Vijay Hazare Trophy | सूर्यकुमार यादवची तडाखेदार खेळी, 15 चेंडूत चोपल्या 60 धावा, इंग्लंडला टी 20 मालिकेत पाणी पाजण्यासाठी सज्ज

सूर्यकुमार यादवची इंग्लंड विरुद्धच्या टी 20 मालिकेसाठी निवड करण्यात आली आहे.

Vijay Hazare Trophy | सूर्यकुमार यादवची तडाखेदार खेळी, 15 चेंडूत चोपल्या 60 धावा, इंग्लंडला टी 20 मालिकेत पाणी पाजण्यासाठी सज्ज
सूर्यकुमार यादवची इंग्लंड विरुद्धच्या टी 20 मालिकेसाठी निवड करण्यात आली आहे.

जयपूर : विजय हजारे स्पर्धेत (Vijay Hazare Trophy) सध्या युवा खेळाडू दमदार कामगिरी करत आहेत. आपल्या खेळीने हे खेळाडू दिग्गजांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेत आहेत. मुंबईकर सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) या स्पर्धेत सातत्याने शानदार फलंदाजी करतोय. सूर्यकुमारने आज हिमाचल प्रदेश (Himacahl Pradesh) विरुद्ध झालेल्या सामन्यात गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. त्याने या खेळीसह मुंबईच्या विजयात निर्णायक भूमिका बजावली. सूर्यकुमार मधल्या फळीत जोरदार फटेकबाजी करत आहे. (vijay hazare trophy suryakumar yadav scored 91 runs against himachal pradesh)

15 चेंडूत ठोकल्या 60 धावा

सूर्याने हिमाचल विरुद्ध खेळताना 75 चेंडूंमध्ये 91 धावांची खेळी केली. यामध्ये त्याने 15 चौकार लगावले. म्हणजेच सूर्यकुमारने 15 बोलमध्ये 60 धावा केल्या. बॅटिंगदरम्यान सूर्याने हिमाचलच्या गोलंदाजांना चोप चोप चोपला.

5 डावांमध्ये 1 शतक आणि 100+ स्ट्राईक रेट

विजय हजारे करंडकात आतापर्यंत सूर्याने 5 सामन्यात मुंबईकडून खेळला आहे. या 5 डावात त्याने 1 शतक आणि 2 अर्धशतक लगावले आहेत. विशेष म्हणजे मधल्या फळीत बॅटिंग करुनही सूर्याचा स्ट्राईक रेट हा 100 पेक्षा अधिकचा आहे.

इंग्लंड विरुद्धच्या टी 20 मालिकेसाठी संधी

सूर्याला इंग्लंड विरुद्धच्या 5 मॅचच्या टी 20 सीरिजसाठी संधी देण्यात आली आहे. यामुळे सूर्याकडून या टी 20 मालिकेतही अशाच प्रकारच्या तुफानी खेळीची अपेक्षा असणार आहे.

टी 20 मालिकेचे वेळापत्रक

12 मार्च | पहिली टी 20 मॅच | मोटेरा स्टेडियम, अहमदाबाद | संध्याकाळी 7 वाजता

14 मार्च | दुसरी टी 20 मॅच | मोटेरा स्टेडियम, अहमदाबाद | संध्याकाळी 7 वाजता

16 मार्च | तिसरी टी 20 मॅच | मोटेरा स्टेडियम, अहमदाबाद | संध्याकाळी 7 वाजता

18 मार्च | चौथी टी 20 मॅच | मोटेरा स्टेडियम, अहमदाबाद | संध्याकाळी 7 वाजता

20 मार्च | पाचवी टी 20 मॅच | मोटेरा स्टेडियम, अहमदाबाद | संध्याकाळी 7 वाजता

इंग्लंड विरुद्धच्या टी 20 मालिकेसाठी टीम इंडिया

विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा(उपकर्णधार), केएल राहुल, शिखर धवन, श्रेयस अय्यर, सुर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, रिषभ पंत(यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), युझवेंद्र चहल, वरुण चक्रवर्ती, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, राहुल तेवतिया, टी नटराजन, भुवनेश्वर कुमार, दिपक चहार, नवदीप सैनी आणि शार्दुल ठाकूर.

अशी आहे इंग्लंड टीम

इयन मॉर्गन (कॅप्टन), मोईन अली, जोफ्रा आर्चर, जॉनी बेयरस्टो, सॅम बिलींग्ज, जोस बटलर, सॅम करन, टॉम करन, ख्रिस जॉर्डन, लियाम लिंग्विनस्टोन, डेविड मलान, आदिल राशिद, जेसन रॉय, बेन स्टोक्स, रिस टोपेल आणि मार्क वुड.

संबंधित बातम्या :

Suryakumar Yadav | मी खूप काळापासून विराटच्या नेतृत्वात खेळण्याचे स्वप्न पाहत होतो : सूर्यकुमार यादव

Vijay Hazare Trophy | ‘पालघर एक्सप्रेस’ शार्दुल ठाकूरची 92 धावांची सुस्साट खेळी, हिमाचल प्रदेशवर शानदार विजय

(vijay hazare trophy suryakumar yadav scored 91 runs against himachal pradesh)

Published On - 7:54 pm, Mon, 1 March 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI