PSL 2021 | सामना सुरु होण्याआधी ‘या’ स्टार क्रिकेटपटूला कोरोनाची लागण

| Updated on: Mar 01, 2021 | 9:01 PM

पाकिस्तान सुपर लीगमध्ये (PSL 2021) इस्लामाबाद यूनायटेडकडून (Islamabad United) खेळणाऱ्या फवाद अहमदला (Fawad Ahmed) कोरोनाची (corona) लागण झाली आहे.

PSL 2021 | सामना सुरु होण्याआधी या स्टार क्रिकेटपटूला कोरोनाची लागण
पाकिस्तान सुपर लीगमध्ये (PSL 2021) इस्लामाबाद यूनायटेडकडून (Islamabad United) खेळणाऱ्या फवाद अहमदला (Fawad Ahmed) कोरोनाची (corona) लागण झाली आहे.
Follow us on

इस्लामाबाद : सध्या पाकिस्तान सुपर लीग (Pakistan Super League 2021) स्पर्धा सुरु आहे. या स्पर्धेत इस्लामाबाद यूनायटेडकडून (Islamabad United) खेळणाऱ्या खेळाडूला कोरोनाची लागण झाली आहे. फवाद अहमदचा (Fawad Ahmed) कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (Pakistan Cricket Board) याबाबतची माहिती दिली आहे. दोन दिवसांपूर्वी फवादला कोरोनाची लक्षण जाणवली होती. त्यामुळे त्याला तातडीने आयसोलेट करण्यात आलं होतं. दरम्यान फवाद पॉझिटिव्ह आल्याने  इस्लामाबाद यूनाइटेड विरुद्ध क्वेटा ग्लेडिएटर्स यांच्यातील सामना मंगळवारी खेळवण्यात येणार आहे.  (PSL 2021 Islamabad United Fawad Ahmed Tested corona positive)

फवाद पॉझिटिव्ह झाल्यानंतर संघातील उर्वरित खेळाडूंची कोरोना चाचणी करण्यात आली. सुदैवाने या सर्व खेळाडूंचा रिपोर्ट हा निगेट्विह आला. तसेच खबरदारी म्हणून इतर टीमच्या खेळाडूंचीही चाचणी केली जात आहे. यासर्व गोंधळामुळे उभय संघातील  7 वाजून 30 मिनिटांनी सुरु होणारा सामना हा आता थेट 2 मार्चला संध्याकाळी 7 वाजता खेळवण्यात येणार आहे. फवादने या स्पर्धेतील पहिला सामना 27 फेब्रुवारीला खेळला होता. या सामन्यानंतर फवादने स्वत:ला आयसोलेट केल्याचं सांगितलं जात आहे.

फवादची क्रिकेट कारकिर्द

फवाद आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाचे प्रतिनिधित्व करतो. फवादने आतापर्यंत 3 एकदिवसीय आणि 2 टी 20  सामने खेळले आहेत. तसेच फवाद अनेक स्थानिक आणि विविध देशातील टी 20 स्पर्धेत सहभागी होतो.

सलील अंकोलालाही कोरोनाची लागण

मुंबई क्रिकेट असोसिएशनचे (mumbai cricket association) निवड समितीचे प्रमुख, टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू आणि अभिनेता असलेला सलिल अंकोलाला रविवारी 28 फेब्रुवारीला कोरोनाची लागण झाली होती. अंकोला यांनी इंस्टाग्रामवर आपला फोटो शेअर करत याबाबतची माहिती दिली होती. “कोरोनाची लागण झाल्याने मला भिती वाटत आहे. माझ्या लवकर बरा होण्यासाठी तुम्ही प्रार्थना करा. मी लवकरच कोरोनावर मात करत परतेन”, अशा आशावाद अंकोलाने व्यक्त केला.

संबंधित बातम्या :

सचिनसोबत कसोटी पदार्पण, वयाच्या 28 वर्षी क्रिकेटला रामराम, ‘या’ खेळाडूला वाढदिवशीच कोरोनाची लागण

On This Day : हुक मारके दिखा ! अख्तरने सेहवागला डिवचलं अन सचिनने शोएबच्या गोलंदाजीवर खेचला सिक्सर

Vijay Hazare Trophy | सूर्यकुमार यादवची तडाखेदार खेळी, 15 चेंडूत चोपल्या 60 धावा, इंग्लंडला टी 20 मालिकेत पाणी पाजण्यासाठी सज्ज

(PSL 2021 Islamabad United Fawad Ahmed Tested corona positive)