AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PSL 2021 VIDEO : पाकिस्तानचा दिग्गज गोलंदाज मोहम्मद आमिरची धुलाई, 6 चेंडूमध्ये ‘गेम ओव्हर’

पाकिस्तानाचा दिग्गज आणि अनुभवी खेळाडू म्हणून ओळख असलेल्या मोहम्मद आमिरची चांगलीच धुलाई झाली. (psl 2021 league bowler mohammad amir)

PSL 2021 VIDEO : पाकिस्तानचा दिग्गज गोलंदाज मोहम्मद आमिरची धुलाई, 6 चेंडूमध्ये 'गेम ओव्हर'
मोहम्मद आमिर
| Updated on: Mar 01, 2021 | 9:48 AM
Share

इस्लामाबाद : भारतात लवकरच आयपीएलचा हंगाम सुरु होणार आहे. आयपीएलप्रमाणेच पाकिस्तानमध्येसुद्धा सध्या पाकिस्तान सुपर लीग म्हणजेच पीएसएल सामन्यांची चर्चा आहे. पीएसएल लीगमध्ये 28 फेब्रुवारी रोजी लाहोर कलंदर्स आणि कराची किंग्स या दोन संघांमध्ये झालेला सामना चांगलाच रोमहर्षक ठरला. पाकिस्तानाचा दिग्गज आणि अनुभवी खेळाडू म्हणून ओळख असलेल्या मोहम्मद आमिरची चांगलीच धुलाई झाली. लाहोर कलंदर्सच्या खेळाडूंनी त्याच्या एका षटकाच्या मदतीने सगळा सामनाच आपल्याकडे खेचून घेतला. (psl 2021 league bowler Mohammad Amir given 20 runs in only one over lost the match)

मोहम्मद आमिर हा अनुभवी खेळाडू म्हणून ओळखला जातो. त्याचे कौशल्य संपूर्ण जगाला माहिती आहे. चेंडू फेकण्याची त्याची शैली, त्याची गती अगदीच वैशिष्यपूर्ण आहे. लाहोर कलंदर्स आणि कराची किंग्स या दोन संघांमध्ये सामना होत असताना मोहम्मदने  सुरुवातीला आपल्या तीन षटकांमध्ये फक्त 14 धावा दिल्या होत्या. मात्र, आपल्या चौथ्या षटकामध्ये त्याने पूर्णत: निराशा केली. परिणामी जिंकण्याच्या स्थितीत असलेल्या कराची किंग्जला पराभवाचा सामना करावा लागला.

मोहम्मद आमिरची धुलाई, पाहा व्हिडीओ :

शेवटच्या षटकात तब्बल 20 धावा

कराची किंग्स आणि लाहोर कलंदर्स या दोन संघांमध्ये 28 फेब्रुवारी रोजी सामना रंगला. या सामन्यात कराची किंग्सने 187 धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना लाहोर कलंदर्सने प्रयत्नांची पराकाष्ठा केली. मोहम्मद आमिरने सुरुवातीला उत्कृष्ट गोलंदाजी करत पहिल्या तीन षटकांत आमिरने फक्त 14 धाव्या दिल्या. मात्र, कराची किंग्सचा कर्णधार इमाद वसिमने दाखवलेला विश्वास तो शेवटी सत्यात उतरवू शकला नाही. मोहम्मदने आपल्या शेवटच्या शटकात तब्बल 20 धावा दिल्या परिणामी हातात आलेला सामना कराजी किंग्जला गमवावा लागला.

12 चेंडूत 30 धावा, मोहम्मदने दिल्या तब्बल 20 धावा

मोहम्मद आमिरने आपल्या सुरुवातीच्या तीन षटकांत फक्त 14 धावा दिल्या. सुरुवातीला चांगले प्रदर्शन केल्यामुळे कराची किंग्स सहज सामना खिशात घालेल असं प्रत्येकाला वाटत होतं. त्या दिशेने कराची किंग्सने मार्गक्रमणही केले होते. लाहोर कलंदर्स या संघाला शेवटी 12 चेडूमध्ये  तब्बल 30 धावा काढायच्या होत्या. हे लक्ष्य गाठणे जवळपास अशक्य असल्याचे म्हटले जात होते. त्यासाठी गतिरोधक म्हणून कराची किंग्सच्या कर्णधाराणे मोहम्मद आमिरकडे चेंडू सोपवला. शेवटची दोन शटकं राहिल्यामुळे मोहम्मदकडे चेंडू सोपवण्यात आला होता. मात्र, लाहोर कलंदर्सने मोहम्मदची चांगलीच धुलाई केली. लाहोर कलंदर्सच्या बेन डंक आणि डेव्हिड विज यांनी मोहम्मदच्या षटकात तब्बल 20 धावा ठोकल्या आणि कराजी किंग्सच्या हातातून हा सामना गेला.

त्यानंतर आमिरने 20 धावा दिल्यामुळे लाहोर कलंदर्स या संघला शेवटच्या षटकात फक्त 10 धावांचे लक्ष्य समोर राहिले. हे लक्ष्य लाहोर कलंदर्सने सहज पार करत कराजी किंग्स आणि त्याहीपेक्षा मोहम्मद आमिरला धूळ चारली.

इतर बातम्या :

Vijay Hazare Trophy | चौकार षटाकारांचा पाऊस, मध्य प्रदेशच्या व्यंकटेश अय्यरची 198 धावांची स्फोटक खेळी

(psl 2021 league bowler Mohammad Amir given 20 runs in only one over lost the match)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.