पाकिस्तानचंही भारताच्या पावलावर पाऊल

पाकिस्तानचंही भारताच्या पावलावर पाऊल

मुंबई : माजी क्रिकेटर राहुल द्रविडची भारतीय ज्युनिअर संघाच्या प्रशिक्षकपदी नियुक्ती केल्यामुळे संघाने चांगले यश मिळवले आहे. हे पाहून पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आपल्या माजी खेळाडूंना वेगवेगळ्या वयोगटातील संघाचे प्रशिक्षक आणि व्यवस्थापक बनवण्याचा विचार करत आहे. तसेच पाकिस्तानचा माजी कर्णधार युनिस खानला अंडर 19 संघाचा प्रशिक्षक आणि व्यवस्थापक बनवण्याच्या विचारात आहे.

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष एहसान मनी म्हणाले, गेल्यावर्षी क्रिकेटला गुडबाय करत निवृत्ती घेत यूनिसने कसोटी सामन्यात 10,000 धावा केल्या होत्या. दरम्यान यूनिसने सांगितले होते की, ही जर प्रक्रिया आपल्या इथे अमंलात आणली, तर मी ज्युनिअर संघाचा प्रशिक्षक बनू शकतो. ऑस्ट्रेलियाचा रोडने मार्श, अॅलेन बॉर्डर आणि रिकी पॉटिंग सारख्या खेळाडूंची सेवा आम्हाला मिळाली. भारतानेही राहुल द्रविडला अंडर 19 संघाच्या प्रशिक्षक पदाची जबाबदारी दिली आणि त्याचा निकालही जगासमोर आला.

द्रविडच्या प्रशिक्षक पदाच्या नेतृत्वाखाली भारतीय अंडर 19 संघाने गेल्यावर्षी विश्वकप जिंकला. युवा खेळाडूंसोबत काम करण्यासाठी माजी खेळाडूंची सेवा घेतली जाणार असल्याचा निर्णय पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने घेतला आहे.  आम्हाला आमच्या खेळाडूंना राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये तयार करावे लागणार आहे. ते देशाचे नाव रोषण करतात. आम्ही परदेशी प्रशिक्षकांसोबत भारतप्रमाणे आमच्या खेळाडूंनाही प्रशिक्षक बनवणार आहे, अस मनी म्हणाले.

VIDEO : लाखो रुपयांचं बनावट पनीर जप्त, पालघर आणि वसईत डेअरींवर धाड

Published On - 9:28 pm, Wed, 13 February 19

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI