Pakistan Tour New Zealand | पाकिस्तानच्या खेळाडूंकडून कोरोना नियमांचं उल्लंघन, न्यूझीलंडच्या अधिकाऱ्यांचा पारा चढला

| Updated on: Nov 26, 2020 | 7:54 PM

पाकिस्तान न्यूझीलंडविरोधात टी 20 आणि कसोटी मालिका खेळणार आहे.

Pakistan Tour New Zealand | पाकिस्तानच्या खेळाडूंकडून कोरोना नियमांचं उल्लंघन, न्यूझीलंडच्या अधिकाऱ्यांचा पारा चढला
Follow us on

हॅमिल्टन : पाकिस्तानचा क्रिकेट संघ सध्या (Pakistan Cricket Team) न्यूझीलंड दौऱ्यावर गेला आहे. पाकिस्तान मंगळवारी न्यूझीलंडमध्ये पोहचला. यानंतर त्यांच्या खेळाडूंची कोरोना चाचणी करण्यात आली. या चाचणीत पाकिस्तानचे 6 खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह सापडले. यातील 2 खेळाडूंना आधीपासून कोरोनाची लक्षण होती, असा धक्कादायक खुलासाही न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने (New Zealand Cricket) केला. इतकं होऊनही पाकिस्तानच्या काही खेळाडूंनी पुन्हा कोरोना नियमांचं सर्रासपणे उल्लंघन केलं. यावरुन न्यूझीलंडचे क्रिकेट बोर्डाचे अधिकारी संतापले. परत पाकिस्तानला पाठवून देऊ, अशी तंबीच अधिकाऱ्यांनी दिली. pakistan tour new zealand violation of corona rules by pakistani players new zealand officers angry

नक्की काय झालं?

पाकिस्तानच्या खेळाडूंना ख्राईस्टचर्च येथील हॉटेलमध्ये क्वारंटाईन करण्यात आलं आहे. पाकिस्तान क्रिकेटनुसार, “पाकिस्तानच्या काही खेळाडूंना कोरोना नियमांचं उल्लंघन करताना रंगेहात सापडले. हे खेळाडू मास्कशिवाय हॉटेल स्टाफकडून जेवण घेताना आढळले. तर काही खेळाडू हे आपसात बोलताना दिसले. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यातही कैद झाला आहे. त्यामुळे यासर्व प्रकारावर न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाचे अधिकारी चांगलेच संतापलेले पाहायला मिळाले. तसेच त्यांनी पाकिस्तानच्या खेळाडूंना धमकीच दिली.

चुकीला माफी नाही!

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी वसीम खान यांनीही आपल्या संघातील खेळाडूंच्या या कृत्याची पुष्टी केली. “पाकिस्तानच्या खेळाडूंकडून पुन्हा कोरोना नियमांचं उल्लंघन झालं, तर परत पाठवू अशी धमकीच न्यूझीलंडच्या अधिकाऱ्यांनी दिली असल्याची माहिती खान यांनी दिली. “त्यामुळे पुन्हा अशी चूक करु नका. जर दौरा रद्द झाला, तर ते पाकिस्तानसाठी लज्जास्पद असेल”, असंही खान यांनी नमूद केलं.

असा आहे पाकिस्तानचा न्यूझीलंड दौरा

पाकिस्तान या दौऱ्यात न्यूझीलंडविरुद्ध 3 टी 20 आणि 2 कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. या दौऱ्याची सुरुवात 20 डिसेंबरपासून होणार आहे. कोरोनानंतरचा पाकिस्तानचा हा दुसरा दौरा आहे. याआधी पाकिस्तानचा संघ इंग्लंड दौऱ्यावर गेला होता. या दौऱ्यामध्ये इंग्लंडने पाकिस्तानचा कसोटी मालिकेत  0-1 असा पराभव केला. तर पाकिस्तना टी 20 मालिका बरोबरीत सोडवण्यात यश आलं. 2 टी सामन्यांच्या मालिकेत पाकिस्तान आणि इंग्लंडन प्रत्येकी 1 सामना जिंकला होता.

संबंधित बातम्या :

Chetan Chauhan Dies | माजी क्रिकेटपटू आणि उत्तर प्रदेशचे मंत्री चेतन चौहान यांचे निधन

Pakistan Tour New Zealand | न्यूझीलंड दौऱ्यावर गेलेल्या पाकिस्तानच्या 6 खेळाडूंना कोरोनाची लागण

pakistan tour new zealand violation of corona rules by pakistani players new zealand officers angry