस्तानी क्रिकेट संघ सुवर्णपदकासाठी एकमेकांविरुद्ध लढणार आहेत. एकीकडे भारतीय संघ आपले २०२३ चे सुवर्णपदक राखण्याचा प्रयत्न करेल, तर दुसरीकडे पाकिस्तान भारताची विजयी मालिका रोखण्याचा प्रयत्न करेल. मात्र, सामन्यादरम्यान दोन्ही संघ निशिनमधील हवामान आणि पावसाच्या नियमांवर बारकाईने लक्ष ठेवून असतील.
