Video : पृथ्वी शॉ ची गर्लफ्रेंड प्राची सिंगचा जान्हवी कपूरच्या गाण्यावर अप्रतिम बेली डान्स, एकदा पाहाच!

Akshay Adhav

|

Updated on: May 08, 2021 | 10:50 AM

प्राची सिंगच्या एका डान्सचा व्हिडीओ सोशल मीडियात सध्या धुमाकूळ घालतोय. तिने जान्हवी कपूरच्या गाण्यावर बेली डान्स केलाय. Prithvi Shaw GirlFriend prachi Singh belly Dance On janhvi kapoor Song

Video : पृथ्वी शॉ ची गर्लफ्रेंड प्राची सिंगचा जान्हवी कपूरच्या गाण्यावर अप्रतिम बेली डान्स, एकदा पाहाच!
जान्हवी कपूरच्या गाण्यावर प्राची सिंगचा अप्रतिम बेली डान्स...

मुंबई : दिल्ली कॅपिटल्सचा (Delhi Capitals) सलामीवीर आणि क्रिकेटमधलं भारताचं उद्याचं भविष्य असलेल्या पृथ्वी शॉने (Prithvi Shaw) आयपीएलच्या 14 व्या पर्वात (IPL 2021) आपल्या बॅटची जादू दाखवली. सात सामन्यात त्याने शानदार तीन अर्धशतकं झळकावली. पृथ्वी आपल्या शानदार बॅटिंगने तर नेहमी चर्चेत असतो पण त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलही लोक चर्चा करत असतात. पृथ्वी टीव्ही स्टार प्राची सिंगला (Prachi Singh) डेट करत असल्याच्या चर्चा आहेत. प्राचीही अनेकवेळा पृथ्वीचं कौतुक करते. आयपीएलमधील पृथ्वीच्या दमदार कामगिरीनंतर तीन ते चार वेळा तिने इन्स्टा पोस्ट लिहून पृथ्वीच्या पाठीवर प्रेमाची आणि कौतुकाची थाप मारली. आता तिच्या एका डान्सचा व्हिडीओ सोशल मीडियात सध्या धुमाकूळ घालतोय. तिने जान्हवी कपूरच्या गाण्यावर बेली डान्स केलाय. (Prithvi Shaw GirlFriend prachi Singh belly Dance On janhvi kapoor Song)

प्राची सिंगने इन्स्टाग्रामवर एका डान्सचा व्हिडीओ अपलोड केला आहे. या व्हिडीओत ती बेली डान्स करताना दिसून येत आहे. जान्हवी कपूरच्या ‘रुही’ चित्रपटातील ‘नदियों पार सजन डा थाना’ या गाण्यावर प्राचीने सुंदर डान्स केलाय. तिचा हा व्हिडीओ प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. अनेकांनी तिच्या या डान्सचं कौतुक केलंय.

View this post on Instagram

A post shared by Prachi Singh (@prachisingh2202)

नेमकी कोण आहे प्राची सिंग?

प्राचीचा जन्म 22 जुलै 1995 रोजी मुंबई येथे झाला होता. प्राची ही छोट्या पडद्यावरची मॉडेल आणि अभिनेत्री आहे. 2019 मध्ये उडान सीरियलमधील वंशिका शर्माच्या भूमिकेत ती प्रथम कलर्स टीव्हीवर दिसली होती. तेव्हापासून तिच्या कामाला गती मिळाली.

‘डान्सर प्राची’ची ओळख

अभिनयाबरोबरच प्राचीला डान्सची आवड आहे. ती उत्तम बेली डान्स करते. प्राचीच्या इन्स्टाग्राममध्ये तिचे डान्स व्हिडीओ पाहायला मिळतील. इन्स्टाग्रामवर तिचा चांगला फॅन फॉलोईंग आहे. 19.8 हजारांहुन अधिक लोक तिला इन्स्टाग्रामवर फॉलो करतात.

पृथ्वी प्राचीमध्ये नातं काय?

पृथ्वी शॉ प्राची सिंग हे एकमेकांना डेट करतात, अशा चर्चा आहेत. परंतु दोघांनीही आपण डेट करत असल्याचं जाहीरपणे कबूल केलं नाही. असं असलं तरी जेव्हा कधीही पृथ्वी सुंदर बॅटिंग करतो त्यावेळी प्राची जाहीरपणे प्रेमाचा इजहार करत पृथ्वीला सोशल मीडियावावरुन का होईना हृदय देते.

(Prithvi Shaw GirlFriend prachi Singh belly Dance On janhvi kapoor Song)

हे ही वाचा :

कोरोनाबाधित वडिलांवर आयपीएलचा सगळा पैसा खर्च करणार, 22 वर्षीय चेतन साकरियाच्या संघर्षाची कथा!

World Test Championship final 2021 : BCCI चं पुन्हा दुर्लक्ष, भारतीय संघातील फिरकीपटूचं करिअर संपण्याच्या मार्गावर!

ऑस्ट्रेलियाचे खेळाडू मालदीवला पोहोचताच माईक हसीने दिली चेन्नईला गुड न्यूज!

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI