AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs PAK: ‘गंभीर परिणाम’… पाकिस्तानच्या निर्णयावर भडकली ICC, होणार मोठी कारवाई ?

पाकिस्तानचा संघ टी20 वर्ल्ड कप 2026 मध्ये भाग तर घेईल पण १५ फेब्रुवारी रोजी भारताविरुद्धच्या सामन्यावर बहिष्कार टाकेल अशी घोषणा पाकिस्तानी बोर्डाने 1 तारखेला केली. मात्र यामुळे पाकच्या अडचणी वाढू शकतात.

IND vs PAK: ‘गंभीर परिणाम’… पाकिस्तानच्या निर्णयावर भडकली ICC, होणार मोठी कारवाई ?
पाकिस्तानवर होणार कारवाई ? Image Credit source: TV9 bharatvasrh
| Updated on: Feb 02, 2026 | 10:27 AM
Share

टी20 वर्ल्ड कप 2026 सुरू होणायास आता अवघे काही दिवस उरले आहेत. मात्र त्याच्या 6 दिवस आधीच पाकिस्तानी क्रिकेट बोर्डाने नवा गोंधळ घालण्यास सुरूवात केली आहे. विश्वचषकात सहभागी होण्याचा निर्णय जवळपास एक आठवडा लांबणीवर टाकणाऱ्या पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) भारताविरुद्धच्या सामन्यावर बहिष्कार टाकण्याची घोषणा केली आहे. पाकिस्तान सरकारच्या आदेशाचा हवाला देत, पीसीबीने असं जाहीर केलं की ते टी20 वर्ल्ड कप 2026मध्ये तर सहभागी होतील परंतु 15 फेब्रुवारी रोजी भारताविरुद्धचा सामना खेळणार नाहीत. या निर्णयामुळे स्पर्धेच्या योजनांमध्ये अडथळा निर्माण झाला असून यामुळे ICC चांगलीच संतापली आहे. यामुळे गंभीर परिणाम होऊ शकतात असा इशारा देत PCB ला त्यांच्या निर्णयावर पुनर्विचार करण्यास सांगितलं आहे.

पीसीबीने रविवार, 1 फेब्रुवारी रोजी टी-20 विश्वचषकात खेळण्याचा निर्णय जाहीर केला पण, त्याचवेळी आपण भारताविरुद्धच्या सामन्यावर बहिष्कार टाकणार असल्याच घोषणाही त्यांनी केली. गेल्या काही दिवसांपासून पीसीबीच्या या निर्णयाबाबत अटकळी व्यक्त होत होत्या. त्यावेळी ICCने कोणतीही प्रतिक्रिया दिली नसली तरी, अधिकृत घोषणेनंतर, इंटरनेशनल काऊन्सिलने एक सविस्तर निवेदन जारी करून पीसीबीला या निर्णयाचा पुनर्विचार करण्यास सांगितले. अन्यथा याचे गंभीर परिणा होतील असा इशाराही देण्यात आला होता. याचा पाकिस्तानी बोर्ज आणि चाहत्यांवरही परिणाम होऊ शकतो.

ICC चा पाकिस्तानी बोर्डाला इशारा

रविवारी रात्री उशिरा निवेदन जारी केलं. निवडक सहभागाबाबतचा निर्णय हा खेळाच्या अखंडतेला धक्का पोहोचवतो. राष्ट्रीय धोरणे निश्चित करण्यात सरकारांची भूमिका आयसीसीने मान्य केली असली तरी, हा निर्णय खेळासाठी हानिकारक असल्याचे परिषदेने म्हटले. तसेच याचे गंभीर परिणाम होतील असा इशारही त्यांनी PCB ला दिला. ” पीसीबी त्याच्या स्वतःच्या देशातील क्रिकेटवर होणाऱ्या महत्त्वपूर्ण आणि दीर्घकालीन परिणामांचा विचार करेल, अशी आयसीसीला आशा आहे. कारण पीसीबी ज्याची सदस्य आणि लाभार्थी आहे, त्या जागतिक क्रिकेट परिसंस्थेवरही याचा परिणाम होऊ शकतो ” असं त्यात नमूद करण्यात आलं.

निर्णय बदलून काढा तोडगा

या निर्णयावर पुन्हा विचार करा आणि समाधानकारक तोडगा काढा असं अपील ICC ने PCBला केलं आहे. ही स्पर्धा यशस्वीरित्या आयोजित करणे हे उद्दिष्ट आहे परंतु सर्व सहभागी सदस्यांची देखील स्पर्धेत एक महत्त्वाची जबाबदारी आहे, ज्यामध्ये पीसीबी देखील एक भाग आहे असं आयसीसीने म्हटलं आहे.

काय होऊ शकते कारवाई ?

या प्रकरणात आयसीसी पीसीबीवर काय कारवाई करू शकते? असा प्रश्न आहे. पीटीआयने आयसीसी बोर्डाच्या सूत्राचा हवाला देत म्हटलं आहे की, पाकिस्तानचा निर्णय ICC-BCCI आणि PCB यांच्यातील न्यूट्रल व्हेन्यूच्या कराराचे उल्लंघन आहे, जो सर्व पक्षांसाठी अनिवार्य आहे. अशा परिस्थितीत, पीसीबीविरुद्ध कठोर कारवाई केली जाऊ शकते. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पीसीबीविरुद्ध पाच वेगवेगळ्या प्रकारची किंवा पाचपैकी कोणतीही कारवाई केली जाऊ शकते –

1) पाकिस्तान संपूर्ण स्पर्धेतून पूर्णपणे बाहेर पडू शकतो.

2) पाकिस्तानला आयसीसीकडून मिळणारा सुमारे 350 कोटींचा वार्षिक महसूल, थांबवला जाऊ शकतो.

3)भारत-पाकिस्तान सामना रद्द झाल्यामुळे झालेल्या नुकसानाची भरपाई पीसीबीला ब्रॉडकास्टर्स जिओ-हॉटस्टारला देणयास सांगितले जाऊ शकते, जी रक्कम 200 कोटींपर्यंत असू शकते.

4) PCB एका बंधनकारक कराराचे उल्लंघन करत आहे, म्हणून इतर आयसीसी सदस्य देश पाकिस्तानसोबतच्या द्विपक्षीय मालिकांवर बहिष्कार टाकू शकतात. किंवा त्या मालिकांचा ICC रँकिंगवर कोणताही परिणाम होणार नाही आणि वर्ल्ड ट्रेडिंगमध्ये कोणतेही गुण मिळणार नाहीत.

5) परदेशी खेळाडूंना (निवृत्त किंवा फ्री एजंट वगळता) पाकिस्तान सुपर लीग (PSL) मध्ये सहभागी होण्यास मनाई केली जाऊ शकते.

Follow Us
सचिन अहेर यांची आमदारकी राहणार की जाणार? कायदा काय सांगतो? असीम सरोदें
सचिन अहेर यांची आमदारकी राहणार की जाणार? कायदा काय सांगतो? असीम सरोदेंनी सगळं सांगितलं!
महापौर रितू तावडे यांची दुर्घटना स्थळाला भेट, दोषींवर कारवाई करणार
महापौर रितू तावडे यांची दुर्घटना स्थळाला भेट, दोषींवर कारवाई करणार
केतन-सिया प्रकरणाला वेगळंच वळण; तब्बल 10 कोटी... वकिलांच्या दाव्याने
केतन-सिया प्रकरणाला वेगळंच वळण; तब्बल 10 कोटी... वकिलांच्या दाव्याने एकच खळबळ
चेंबूर स्कुलबस अपघातानंतर शिंदे अ‍ॅक्शन मोडमध्ये, फोन करून दिला तातडीच
Eknath Shinde | चेंबूर स्कुलबस अपघातानंतर शिंदे अ‍ॅक्शन मोडमध्ये, फोन करून दिला तातडीचा आदेश!
राम मंदिर दानपेटी प्रकरणावर राज ठाकरेंचा भाजपवर थेट निशाणा
Raj Thackeray | राम मंदिर दानपेटी प्रकरणावर राज ठाकरेंचा भाजपवर थेट निशाणा; मोदींच्या मौनावर गंभीर सवाल
आमच्या पक्षाचे पण खासदार फोडण्याचे प्रयत्न... रोहित पवारांच्या विधान
Rohit Pawar | 'आमच्या पक्षाचे पण खासदार फोडण्याचे प्रयत्न... रोहित पवारांच्या विधानाने खळबळ
महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप? अनेक बडे नेते काँग्रेसच्या संपर्कात
मोठी बातमी! महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप? अनेक बडे नेते काँग्रेसच्या संपर्कात; विजय वडेट्टीवारांचा मोठा दावा
शाळेच्या बसवर भलेमोठं झाड कोसळलं; अनेक विद्यार्थी जखमी
मुंबईत भीषण दुर्घटना! शाळेच्या बसवर भलेमोठं झाड कोसळलं; अनेक विद्यार्थी जखमी, बचावकार्य युद्धपातळीवर सुरू
अजून अनेक मोठे चेहरे आमच्या संपर्कात; शिंदे गटातील नेत्याचा मोठा दावा
मोठी बातमी! अजून अनेक मोठे चेहरे आमच्या संपर्कात; सचिन अहिरांच्या प्रवेशानंतर शिंदे गटातील नेत्याचा मोठा दावा
मोठी बातमी! सचिन अहिर यांनी केवळ अर्ज भरलाय, पक्षप्रवेश केलेला नाही?
मोठी बातमी! सचिन अहिर यांनी केवळ अर्ज भरलाय, पक्षप्रवेश केलेला नाही? बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ