SRH vs RR: जेतेपदासाठी राजस्थान रायल्सची 13 वर्षांपासून प्रतीक्षा, ‘या’ फलंदाजांमुळे विजय शक्य?

IPL च्या 15 व्या हंगामातील पाचवा सामना आज सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात होणार आहे. पुणे येथील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर सायंकाळी 7.30 वाजता दोन्ही संघांमधील सामना सुरू होईल. संजू सॅमसन कर्णधार म्हणून केन विल्यमसनसमोर असेल.

SRH vs RR: जेतेपदासाठी राजस्थान रायल्सची 13 वर्षांपासून प्रतीक्षा, 'या' फलंदाजांमुळे विजय शक्य?
हैदराबाद आणि राजस्थानमध्ये आज 'रॉयल' लढत.Image Credit source: social
Follow us
| Updated on: Mar 29, 2022 | 8:14 AM

मुंबई : IPL च्या (IPL 2022) 15 व्या हंगामातील पाचवा सामना आज सनरायझर्स हैदराबाद (SRH) आणि राजस्थान रॉयल्स (RR) यांच्यात होणार आहे. पुणे येथील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर सायंकाळी 7.30 वाजता दोन्ही संघांमधील सामना सुरू होईल. संजू सॅमसन कर्णधार म्हणून केन विल्यमसनसमोर असेल. आज पुण्याच्या मैदानावर विजयाचे खाते उघडण्यासाठी सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स उतरणार आहे. गेल्या सत्रामध्ये सुमार खेळीमुळे हे दोन्ही संघ तळात होते. राजस्थान रॉयल्सने 2008मध्ये पहिल्या IPL मध्ये विजेतेपद पटकावले होते. पण त्यानंतर संघाला ही कामगिरी करता आली नाही. गेल्या काही वर्षांपासून संघासोबत असलेला कर्णधार संजू सॅमसनच्या कामगिरीवर रॉयल्सची फलंदाजी मोठ्या प्रमाणावर अवलंबून असेल, परंतु त्याला अपेक्षेप्रमाणे कामगिरी करता आली नाही.

राजस्थान रॉयल्सचं ठरलं!

राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसन म्हणतो की, त्यांचा संघ 13 वर्षांची प्रदीर्घ प्रतीक्षा संपवून पुन्हा एकदा विजेतेपदावर कब्जा करेल. राजस्थान संघाकडे प्रत्येक विभागात भरपूर पर्याय असल्याचे संजूचे मत आहे. सॅमसन व्यतिरिक्त, आयपीएल 2008 चॅम्पियन रॉयल्सने या हंगामात त्यांच्या संघात जोस बटलर, देवदत्त पडिक्कल, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट आणि युझवेंद्र चहल यासारख्या काही उल्लेखनीय खेळाडूंना घेतले आहे. राजस्थानने 2008 मध्ये आयपीएलचे पहिले विजेतेपद पटकावले होते. तेव्हापासून राजस्थान दुसऱ्या जेतेपदाच्या शोधात आहे.

रॉयल्स जेतेपदाच्या शोधात

मागील हंगामात 2018 चा चॅम्पियन राजस्थान गुणतालिकेत 7 व्या तर 2016 चा चॅम्पियन हैदराबाद 8 व्या क्रमांकावर होता. रॉयल्सने 2008 मध्ये त्यांचे पहिले आयपीएल विजेतेपद दिवंगत शेन वॉर्नच्या नेतृत्वाखाली जिंकले होते. परंतु तेव्हापासून संघ कधीही प्रभावी कामगिरी करू शकला नाही. राजस्थान रॉयल्स गेल्या काही काळापासून सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत आहे. आता संघाला मैदानावर ताकद दाखवायची आहे. कर्णधार संजू सॅमसनने दरवर्षी एक-दोन सामन्यांत चांगला खेळ केला आहे. पण रॉयल्सला दुसरे विजेतेपद मिळवायचे असेल तर त्यांना कामगिरीत सातत्य ठेवावे लागेल. यामुळे सॅमसनला या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या T20 विश्वचषकासाठी भारतीय संघात आपले स्थान निश्चित करण्याची संधी मिळेल. जोस बटलर आणि देवदत्त पडिक्कल रॉयल्ससाठी डावाची सुरुवात करू शकतात. बटलर कोणत्याही आक्रमणाला झुगारून देण्यास सक्षम आहे. पडिक्कलसह तो रॉयल्सला दमदार सुरुवात करून देऊ शकतो, ज्यामुळे सॅमसनसारख्या खेळाडूसाठी ते सोपे होईल. मधल्या फळीत, रॉयल्सकडे पॉवर हिटर शिमरॉन हेटमायर, रसी व्हॅन डेर ड्युसेन, जिमी नीशम आणि रियान पराग आहेत. त्याचे योगदान संघासाठी खूप महत्त्वाचे असेल.

हेड टू हॅट

एकूण सामने: 15 सनरायझर्स हैदराबाद: 07 राजस्थान रॉयल्स: 08

सनरायझर्स हैदराबाद टीम

केन विल्यमसन (कर्णधार), अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, एडन मार्कराम, निकोलस पूरन, अब्दुल समद, वॉशिंग्टन सुंदर, मार्को जॅन्सन, भुवनेश्वर कुमार, टी नटराजन, श्रेयस गोपाल.

राजस्थान रॉयल्स टीम

संजू सॅमसन (कर्णधार), जोस बटलर, यशस्वी जैस्वाल, देवदत्त पडिककल, शिमरॉन हेटमायर, रियान पराग, रवी अश्विन, ओबेद मॅककॉय, ट्रेंट बोल्ट, प्रशांत कृष्णा, युझवेंद्र चहल.

इतर बातम्या

संधिवात म्हणजे नेमके काय, लक्षणे आणि उपचार कसे करायचे हे जाणून घ्या डाॅक्टरांकडूनच!

Aurangabad | पवित्र रमजान महिन्याची शहरात लगबग, औरंगाबादचा ऐतिहासिक सायरन वाजणार की नाही?

Aadhaar-PAN Link : तुमचे पॅन आधारला लिंक आहे का? नसल्यास जाणून घ्या काय नुकसान होऊ शकते

Non Stop LIVE Update
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.