IPL 2020, MI vs RR : मुंबईविरुद्धच्या सामन्यात चूक, राजस्थानचा कर्णधार स्टीव्ह स्मिथला 12 लाखाचा दंड

आयपीएलच्या यंदाच्या मोसमातील ही तिसरी घटना आहे. (Steve Smith fined 12 lakh for slow over rate)

IPL 2020, MI vs RR : मुंबईविरुद्धच्या सामन्यात चूक, राजस्थानचा कर्णधार स्टीव्ह स्मिथला 12 लाखाचा दंड
Follow us
| Updated on: Oct 08, 2020 | 7:09 PM

अबुधाबी : मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) मंगळवारी 6 ऑक्टोबरला राजस्थान रॉयल्सचा (Rajasthan Royals )57 धावांनी पराभव केला. यासह मुंबईने तब्बल 5 वर्षांनंतर राजस्थानवर मात केली. दरम्यान राजस्थानचा मुंबईविरुद्ध पराभव झाल्यानंतर कर्णधार स्टीव्ह स्मिथला (Steve Smith) दणका बसला आहे. स्टीव्हला 12 लाखांचा दंड भरावा लागणार आहे. मुंबई विरुद्धच्या सामन्यात स्लो ओव्हर रेटमुळे स्मिथला 12 लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. आयपीएलच्या यंदाच्या मोसमातील ही तिसरी घटना आहे. (Steven Smith fined 12 lakh for slow over rate)

याआधी स्लो ओव्हर रेटमुळे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा (RCB) कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आणि दिल्ली कॅपिट्ल्सचा (DC) कॅप्टन श्रेयस अय्यरलाही (Shreyas Iyer)12 लाखांचा दंड ठोठावण्यात आला होता. आयपीएलच्या या 13 व्या (IPL 2020) हंगामातील तीनही कर्णधारांची ही पहिलीच चूक ठरली. मात्र यानंतर या तिघांपैकी कोणत्याही कर्णधाराकडून पुन्हा अशी चूक झाली, तर त्यांना एका सामन्याला मुकावे लागू शकते. स्लो ओव्हर रेटमुळे दुसऱ्यांदा दोषी आढळल्यास संबंधित कर्णधारावर एक सामन्याची बंदी घालण्यात येते.

बेन स्टोक्स लवकरच मैदानात

स्टीव्हने बेन स्टोक्सच्या (Ben Stocks) पुनरागमनाबाबत प्रतिक्रिया दिली. “बेन स्टोक्स राजस्थानचा स्टार खेळाडू आहे. स्टोक्सला वडिलांच्या प्रकृतीमुळे या मोसमाच्या सुरुवातीपासून खेळता आले नाही. मात्र तो आता परतला आहे. लवकरच बेन स्टोक्स राजस्थानकडून खेळताना दिसणार आहे. स्टोक्स सध्या क्वारंटाईन आहे. त्यामुळे क्वारंटाईन कालावधी समाप्त झाल्यानंतर स्टोक्स संघाशी जोडला जाईल, अशी माहिती कर्णधार स्टीव्ह स्मिथने दिली. तसेच स्टोक्सच्या पुनरागमनाआधी आम्ही काही सामने जिंकण्यास यशस्वी ठरु”, असा आशावाद स्टीव्ह स्मिथने व्यक्त केला.

दरम्यान राजस्थानची यंदाच्या मोसमाची सुरुवात चांगली झाली. राजस्थानने या मोसमातील पहिल्या 2 सामन्यात विजय मिळवला. मात्र या पुढील 3 सामन्यात राजस्थानचा पराभव झाला. त्यामुळे राजस्थान ताज्या आकडेवारीनुसार पॉइंट्सटेबलमध्ये 4 पॉइंट्ससह 7 व्या क्रमांकावर आहे.

मुंबईचा राजस्थानवर विजय

मुंबईने राजस्थानवर 57 धावांनी विजय मिळवला. यासह मुंबईने राजस्थानवर तब्बल 5 वर्षांनी मात केली. मुंबईने याआधी राजस्थानवर 2015 मध्ये विजय मिळवला होता. राजस्थानवर 2016 आणि 2017 मध्ये बंदी होती. यानंतर मुंबई विरुद्ध राजस्थान यांच्यात 2018 मध्ये 2 आणि 2019 मध्ये 2 असे एकूण 4 सामने खेळण्यात आले. या 4 ही सामन्यात मुंबईला पराभवाला सामोरे जावे लागले होते.

संबंधित बातम्या :

IPL 2020, MI vs RR : मुंबई इंडियन्सचा राजस्थानवर 57 धावांनी ‘रॉयल’ विजय

IPL 2O20, KXIP vs RCB : कर्णधार विराट कोहलीला दणका, भरावा लागणार 12 लाखांचा दंड

IPL 2020 | आधीच दिल्लीला पराभवाचा धक्का, आता श्रेयस अय्यरला बारा लाखांचा दंड

IPL 2020 : ‘या’ कारणांमुळे Rajasthan Royals ची पिछेहाट; कर्णधार स्मिथचं स्पष्टीकरण

(Steve Smith fined 12 lakh for slow over rate)

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.